Amrutanubhav Prakaran 3

by ngbapat36

वाचाऋणपरिहार

१२ ऑगस्ट २०१४

सुप्रभातम्

ज्ञानेश्वरकृत अमृतानुभव

प्रकरण ३, वाचाऋणपरिहार ,ओवी ३.१

ययाचेनि बोभाटे । आत्मयाची झोप लोटे ।

पूर्ण तरी ऋण न फिटे । जे चेणेचि नीद की ।। ३.१ ।।

या चार वाणीच्या(ययाचेनि) गजराने (बोभाट्याने) आत्म्याची झोप नाहिशी होते व तो पूर्ण होतो तरी पण जागे होणे(चेणेचि) हीहि निद्राच(नीद) असल्यामुळे या वाणीचे ऋण फिटत नाही.

Atma is awakened because of outcry of the four types of speech .However since awakening is also sleep, indebtedness of the speech is not extinguished .

ह्या ओवीत ज्ञानेश्वर वाणीचे ऋण वआत्म्याची झोप ह्या संकल्पना स्पष्ट करत आहेत.परा,पश्यन्ति,मध्यमा व वैखरी ह्या चार वाणी होत.त्यांच्या बोभाट्याने आत्म्याची झोप लोटली.आत्मा झोपला म्हणजे आत्मा आपले शुद्ध स्वरूप विसरला व मी म्हणजे माझा जड देह असा विचार करू लागला,असा विचार तो जागेपणी करू लागला एवढेच नव्हे तर स्वप्नातही करू लागला. तो झोपला असतानाही जीवाला त्याच्या नावाने हाक मारली तर तो जागा होतो. मी म्हणजे माझा देह हा विचार त्याच्या सर्व अवस्थेत जागेपणी, स्वप्नावस्थेत व झोप झाल्यावरही त्याच्या मनात मी म्हणजे माझा देह,म्हणजेच द्वैत हाच विचार प्रबळ असतो.ह्या तीन अवस्थात वैखरी,मध्यमा व पश्यन्ति ह्या तीन वाणी सक्रीय असतात व मी देह आहे हाच विचार प्रबळ असतो.आत्मविचाराने मी देहरूप आहे हा विचार नाहिसा होतो.आत्म्याची झोप नाहिशी होते. पण विचाराने प्राप्त झालेली ही जाणीव आहे.पण जीवाला जरी मी देहरूप आहे अशी जाणीव झाली तरी जीव ब्रह्मरूप असतोच.त्याचे ब्रह्मरूपत्व कशानेच नष्ट होत नसते.  फक्त जीवाला त्याची विस्मृती झालेली असते.  मोठ्या प्रयत्नाने तो ती विस्मृती घालवतो.पण ते पुरेसे नाही.कारण त्याला मी ब्रह्म आहे ही जाणीव रहातेच.ही जाणीवही नष्ट व्हावयास पाहीजे.तरच मी खर्या अर्थाने ब्रह्मरूप झालो असे म्हणता येईल.

SHRI DNYANESHWAR EXPLAINS TWO IMPORTANT CONCEPTS VIZ. IDEBTEDNESS TO THE FOUR TYPES OF SPEECH AND THE SLEEP OF THE ATMA.(EGO).THE TYPES OF SPEECH ARE PARA,PASHYANTI ,MADHYAMA AND VAIKHARI.SLEEP OF THE ATMA MEANS FORGETTING THE TRUE NATURE OF ONESELF.THE MAN FORGETS HIS REAL FORM AND THINKS THAT “HE” MEANS HIS BODY.HE CONSIDERS HIMSELF TO BE DIFFERENT FROM THE UNIVERSE.HE FORGETS HIS IDENTITY WITH THE UNIVERSE.THIS AMOUNTS TO ACCEPTANCE OF DWAIT.BUT THROUGH RELENTLESS EFFORTS HE REALISES HIS TRUE NATURE I.E. HIS IDENTITY WITH THE UNIVERSE(PARABRAHM) WHICH EXISTS ALL THE TIME AND IT IS THE ONE WHO DOES NOT HAVE    BIRTH AND DEATH..THE PARABRAHM ALWAYS EXISTS WHETHER ONE TAKES ITS COGNISANCE OR NOT. IT BE UNDERSTSTOOD THAT EVEN WHEN ONE REALISES THE ETERNITY OF PARABRAHM THROUGH RELENTLESS EFFORTS   ONE  IS CONCIOUS OF IT WHEREAS THE EXISTENCE OF PARABRAHM DOES NOT DEPEND UPON SOMEONES ECOGNITION.

१४ ऑगस्ट २०१४

श्रीज्ञानेश्वरकृत अमृतानुभव

वाचाऋणपरिहार , प्रकरण ३ ,ओवी ३.२

एरव्ही परादिका चौघी । जीव मोक्षाच्या उपेगी ।

अविद्येसवे आंगी। वेचिती कीरू ।। ३.२ ।।

एरव्ही पहाता परादिका(परा,पश्यन्ति,मध्यमा व वैखरी)वाणी जीवाच्या मोक्षाच्या उपयोगी(उपेगी) असल्या मुळे अविद्येचा नाश झाल्यावर  त्या वाणी खरोखरच(कीरू)अविद्येबरोवरच,तात्काळ(सवें) लयाला(वेचिती) जातात.

The four modes of speech are useful to a man in his efforts to attain Moksha(salvation) .But they are the creations of Avidya (ignorance).When the ignorance vanishes thae four modes of speech associated with Avidya also vanish.

श्रीज्ञानेश्वर वाणीचे महत्व काय ह्याची चर्चा ह्या ओवीत करत आहेत.मोक्ष मिळवण्यासाठी वाणीचा निश्चितच उपय़ोग होतो.वाणीची निर्मिती ही अविद्येमुळे होते.अविद्या म्हणजे स्वतःविषयी भ्रामक कल्पना .मी म्हणजे माझे शरीर व ते ब्रह्मापेक्षा वेगळे आहे ही ती कल्पना.ही संकल्पना भ्रामक आहे. मी ब्रह्मापेक्षा वेगळा नाही.माझी ब्रह्माशी एकरूपता आहे हेही मी वाणीच्या सहाय्यानेच जाणतो.अविद्येने निर्माण केलेली वाणीच अविद्येच्या नाशास कारणीभूत होते,, अविद्याच नाहिशी झाली म्हणजे तिनी निर्माण केलेली  वाणीही नाहिशी होते.

