Amrutanubhav Prakaran One शिव-शक्ति समावेशन

by ngbapat36

 

Dnyaneshwari,Amrutanubhav and Changdeo Pasashti are  the monumental contributions of a thirteenth century saint Dnyaneshwar to Marathi literarture and Indian philosophy.The first one is a commentary on Bhagwat Geeta Amrutanubhav is an explanation of what he has experienced in understanding the universal principle “Adwait “ `oneness`and Changdeo Pasashti is a commentary on the Vedic philosophical statement “tat twam  asi”- “it is you”.Dnyaneshwari  is a dialogue between Dnyaneshwar and assembly of people.Amrutanubhav is a dialogue with self ,”Atmsamvad” and Changdeo Pasashti is a dialogue between two,Dnyaneshwar  and saint Changdeo.there are millions who start their day by reading or reciting atleast one shloka/o`wi from Dnyaneshwari or Amrutanubhavor Changdeo

pasashti.Let us  follow them.

 

 

 

 

 

 

 

 

What prompted Dnyandeo to write Amrutananubhav a treatise on Adwait?.A story is often told that when Dnyadeo finished presentatation of Dnyaneshwari he approached his elder brother and his Guru, saint Nivrutinath for his blessings. Nivrutinath commented “ you have done great work of explaining the teachings of Geeta in Marathi to masses and is praiseworthy.But afterall it is a commentary on other`s work.What is your own independent work?It is time you should present it before people.Dnyandeo took Guru`s comment seriously and the outcome was Amrutanubhav based on his Anubhav i.e. self experience.He knew it was a great challenge because it was a Himalyan task of explaining the concept of Adwait ,i.e.”one-ness,unique-ness” a cocept which can`t be explained thru words and that too thru words in a language which does not have a long tradition

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अमृतानुभव-३

 

What is the form of Amrutanubhav?It is poetry.It is written in the form which is often referred to as O`wi. An O`wi consists of 4 parts or Charan.Two charans are written in one line,End of Charan is marked by a vertical line “|” and the end of line is shown by two lines such as “||”.Each Charan consists of few words normally 4 to 5 words.the last Charan is shortest with 2 to 3 words.It would be appreciated that Dnyandeo had mastery over Marathi language and could explain very complicated concepts in few words.O`wi follows discipline of “yamak” i.e. rhyme in the first ,second and third charan.The following O`wi illustrates it.

 

जे एकचि नव्हे एकसरें | दोघां दोनीपण नाहीं पुरें ||

काइ नेणों साकारें | स्वरूपें जियें ||

 

First,second and third charan end with “रें”

 

 

 

अमृतानुभव-४

 

Amrutanubhav is a literary work on Indian philosophy.The basic concept which it attempts to deal with is Adwait-unity.The old masters have written texts elucidating this concept.But it is difficult for a common man to study those texts and understand the philosophy for two reasons ,first the texts are written in Sanskrit language which is not familiar to a common man and secondly the methods of reasoning and the intellectual tools required to understand it are beyond common man`s reach .To circumvent these two difficulties Dnyandeo has used vernacular language Marathi and secondly instead of using very terse language of logic he uses simile to explain the concept of Adwait. Adwait –unity is opposite of Dwait-duality.Dnyadeo first gives an example of duality and then argues that though apparently we notice two different things ,in reality they are not two but one and the same.For this he chooses examples from day to day life .He chooses products and concepts for simile in such a way that every one is convinced of unity not of duality.

Though scientists have tried to classify all matter into few elements their combinations are infinite in number and bewildering .It is stupendous task to find unity in them.Dnyaneshwar has successfully done it.

अमृतानुभव-५

Amrutanubhav is divided into ten parts called Prkaran.Each part consists of a collection of Shlokas/O`wi.Number of Shlokas varies from part to part.The eighth one called Dnyan-khandan has the smallest number (19) while the seventh part called Adnyan-khandan has the highest number (295). The total number of shlokas amounts to 805.