Avidya is the ignorance about the nature of being.Man thinks about oneself as an assembly of different organs and distinct from the Almighty.Therefore he needs words ro express this relationship.The words are useful to him to understand the relationship.the   creation of words is the outcome of Avidya the    ignorance about oneself .But with the help of these  different modes of speech he realizes the true relationship with the Almighty and his complete integration with it. On realization of Adwait one no longer requires the four modes of speech.It is interesting to note that the  creation of words is the outcome of ignorance (Avidya) and at the same words and the four modes of speech are useful in annihilation of Avidya .

२५ ऑगस्ट २०१४

श्रीज्ञानेश्वरकृत

अमृतानुभव , प्रकरण ३

वाचाऋणपरिहार, ओवी ३.३ – ३.७

देहासवे हात पाये । जाती मनासवे इंद्रिये ।

का सूर्यासवे जाये । किरणजाळ ।। ३.३ ।।

ज्याप्रमाणे देहाबरोबर(देहासवे) देहाचे हातपायही जातात ,मनाबरोबर इंद्रियेही जातात सूर्याबरोबर त्याची किरणांचा समुदायही(जाळ) जातो

Just as when death takes place the hands and feet also die also die ,along with mind  different organs also disappears, when sun sets his  rays also disappear

नातरी निद्रेचिये अवघी । स्वप्ने मरती आधी ।

तेवि अविद्येचे संबंधी । अटती इया ।। ३.४ ।।

किंवा (नातरी) झोप संपली की सर्व(अवघी) स्वप्नेही लयाला जातात त्याप्रमाणे(तेवी) अविद्या नाश पावली की त्याअविद्येबरोबर अविद्येचे कार्य करणार्या चार वाणीही आटतात .त्यांचा अविद्येशी संबंध रहात नाही.

When sleep ends dreams end, similarly when ignorance ends all the four types of speech which create ignorance also disappear

मृते लोहे होती । ते रसरूपे जिती ।

जळोनि इंधने येती । वन्हि-दशे ।। ३.५ ।।

धातु मारली असता भस्मरूपाने ती रहाते .लाकडे जाळली असता अग्नीरूपाने ती रहातात

When metal is melted it remains in the form of liquid, when wood is burnt it remains in the form of fire

लवण अंगे विरे । परी स्वादे जळी उरे ।

नीद मरोनि जागरे । जोइजे निदे ।। ३.६ ।।

पाण्यात मीठ मिसळले तरी ते स्वाद रूपाने रहाते(जिती) .निद्रा(नीद) नाहिशी झाली तरी ,जागेपणाने(जागरे) ती रहातेच

When salt is mixed with water it remains in the form of  flavour ,when sleep ends it still remains in the form of awakening

तेवि अविद्येसवे । चौघी वेचिती जीवे ।

तत्वज्ञानाचेनी नांवे ।उठतिची या ।। ३.७ ।।

त्याप्रमाणे(तेवि) अविद्येच्या नाशाबरोबर चारी वाणी जीवानिशी(जीवे) नाहिशा (वेचिती) झाल्या तरी त्या तत्वज्ञानाच्यारूपाने पुनः उठतात.

In the same way when ignorance dies the four types of speech also die but they remain in the form of philosophy.

द्वैताचा विनाश करून अद्वैताची जाणीव होणे व त्याची मर्यादा कोणती हे ओवी क्र. ३ ते ७ मध्ये स्पष्ट केले आहे.जीव हा ब्रह्मरूपच असतो.त्याला त्याची जाणीव होवो न होवो.ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी श्रीज्ञानेश्वर समर्पक उदाहरणे देतात..सुरवातीच्या दोन ओव्यात मुख्य संकल्पना नाहीशी झाली की तिच्यावर आधारित इतर संकल्पनाही नाहीशा होतात हे प्रतिपादन केले आहे.उदाहरणार्थ , देह नाहीसा झाला म्हणजेच मृत्यू नंतर शरीराचे अवयवही नाहीसे होतात.सूर्य मावळला म्हणजे त्याची किरणेही नाहीशी होतात .झोप संपली म्हणजे स्वप्नेही संपतात.अविद्या नाहीशी झाली म्हणजे अविद्येने निर्माण केलेल्या चारी वाणीही नाहीशा होतात.पण अशा रितीने अद्वैताची जाणीव झाली तरी ती परिपूर्ण नाही कारण ही जाणीव द्वैताच्या विनाशातून झालेली असते ,म्हणजेच द्वैताची आठवण रहातेच.श्रीज्ञानदेव हा विचार चार उदाहरणाने स्पष्ट करतात.जडरूपात असलेले लोखंड नाहीसे केले म्हणजे ते आटवले तरी ते रसरूपाने रहाते.लाकूड जाळले तरी ते अग्नी रूपात रहाते .मीठ पाण्यात विरघळले तरी चवीरूपाने रहाते.झोप संपली व आपण जागे झालो तरी जागेपणाच्या रूपात झोप रहातेच.म्हणजेच झोप संपली ह्या जाणीवेने झोपेची आठवण रहातेच.त्याचप्रमाणे अविद्या(अज्ञान) नाहीशी होण्याबरोबर चारी वाणी नाहीशा होतात खर्या ,पण तत्वज्ञानाच्या रूपाने त्या अस्तित्वात रहातातच.तत्वज्ञान म्हणजे मी ब्रह्मरूप आहे ही जाणीव.

The four types of speech are the creation of Avidya(ignorance) .When ignorance vanishes ,its creation viz. the four types of speech also vanish.ShriDnyaneshwar explains this concept through very apt examples.He says ,When man dies his hands and feet also die The death of mind is followed by the death of all organs  also.When the sleep ends and the man is awakened ,the dreams also vanish.In  the same way the end of ignorance is followed by the end of four types of speech.And the man becomes aware of Adwait the unity…He realizes that Brahm the Almighty is not different from him.He realizes his identity with the Almighty.But according to Dnyaneshwar such identity is not complete. because  such realization leaves behind the traces of Dwait .