 

Dnyaneshwar was proud of his mother-tongue Marathi and had undertaken the stupendous task of making knowledge, which was until then available only in Sanskrit ,available in Marathi to a common man.He did succeed in this task in his times (13th century).However during the last 700 hundred  years the language Marathi itself underwent major changes.The vocabulary changed .grammar changed ,context changed ,cultural background changed.As a result today`s Marathi common man is unable to understand and appreciate the beauty of this great work.Hence this attempt to present Amrutanubhav to the facebook friends.Hope it would be welcome.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अमृतानुभव-६     प्रकरण-१

शिव शक्ति समावेशन

The first part of Amrutanubhav is titled Shiv-Shakti Samaveshan.It means  integration of Shiv and Shakti.Dwait-duality philosophical thought states that this universe is the creation of blending of Shiv and Shakti.This pair is  referred to by others as Prakruti And Purush , Brahma and Maya ,Deo and Devi,Shambhu and Shambhavi.Their equivalent in day to day life is man and woman,male and female.There are however differences among them in regard to the individual contribution of shiv and shakti .We may also imagine them as mass and energy or Chaitanya and A-chetan.Dnyaneshar gives equal importance to both of them.

There are 65 shlokas in the first prakaran.Though the whole text is written in Marathi the first five are written in Sanskrit .They are written to express his deep sense of respect to his guru Nivrutinath,Shiv and Shakti ,and Shambhu the ultimate creator of this universe.

 

 

 

 

 

 

अमृतानुभव-८  प्रकरण १ शिव-शक्ति समावेशन

 

यद् अक्षरम् अनाख्येयम्,आनन्दम् अज-केवलम् |

श्रीमन् निवृत्तिनाथ इति,ख्यातं दैवतम् आश्रये ||१.१||

 

अक्षरम् म्हणजे अविनाशी,अनाख्येयम् म्हणजे वर्णन करण्यास अशक्य,आनंदमय,अज म्हणजे जन्मरहित,केवल म्हणजे ज्याविषयी अधिक काही सांगता येणार नाही,श्रीमन् म्हणजे ऐश्र्वर्ययुक्त असे ज्याचे वर्णन करता येईल व जे माझे दैवत आहे त्या निवृत्तिनाथांना मी शरण जातो.ह्या ओवीत सगुण अशा निवृत्तिनाथांचे वर्णन निर्गुण,अमूर्त अशा संकल्पनांद्वारे केले आहे.

 

In this first shloka Dnyaneshwar pays heartfelt tibute to his elder brother Nivrutinath and whom he respects as his Guru.He describes his Guru as an embodiment of abstract concepts which are described by adjectives such as Akshar means indestructible,Anakheyam means which cannot be described,Anandam means happiness,Aja means one which exists without birth,keval means unique,Srimat means majestic.With great humility, he says, I bow before him.

अमृतानुभव-९ प्रकरण-१ शिव-शक्ति समावेशन

 

गुरुर् इति आख्यया लोके साक्षात् हि विद्या हि शांकरी

जयति आज्ञा नमस् तस्यै दयार्द्रायै निरंतरम् ।।१.२।।

 

गुरु हे अज्ञानी जीवाला दुःखातून मुक्त करणारी व पूर्ण सुखी करणारी साक्षात ब्रह्मविद्याच आहे. गुरु अत्यंत दयार्द स्वभावाचे आहेत . अशा गुरुबद्दल ज्ञानदेव अखंड आदर व्यक्त करतात.

 

Guru is really Brahmvidya which makes a man free from sorrow and makes him completely happy.His order is respected without a grain of opposition. Guru is compassionate.Dnyaneshwar says “I express my eternal respect towards him.”

 

 

अमृतानुभव-१०

प्रकरण-१ शिव-शक्ति समावेशन

 

सार्धं केन च कस्य अर्धं शिवयोः समरुपिणोः।

ज्ञातुं न शक्यते लग्नम् इति द्वैतच्छलान् मुहुः।।१.३।।

 

दोनपणाच्या द्वारे सतत वेगळे वाटणारे पण एकाच रुपाने असणारे शिव व शक्ति यात कोण कोणाचा अर्धा भाग आहे व त्यांचे ऐक्य केव्हा होते,हे दोघेहि पूर्ण एकरुप असल्यामुळे,कोणी जाणू शकत नाही.