The four types of speech help him to understand the Adwait.One always remembers this help given by the speech. Awidya is not totally forgotten.Shri Dnyaneshwar illustrates this point through  four appropriate examples.When iron is melted it still exists in liquid form.When wood is burnt it remains in the form of fire.When salt is mixed with water it leaves behind the salty taste.When the sleep ends and one is awakened  one still remembers  that it is the sleep that has ended.Similarly when the Avidya ,the ignorance.vanishes one still remembers it as the one who helped him to realize his identity with the Almighty.

————–=========

2७ ऑगस्ट २०१४

ज्ञानेश्वरकृत अमृतानुभव

वाचाऋण परिहार.  प्रकरण ३ ,ओवी ३.८

हा तत्वज्ञानदिवा । मरोनि इही लावावा ।

तरी हाहि शीण लेवा । बोधरूपेचि ।। ३.८ ।।

ब्रह्मज्ञान (तत्वज्ञान) झाल्यावर चुकीची  समजूत करून घेणार्या  चार वाणी नाश(मरोनि) पावतात.पण त्या अहं बह्मास्मि हा तत्वज्ञान दिवा लावून नाश पावतात.पण अखंड ज्ञानरूप(बोधरूपेचि) आत्म्याने हा ज्ञानदिवा वागविणे व्यर्थच शीण होय.

On realization of Brahmdnyan the four types of speeches die but before that they light the lamp of my identity with the almighty.However it is fruitless to carry this lamp as Atma is always knowledgeable

अविद्येमुळे चार वाणी निर्माण होतात.अविद्या म्हणजे अद्वैताची जाण नसणे.परब्रह्माची जाणीव नसणे.जीव स्वतःला ब्रह्मापासून वेगळे समजतो. चार वाणींच्या सहाय़्याने जीव स्वतः व परब्रह्म ह्यातील ऐक्य समजाऊन घेतो.खर म्हणजे ते ऐक्य असतेच.पण अविद्येमुळे जीवाला ते समजत नाही.वाणीच्या सहाय्याने मी म्हणजे माझा देह ही कल्पना नाहीशी होते.व मी ब्रह्मरूप आहे हे त्याला जाणवते.अविद्या नाहीशी झाल्यामुळे त्यातून निर्माण झालेल्या चार वाणीही नाहीशा होतात.पण त्या विजताना तत्वज्ञानाचा दिवा लावून जातात.अहं ब्रह्मास्मि मी ब्रह्मस्वरूप आहे हे ते तत्वज्ञान. परंतु ह्या तत्वज्ञानाचा दिवा वाहण्यात काही अर्थ नाही.कारण मी ब्रह्मरूप मूलतःच आहे.त्याचे मला ज्ञान असो वा नसो.

When ignorance disappears,when it dies the four speeches which are the creations of ignorance also die.However before they die they light the lamp of the realization that I am AlmightyDue to ignorance man conceives himself as distinct from Brahm,the almighty.However the   power of speech enables him come out of this fallacious feeling and he realizes that he is Brahm.One may therefore feel obliged to powerful speech.But it is not necessary as my identity with The Almighty  always exists irrespective of whether  I recognize it or  not.It is not new finding.

—–=====

सुप्रभातम्

श्रीज्ञानेश्वरकृत अमृतानुभव

प्रकरण ३ , वाचाऋण परिहार, ओवी ३.९

येऊनि स्वप्न मेळवी । गेलिया आपणपां दावी ।

दोन्ही दिठी नांदवी । निद जैसी ।। ३.९ ।।

झोप आली असता स्वप्ने दिसतात(मेळवी) पण ती गेल्यावर  आपण एकटेच(आपणपां) आहोत हे जाणवते.पण या दोन्ही जाणिवात(दिठी) निद्राच आहे.(नांदवी)

माणूस झोपण्यापूर्वी एकटाच असतो. मी एकटाच आहे असे त्याला जाणवत नसते. पण झोप लागल्यावर त्याला अनेक स्वप्ने पडतात. त्याला अनेकत्वाचे भास होतात.अनेक गोष्टी दिसू लागतात. जागा झाल्यावर त्याला समजते की आपण पाहिले ते स्वप्न होते.खरे काहीच नव्हते.त्याला समजते की आपण एकटेच आहोत. हे एकटेपण स्वप्नातील बहुपणाच्या संदर्भात असते.तेही लटकेच असते.कारण तो मुळचा एकटाच होता.पण त्याला त्याची जाणिव नव्हती.दोन गोष्टी असतील तर एकटेपणाची जाणिव होते.दोनाच्या संदर्भात एक अर्थपूर्ण आहे.एकच असेल तर एकाला वेगळेपण गहातच नाही.

सुप्रभातम्

श्रीज्ञानेश्वरकृत अमृतानुभव

प्रकरण ३, वाचाऋण परिहार , ओवी ३.१०

जीती अविद्या ऐसी । अन्यथाबोधाते गिवसी ।

तेचि यथाबोधेसी। निमाली उठी ।।३.१०।।

जोपर्यंत अविद्या जिवंत आहे तोपर्यंत ती चुकीची समजूत करून देते (अन्यथा बोध) करून देते व जेव्हां ती मरते(निमाली) तेव्हा योग्य समजुतीच्या(यथार्थबोध) रूपाने परत उठते.

So long as ignorance is alive , it creates misunderstanding and when ignorance dies it becomes active in the form of right understanding.

ह्या ओवीत जो विचार मांडला आहे तो वरवर पहाता परस्परविरोधी वाटतो.पण श्रीज्ञानेश्वरांच्या मते तसे नाही.जोपर्यंत अविद्या जीवंत आहे तोपर्यंत ती जीवाच्या मनात विविध भास निर्माण करते.अविद्या म्हणजे अद्वैताचा विसर व द्वैताचे स्मरण.विश्वातील विविधता त्याला अधिक आकर्षित करते.व त्यातील ऐक्याचे विस्मरण होते.ह्यालाच ज्ञानेश्वर अन्यथा बोध असे संबोधतात.पण जेव्हां अविद्या मरते व जीवाला अद्वैत जाणवते व आपले ब्रह्म स्वरूप समजते तेव्हां ती परत जागृत होते.द्वैताची जाणीव नाहिशी होणे म्हणजेच अविद्येचे मरण.पण ती मेली व आपल्याला अद्वैताची जाणीव झाली ह्या प्रक्रियेत मेलेल्या अविद्येची आठवण रहातेच.ती आठवण रूपाने जीवंत रहाते.

The present O`wi reveals subtle meaning of a statement which apparently looks fallacious .the O`wi  refers to man`s ignorance about his relation with the Universe. This ignorance is called Avidya which makes him feel that he is distinct from the universe.He visualizes the universe in multifarious form and not in Adwait(unity) form.So long as this misunderstanding persists it creates illusions in the mind of the perceiver.But it revitalizes when the ignorance dies i.e.when he realizes unity in the universe .When something dies it does leave behind anything which has living part .But this happens .It looks absurd but according to Dnyaneshwar it is not.The next O`wi explains it further

–======

सुप्रभातम्

श्रीज्ञानेश्वरकृत अमृतानुभव

प्रकरण ३,ओवी ३.११

परी जिती ना मेली । अविद्या हे जाकळी ।

बंधमोक्षी घाली । बांधोनिया ।। ३.११ ।।

परंतु(परी) अविद्या जीवंत वस्तु नाही वा मेलेली वस्तुही नाही.पण ती बांधते  व बांधून ती बंधमोक्षाच्या बंधनात घालते  Ignorance(Avidya) is neither alive nor dead but it ties down a man and chains  him in bondage(Bandhan) and freedom(Moksha)

अविद्या म्हणजे अद्वैताचा विसर व द्वैताची जाणीव होणे.अशी ही अविद्या पूर्णपणे नाहीशी होत नाही.ती कोणत्याना कोणत्या स्वरूपात शिल्लक रहातेच हा विचार ह्या ओवीत स्पष्ट केला आहे.अद्वैताचा विसर होणे ही जिवंत अविद्या होय.हा अन्यथा बोध झाला.विचारामुळे जीवाला अद्वैताची जाणीव होते व त्याला द्वैताची जाणीव रहात नाही.ही मेली अविद्या होय.हा यथार्थ बोध होय.अविद्या नाहिशी झाली म्हणजे ती मागे शिल्लक रहाणार माही असा आपला समज होतो.ज्ञानेश्वर म्हणतात प्रत्यक्षात तसे होत नाही.ही मेली अविद्याही द्वैताची जाणीव ठेवतेच.बंधनाची म्हणजेच द्वैताची जाणीव करून देतेच.जीवाला द्वैतातून मुक्ती म्हणजेच मोक्ष मिळावा असे वाटते.थोडक्यात अविद्या जिवंत असो वा मेली असो बंधन व मुक्ती ह्या फेर्यात जीव अडकतोच.

अविद्या म्हणजे अद्वैताचा विसर व द्वैताची जाणीव होणे.अविद्या ही काही वस्तू नाही.त्यामुळे तीच्यासाठी जगणे आणि मरणे संभवत नाही.पण जीव मात्र मी अज्ञानी आहे असा चुकीचा समज करून घेतो. तो खर तर ब्रह्मस्वरूप,सर्वव्यापी आहे .पण तो चुकीची समजूत करून घेतो की मी देहापुरताच मर्यादित आहे.तो ज्ञानस्वरूप आहे पण तो स्वतःला अज्ञानी समजतो व विपरीत कल्पना करतो व स्वतःला बांधून ठेवतो.अशा चुकीच्या कल्पना विचाराने नाहिशा झाल्या म्हणजे मी मुक्त झालो असे समजतो.पण आत्म्याच्या बाबत बंधन व मुक्तता असा भेद नसतोच.जीव असा भेद अविद्येमुळे करतो.

Ignorance (Avidya) is a state of mind which fails to understand unity(Adwait).Failure to understand and repose faith in Adwait is live Avidya and realizing the existence of Adwait is dead Avidya.

सुप्रभातम्

ज्ञानेश्वरकृत अमृतानुभव

वाचाऋण परिहार ,ओवी ३.१२

मोक्षुचि बंधु होये । तरी मोक्ष शब्द का साहे ।

परी अज्ञानघरी वाये ।वाऊगी यांची ।।३.१२।।

मोक्ष हाही जर बंधच आहे तर त्याला मोक्ष शब्द कशाला लावायचा.पण अज्ञान आहे तोपर्यंत उगाचच(वाउगी) बद्धता व मुक्तता ह्या प्रतिष्ठा(वाये) मिरवितात,म्हणजे जीवच अज्ञानामुळे त्या बंध मोक्षाची कल्पना करतो.

If salvation also implies bondage then the word salvation is meaningless. But so long as ignorance(Avidya) exists  the concepts bondage and salvation display their grandeur .In other words it is because of ignorance the man imagines the existence of bondage and salvation.

आपल्याला रोजच्या जीवनात पूर्णपणे एकमेका विरूद्ध संकल्पना अनुभवास येतात.त्यातील एक हजर असेल तर दुसरी असत नाही.उदाहरणार्थ ज्ञान-अज्ञान,सुख-दुःख ,बंधन-मोक्ष इ.ज्ञानेश्वर वेगळे मत मांडतात.रोजच्या जीवनात जीवाला विविध बंधनांना तोंड द्यावे लागते.ही बंधने तो करत असलेल्या कर्मांमुळे निर्माण होतात.अविद्येमुळे तो अद्वैताला विसरतो व तो कर्मांच्या साखळीत अडकतो.ह्या बंधनातून तो मुक्ती मिळवू इच्छितो.म्हणजेच मोक्ष मिळवू इच्छितो.वाचा तथा शब्दांच्या सहाय्याने त्याला अद्वैताची जाणीव होते म्हणजेच त्याला मोक्ष तथा बंधन मुक्ती   मिळते.पण ज्ञानदेव म्हणतात अशा रितीने मिळवलेला मोक्ष बंधनमुक्त नसतो .मी बंधनमुक्त झालो ह्या जाणिवेतच बंधनाची आठवण शिल्लक रहाते व निखळ मोक्षप्राप्ती होत नाही.

In our daily life we often come across mutually exclusive events such as knowledge and ignorance, awakening and sleep, salvation  and bondage. If one of them is experienced the other one is missing.Shri Dnyandeo however argues that it is not always true.For exmple salvation(Moksha) implies that it is free from any bondage. we have in earlier Owi learnt that  it is because of ignorance (Awidya) that man forgets unity(Adwait) and as a consequence is entangled in the vicious circle of (Karma) actitivity.But he is anxious to get freedom from the bondage created by Karma.It is Vacha (language) that helps him to get the most coveted freedom.But he is not completely successful in his endeavour  He still remembers Dwait as he says to himself  “ I am now free from Avidya and Dwait “.Remebering what he wants to forget amounts to not forgetting it.Therefore he argues that if salvation includes bondage why should we call it salvation.

बागुलाचेनि मरणे । तोषावे की बाळपणे ।

येरा तो नाही मा कोणे । मृत्यु मानावा ।। ३.१३ ।।

आईने बागुल आला म्हटले असता खरे वाटून मूल भिते व बागुल मेला असे म्हटले तेहि खरे वाटून मूलआनंदी होते(तोषावे).पण ज्याला बागुल  अस्तित्वातच नाही असे वाटते तो बागुलाचे येणे व मरणे दोन्ही खोटेच मानतो.

A child gets frightened when he is told that a bugbear has come and he  becomes happy when  he is told that the bugbear has gone but one who knows that in reality the bugbear does not exist he treats both the events viz. bugbear coming and going are falsehood.

आूसो हा ज्ञानरूप आहे.त्यामुळे अविद्येमुळे निर्माण होणारी बंधने त्याच्याबाबत निर्माणच होत नाहीत आणि बंधनच नसल्यामुळे बंधनातून मुक्ती देणारा मोक्षही ओसत नाही.ही संकल्पना ज्ञानेश्वर एका लहान मुलाच्या गोष्टीद्वारे स्पष्ट करून सांगतात.रडत असलेल्या मुलाला आई बागुलबुवाची भिती दाखवते व त्याचे रडणे थांबले म्हणजे बागुलबुवा गेला असे सांगते.पण ज्याला माहीत आहे की बागुलबुवा खोटाच आहे त्याला बागुलबुवाचे येणे व जाणे दोन्हीही खोटेच वाटतात.

Because of ignorance(Adnyan) a person assumes that there exists bondage (Bandhan) and salvation (Moksha).But this is a myth.In reality   there is nothing like bondage and salvation.Shri Guru Dnyaneshwar attempts to elucidate this point through a popular children story.A child gets frightened  when he is told that a bugbear has come and feels relieved when he learns that the bugbear has gone. But one who knows that in reality the bugbear does not exist both his coming and going is unreal.Same is the case of Atma.He posses knowledge .He is replete with knowledge.Even a modicum of ignorance does not reside in him.Therefore the phenomenon , the concepts of bondage and salvation are not relevant with reference to Atma.Bondage is created because of ignorance but  ignorance has no relevance with respect to Atma.Therefore as bondage does not exist the question salvation(Moksha) does not arise.

घटाचे नाहीपण  । फुटले याची नागवण ।

मानितसे तें जाण । म्हणो ये की ।। ३.१४ ।।

घट अजून तयार व्हायचा आहे आणि तो फुटला व माझे नुकसान(नागवण) झाले असे म्हणणे  होईल

Just as it is meaningless to say that my earthen pot is broken and I have suffered a great loss when in reality the earthen pot is yet to be prepared.

आत्मा हा पूर्ण ज्ञानरूप आहे. अविद्येमुळे निर्माण होणारी बंधने त्याबाबत अर्थहीन आहेत.आत्म्याला बंध माहीत नाही.त्यामुळे चार वाणींच्या सहाय़्याने अविद्येचा नाश करून बंधनातून मुक्ती,मोक्ष मिळवणे संभवत नाही.तसे करणे म्हणजे घट निर्माण होण्यापूर्वीच तो फुटला व माझे नुकसान झाले असे म्हणण्यासारखे आहे.

It is  a common experience that on many occasions people claim that they have innovated something which already exists .It is often succinctly described as “Reinventing the wheel”. A similar phenomenon is observed in the case of Atma . It never happens that with the help of four Vani ignorance of Atma is removed and its pure, immaculate form is revealed. It is always pure .  Shri Dnyaneshwar explains this phenomenon through an illustration.It is meaningless to say” I have suffered a loss because my pot is broken when actually the pot is not yet manufactured.”

म्हणोनि बंधचि तव वावो । मा मोक्ष के प्रस्तावो ।।

परी मरोनि केला ठावो । अविद्या तया ।। ३.१५ ।।

आत्म्याच्या ठिकाणी बंधन नाही(वावो).तिथे मोक्षाचा प्रश्न निर्माण होत नाही.परंतु अविद्येने मरून मोक्षाला जागा मिळवून दिली(प्रस्तावो) म्हणजेच  अविद्या मेली  मी मुक्त झालो असे जीवाला वाटणे.

Atma is always bondage free and therefore the state of salvation never exists in the case of Atma.But the death of ignorance creates space for the salvation and  the ego feels that it has become free from bondage.

चार वाणींच्या सहाय्याने अविद्येमुळे मिर्माण झालेले बंधन नष्ट होते.आणि मोक्ष प्राप्त होतो.पण बंध पुर्ण नष्ट होत नाही.अविद्येचा ,,बंधनाचा  काही अंश रहातोच.खर म्हणजे आत्मा नित्य मुक्तच असतो. तेव्हा बंध जाऊन मुक्ती मिळण्याचा प्रश्नच् कुठे ऊद्भवतो.उपदेशामुळे अविद्या नाहीशी होते,ती मरते पण आत्म्याच्या ठिकाणी बंधाच स्मरण व मोक्षाची जाणीव ठेवून जाते ही संकल्पना ह्या ओवीत स्पष्ट केली आहे.

The four vani enlightens a person and frees him from the bondage.and attain Moksha the state of salvayion .But in reality   even though freedom is attained it is not complete. Traces of Avidya , ignorance and bondage are left behind ‘One remembers what has been removed and that is the constant reminder of what is removed .But this is not meaningful at all because Atma is aways free from any kind of bondage and removal is irrelevant.

——-====

अज्ञान हे बंध निर्माण करते हे तर सर्वमान्य आहे.पण श्री ज्ञानेश्वर त्यापुढे जाऊन हेही नमूद करतात की ज्ञानसुद्धा बंधन निर्माण करते.आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ते श्री शिव व भगवान श्रीकृष्ण यांचीही मते उद्धृत करतात.भगवान् शंकर ह्यांनी शिवसुत्रात ज्ञानं बन्धः असे म्हटले आहे व भगवान क्षीकृष्ण भगवतगीतेत सांगतात(१४.६)

तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम् अनामयम् । सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ ।

सत्वगुण निर्मल असल्यामुळे तो प्रकाश देणारा व उपद्रवरहित व पापरहित असणारा तो सत्वगुण ,सुखाच्या (मी सुखी आहे) व ज्ञानाच्या (मी ज्ञानी) या दोन पाशांनी बद्ध करतो.

श्री ज्ञानेश्वर पुढे हाही खुलासा करतात की भगवान शंकर व भगवान श्रीकृष्ण हे सांगतात म्हणून आपण ते मान्य करतो असे नाही  तर ते खरोखरीच सत्य आहे म्हणून ते मानतो.

In the following three O`wi Shri Dnyaneshwar quotes the opinions of the great authorities viz.Shri Shiv and shri Shrikrushna.Lord Shiv has expressed his opinion in his treatise Shivsutra, that knowledge creates bondage.Similarly the other great authority Bhagwan Shrikrushna in the Bhawatgeeta ,a guide to human action ,clearly states that even the pious enlightment creates bondage.His words are “

It contains Pious thought and it is clear,without mixture .is illuminator ,not creating any obstacles , but creates the feeling that I am happy and I am learned which  is bondage creator. However Shri Dnyaneshwar ensures that he does not accept the thesis that even the enlightenment is bondage creator just because the great authorities endorse this view but he accepts this view because it is really true

आणि ज्ञान बंधु ऐसे । शिवसुत्राचेनि .मिसे ।

म्हणितले असे । सदाशिवे ।। ३.१६ ।।

भगवान् शंकरानं ज्ञान बन्धः या शिवसूत्रात(मिसे ,निमित्ताने) ज्ञान हेही बन्धच आहे असे म्हटले आहे.

Shri Bhagwan Shankar in his Shivasutra has expressed that knowledge also creates bondage.

आणि वैकुंठीचेनीही सुजाणे । ज्ञानपाशी सत्वगुणे ।

बांधिजे हे निरोपणे । बहु केले ।। ३,१७।।

आणि वैकुंठीचा राजा भगवान श्रीकृष्ण(वैकुंठीचेनीही)  यांनीही (सुजाणे,चांगले जाणणारा)ज्ञानापाशी सत्वगुणाचं बंधन रहाते हे गितेत सांगितले(निरोपणे) आहे.

And the king of Vaikuntha (Heaven) Shrikjushna has also stated that (in Bhagwat Geeta)knowledge, enlightenment is associated with bondage

परी शिवे का श्रीवल्लभे । बोलिले येणेचि लोभे ।

मानू ते हे लाभे । न बोलताही ।। ३.१८।।

परंतु भगवान शंकरानी काय किंवा भगवान श्रीकृष्णानी म्हटले आहे म्हणून आम्ही ते मानतो असे नाही तर ज्ञान खरोखरीच बंधन आहे हे न सांगताही समजण्यासारखे आहे.

We  accept the statement that knowledge also creates bondage not just because it is  endorsed by Shri Shjv and Shrivallabha but we accept it because it is true.

जे आत्मज्ञान निखिळ । तेही घे ज्ञानाचे बळ ।

ते सूर्य चिंती सबळ । तसे नोहे ।। ३.१९ ।।

आत्मा हा सर्वथा(निखिळ) ज्ञानरूपच आहे आणि ज्ञानाच्या सहाय्याने मी बह्मरूप आहे ही जाणीव पक्की (बळ) करणे म्हणजे प्रकाशरूप सूर्याने आपल्या प्रकाश स्वरूपाचे सामर्थ्याने(सबळ) चिंतन करण्यासारखे आहे

Atma is always is  full of knowledge. Therefore it is meaningless to state that with the help of Guru and the four  Vani the ignorance is removed and the knowledge is impregnated into Atma.Such an argument is as absurd as the statement that the self illuminated Sun is illuminated by someone else.

चार वाणींच्या सहाय्याने अज्ञान नाहीसे करता येते.पण ह्या पद्धतीने अज्ञान दूर केले असता आत्मा आणि ज्ञान हे वेगळे आहेत असा समज होतो,पण ते बरोबर नाही कारण आत्मा हा ज्ञानरूपच असतो.ज्ञान काही  नव्याने मिळवायचे नसते.ते आत्म्याबरोबर असतेच. आत्मा अज्ञानरूप कधीच नसतो.त्यामुळे कोणाच्यातरी सहाय्याने अज्ञान दूर करण्याचा प्रश्न निर्माण हात नाही.तसे करणे म्हणजे स्वयंप्रकाशी सूर्याने प्रकाशासाठी दुसर्याची मदत मागण्यासारखे आहे.

Shri Dnyandeo explains in this O`wi the nature of Atma.Atma is always full of knowledge. It is Swayambhu i.e  the knowledge is not impregnated into Atma from outside.Atma does not contain even an ounce of ignorance.It is therefore self defeating  statement that Atma acquires knowledge with the help of Guru and the power of reason  Such a statement would be as absurd as the statement that the Sun who is self illuminated acquires light from other star.It amounts to saying that the Sun forgot that it is always illuminated.

ज्ञाने श्लाघतु आहे । ते ज्ञानपण धाडिले वाये ।

दीप वाचोनि दिवा लाहे । ते आंग भुललाचि की ।।३.२०।।

मी ज्ञानी आहे ,मी ब्रह्म आहे (अहं ब्रह्मास्मि) ह्या जाणीवेने जर जीव आपल्याला धन्य(श्लाघतु) मानू लागला तर आपली अखंड ज्ञानस्वरूपता तो विसरला (भुललाचि) असेच होईल.दिव्याने जर दुसरा दिवा प्राप्तकेला(लाहे)  तर तो स्वतःचे प्रकाशरूप विसरला असेच होईल .

The present O`wi explains the relation between Atma,knowledge(Dnyan) and ignorance(Adnyan).According to Shri Dnyaneshwar the Atma never posses even an ounce of ignorance.It  always posses Dnyan i.e. knowledge .It is as absurd as a lamp trying to acquire another lamp for its illumination

चार वाणींच्या सहाय्याने अज्ञान दूर केल्यावर जीवाला मी ज्ञानी झालो .मी ब्रह्म आहे असे वाटू लागते. आणि त्याचाच त्याला अभिमान,आनंद वाटू लागतो.पण ज्ञानेश्वर म्हणतात हे चुकीचे आहे. आत्मा हा सदासर्वदा ज्ञानरूपच असतो.त्यामुळे त्याचे अज्ञान नाहीसे झाले व तो ज्ञानी झाला असे म्हणणे अर्थहीन आहे.असे वाटणे हेच अज्ञान तथा बंधन आहे.हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वर एक अर्थपूर्ण उदाहरण देतात.ते म्हणतात दिव्याने दुसर्या दिव्याची प्रकाशासाठी याचना करण्यासारखे ते आहे.

One acquires DNYAN(knowledge) with the help of Guru and the four Vani and feels that he has now become fully learned one,He then feels that he has attained the highest position i.e. Brahm.But Dnyaneshwar argues that this is wrong state of mind.This is because Atma always posses knowledge.Then why one should boast that he has acquired Knowledge which implies that it as devoid of knowledge.It never happens that Atma acquires knowledge from outside..Such a statement is self defeating.It amounts to making an invalid statement.It implies that an  illuminated light takes the help of another lamp. It really amounts to saying that it has forgotten that it is already illuminated.

आपणपे आपणापाशी । नेणता देशोदेशी ।

आपणापे गिवसी । हे कीरू होये ।।३.२१।।

आपण आपल्यापाशीच असताना देशोदेशी हिंडून कोणी आपल्याला शोधण्याचा (नेणता) प्रयत्न केला तर तो खरोखरीच (कीरू) सापडेल (गिवसी) असे घडले  का.

Has it ever happened that , someone goes around the world in search of oneself when  one`s body is with himself and he found it  elsewhere?

आत्मा हा नेहमीच ज्ञानमय असतो. ज्ञान त्याला कधीच सोडून जात नाही .आत्म्याला अज्ञान माहिती नाही. असे असताना आत्म्याने कष्ट करून अज्ञान दूर केले व ज्ञान प्राप्त केले हे म्हणणे चुकीचेच आहे.हा मुद्दा ज्ञानेश्वर सहज पटणार्या एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करतात.माणसाचे शरीर हे त्याच्या जवळच असते.पण स्वतःला शोधायला तो बाहेर पडला तर ते त्याला सापडले असे कधी होईल का.हे जितके हास्यास्पद आहे तितकेच अज्ञान दूर करून आत्मा ज्ञानी झाला हे म्हणणे आहे.

In this Owe ,Shri Dnyaneshar explains his thesis that Atma is self made, he is Swayambhu and he is always accompanied by knowledge ..It never happens that he is ignorant and by removing his ignorance he acquires knowledge.(Dnyan i.e.Adwait).He explains this thesis thru an easy to understand simile.If someone says that he went out to search himself and he found himself .Will it not be a very absurd and a self defeating statement. The statement that Atma acquires knowledge by removing ignorance is equally an invalid statement.

परि बहुता का दिया । आपणापे आठवालिया ।

म्हणे मी यया । कैसा रिझो ।।३.२२।।

परंतु एकाद्यान स्वतःला खूप (बहुता)  दिवस (दिया) शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तो सापडला तर त्याला अत्यानंद (रिझो) होईल व त्याचे किती करू असे त्याला होईल

But if someone tried to move out and search oneself and if he does find  himself , he will be very delighted and will be puzzled how to express that joy.

आत्मा हा नेहमी ज्ञानरूपच असतो.त्याला अज्ञान माहिती नाही.तेव्हा चार वाणींच्या सहाय़्याने गुरूकडून अज्ञान दूर करून ज्ञानप्राप्ती केली हे म्हणणे आत्म्या बद्दल चुकीचेच आहे.हे अशक्य आहे.हा मुद्दा पटवण्यासाठी श्रीज्ञानदेव एक अत्यंत समर्पक दृष्टांत देतात.आपण आपल्यापाशीच असतांना जर एकादा स्वतःला शोधायला बाहेर पडला आणि मी सापडलो म्हणून आनंद व्यक्त करायला लागला तर ते किती हास्यास्पद होईल तसेच चार वाणीच्या सहाय़्याने आत्मज्ञान प्राप्त झाले हे म्हणणे चुकीचे आहे.

This O`wi will be more meaningful when read in continuation of the earlier one.If some one really forgets one`s identity and wanders around the world in search of himself and ultimately finds that he is with himself and not outside his body will he not rejoice very much? But is it fair and appropriate to celebrate that success . He realizes that it was futile to do so. His missing , his disappearance and then his discovery ,both were really false.Shri Dnyaneshwar uses this illustration to emphatically present his thesis that Atma is always in possession of  knowledge and to argue that he acquires knowledge from the Guru with the help of language and reasoning is absurd.The absurdity is brought to notice      with strength through another illustration which is equally absurd.

तैसा ज्ञानरूप आत्मा । ज्ञानेचि आपुली प्रमा ।

करितसे सोहमा । ऐसा बंधु ।। ३.२३ ।।

आत्मा हा नेहमीच ज्ञानरूप असतो आणि तोच त्याला जाणतो (प्रमा) आणि मीच ब्रह्म आहे असे समजतो.हाच ज्ञानरूप बंध (बंधु) आहे.

Atma is always in possession of  knowledge. It never contains Avidya i.e. ignorance. Atma recognizes the presence of oneself.This is bondage associated with knowledge.

आत्मा हा नेहमीच ज्ञानरूप असतो.अज्ञानी कधीच नसतो.अज्ञान बंध निर्माण करते गुरूकडून चार वाणींच्या सहाय़्याने अज्ञान दूर करून ज्ञान प्राप्त केले  म्हणजे मी मुक्त झालो.,बंध नाहिसे झाले हे समजणे चुकीचेच आहे.तो मीच आहे (सः अहं) असं जीवाला वाटते. मीच ब्रह्म आहे ही जाणीव होते.पण अशा जाणिवेतच बंधन आहे कारण त्या ज्ञानातच नष्ट झालेल्या अज्ञानाची जाणीव असते.अशा ज्ञानालाच श्रीज्ञानदेव अज्ञान तथा बंध असे म्हणतात.जो जीव तो(सः) आणि मी(अहं) हे वेगळे समजतो , तो अविद्याग्रस्त आहे.ती अविद्या चार वाणींच्या सहाय्याने दूर केली व मी ज्ञानी झालो असे जीवाला वाटते मी ब्रह्म झालो असा जप करू लागतो.मी व तो एकच झालो ह्या जाणीवेतच द्वैत आहे.श्रीज्ञानदेव म्हणतात अद्वैताची जाणीव निखळ,शुद्ध असायला पाहिजे . ती अज्ञानाच्या सापेक्ष असता कामा  नये.

The present O-wi comments on the concept of bondage associated with knowledge acquired through annihilation of ignorance.

जे ज्ञान स्वये बुडे । म्हणोनि भारी नावडे ।

ज्ञाने मोक्षु घडे । ते निमालेनि ।।३.२४।।

जे ज्ञान स्वतः बुडे म्हणजे लीन होते म्हणून त्याला काही किंमत नाही.जे ज्ञान नाहिसे होते ते आम्हाला आवडत नाही(नावडे).कारण हे ज्ञान लीन(निमालेनि) झाल असतानाच मोक्ष प्राप्त होतो.

We do not like, that knowledge which sinks on its own.. knowledge  enables you to reach salvation but only when it extinguishes on its own.

ह्य ओवीत श्री ज्ञानदेव ,ज्ञान,अज्ञान.अज्ञानाचा विनाश व मोक्ष ह्या चार संकल्पनांचे स्पष्टीकरण करतांत व त्यांचे एकमेकांशी असलेले संबंधही स्पष्ट करतात.अज्ञानाचा विनाश करून ज्ञान प्राप्त होते.मोक्ष प्राप्तीहोण्यासाठी अज्ञान नष्ट व्हावयास पाहीजे.

The present Owi explains the relation between knowledge, ignorance, its extinguishing, and salvation, Knowledge obtained by annihilation of ignorance has serious limitations. Ignorance creates bondage and therefore one tries to remove it ,to destroy it and acquire knowledge. But in the process of acquisition of knowledge one always remembers what ignorance  was destroyed and this  process creates bondage and therefore keeps away from salvation. Shri Dnyaneshwar argues that it is possible to attain salvation but only when even the knowledge  too is destroyed.

म्हणोनि परादिका वाचा । तो शृंगारू चौ आंगाचा ।

एवं अविद्या जीवाचा । जीवत्व त्यागी।।.२५।।

म्हणून परा वगैरे चार वाणी ह्या चार देहांचा शृंगार आहे आणि तो अविद्या आहे व जीवाचे जीवपण नाहिसे होते तेव्हांही वाणीच्या आश्रयाने रहातो .

Therefore the Paraa and the four kinds of languages are decoration of body but they actually represent   Ignorance and when one`s life ends it stays in its(vaani) shelter.

आंगाचेनि इंधने उदासु । उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशु ।

करी तेथे भस्मलेशु । बोधाचा उरे ।।३.२६।।

ज्याप्रमाणे आगीत लाकडे टाकल्यावर ती जळून जातात व खाली राख रहाते त्यप्रमाणे चार वाणींच्या आश्रयाने रहाणारी अविद्या वा चार देहांनी युक्त अविद्या यातील जडभाव जळून जाऊन खाली बोधरूप भस्म शिल्लक रहाते.

Just as when wood is thrown into fire it burns and turns into ash ,in the same way the Ignorance which  stays in the shelter of four languages(vani)   also is burnt into ashes but stays behind in the form of   knowledge(Dnyan)

आंगी लाविलिया विभूति । ते परमाणूही झडती ।

परी पांडुरत्वे कांती । राहे जैशी ।।३.२७।।

अंगाला विभूती लावल्यावर त्यातील परमाणू झडून गेल्यावर त्याचा पांढरेपणा शिल्लक रहातो

When ash is smeared all over body ,after sometime ash falls down but its whiteness stays behind.

जळी जळा वेगळु । कापुर न दिसे अवडळु ।

परी होऊनि परिमळु । उरे जेवी ।।३.२८।।

कापूर पाण्यात मिसळला असता कापूर कुठेच दिसत नाही पण सुवासाच्या रूपाने कापूर तिथेच असतो

When camphor is put into water it dissolves in water but it remains there in the form of its fragrance

ना वोहळला आंगी जैसे । पाणी पाणीपणे नसे ।

तर्ही वोल्हासाचेनि भिसे । आथीच ते ।।३.२९।।

स्नान केलेल्या माणसाच्या आंगावर पाणी रहात नाही पण  स्नान केल्याचं चिन्ह म्हणजे ओलावा तो रहातोच

When one takes bath water  flows out and does not remain on body but its dampness stays behind

नातरी माध्यान्ह काळी । छाया न दिसे वेगळी ।

असे पायातळी । रिगौनिया ।।३.३०।।

दुपारच्यावेळी आपली सावली आपल्याला दिसत नाही पण ती आपल्या पायाखाली लपलेली असतेच

We do not see our shadow at noon time but it exists below our feet.

तैसे ग्रासूनि दुसरे । स्वरूपी स्वरूपाकारे ।

आपुलेपणे उरे । बोध जो का ।।३.३१।।

(ज्याप्रमाणे दुपारच्यवेळी आपली सावली आपल्या पायाखालीच असते) त्याप्रमाणे द्वैताचा नाश करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचा बोध होतो

Just as our shadow exists below our foot during noon time) similarly  Atma looses its existence stays behind in the form of its Knowledge(Dnyan)

ते ऋणशेष वाचा इया । न फेडवेचि मरोनिया ।

ते पाया पडोनि मिया । सोडविले ।।३.३२।।

मी ब्रह्म आहे हा बोधच वाचेच ऋण आहे.ते ऋण मरणानंतरही फिटत नसल्याने मी ते गुरूच्या पाया पडून सोडविले आहे.

म्हणोनि परा पश्यंती । मध्यमा हन भारती ।

या निस्तरलिया लागती । ज्ञनी अज्ञानीची ।।३.३३।।

परा वगैरे चार वाणी अज्ञानकालीच भासतात आणि तो भास ज्ञानान नाहीसा करून ,ज्ञानकाली होणार यांचा भास भक्तीन नाहीसा करावा लागतो.