 

Though Shiv And Shakti appear to be different, in reality they are one and the same.Their unity is so thick that one cannot tell who has merged in whom and when did they merge in each other.

 

अमृतानुभव-११

प्रकरण-१ शिव-शक्ति समावेशन

अद्वैतम् आत्मनस् तत्वं दर्शयन्तौ मिथस्तराम्।

तौ वन्दे जगताम् आद्यौ तयोस् तत्वाभिपत्तयो।।१.४।।

 

शिव आणि शक्ति हे दोनपणाने आपल अत्यंतिक एकत्व दाखवित असतात.अशा त्या जगताच्या आद्य माता पितरांना त्यांच तात्विक स्वरुप कळाव म्हणून मी वंदन करतो.

 

Shiv and Shakti through their duality really express extreme unity among them.With a view to understand their real form ,I express my deep respect towards the creators of this world.

 

अमृतानुभव-१२

प्रकरण-१ शिव-शक्ति समावेशन

मूलाय अग्राय मध्याय मूल-मध्य अग्रमूर्तये।

क्षीण अग्रमूल-मध्याय नमः पूर्णायशम्भवे।१.५।

जो जगाचे मूळ ,मध्य आणि अंत असून , मूळ-मध्य-अंत या मर्यादांनी जो साकार झाला आहे आणि ज्याच्या ठिकाणी मूळ,मध्य आणि अंत हे भाव नसून शिवशक्ती स्वरूपातही जो पूर्णच आहे अशा शंभूला नमस्कार असो.

 

अमृतानुभव  ग्रंथाचे सार ह्या श्र्लोकात आहे.ह्या श्र्लोकाला सुभाषिताचे महत्व प्राप्त झाले आहे.शिव-शक्तिचे स्वरूप हा श्र्लोक यथार्थपणे सारऱूपाने मांडतो.

शिव, शक्ति रूपाने प्रगट होतो. हे विश्र्व त्याचीच निर्मिती आहे.पण विश्र्वालातर जन्म मृत्यू आहे.असे असले तरी शिव स्वरूप परिपूर्ण आहे असे ज्ञानदेव विविध ऊदाहरणे देऊन स्पष्ट करतात.

 

I convey my deep respect to Shmbhu who is perfect in all respects, who is the origin, middle and end of  this universe ; and one who is revealed as origin, middle and end and one who does not posses the characteristics, origin,middle and end.

 

This shlok apparently looks like riddle and therefore is very difficult to understand. Dnyandeo has rightly devoted the rest of this chapter to the explanation of the central theme of this chapter through several illustrative examples from day to day life.

ज्ञानदेव मंगलाचरणाच्या पाच श्लोकानंतर पुढील ६४ ओव्यात शिव-शक्तिचे स्वरूप  स्पष्ट करण्यासाठी रोजच्या जीवनातील ऊदाहरणे ,रूपके  देतात.सामान्यांना अद्वैतासारखे तत्वज्ञान समजाऊन सांगण्यासाठी ते आवश्यकच आहे.ज्या संकल्पना शब्दात सांगता येणार नाहीत त्या शब्दात सांगण्याचा हा प्रयत्न आहे.त्यासाठी त्यांनी कोणती ऊदाहरणे घेतली आहेत हे पहाणे ऊद्बोधक ठरेल.ज्ञान व कृती,विषयी व विषय,स्त्री व पुरूष, वीणा व नाद, फुल व सुगंध,दिवा व तेज,ओळ व शब्द,डोळा व दृष्टी,मेहूण व भोजन,गुळ व गोडी,कापूर व परिमळ,सूर्य व तेज,प्रियकर व प्रेयसी,द्रष्टा व दृष्टी,बिंब व प्रतिबिंब,आरसा व प्रतिबिंब, कस्तुरी व परिमळ,अग्नी व ऊष्णता, सूर्य व दिवस-रात्र,प्रणव व अक्षरे,ण व तीन मात्रा, समुद्र व गंगा,वायु व आकाश,सूर्य व प्रकाश, वंदन व अहंकार,सोने व झळाळी , वाच्य व वाचक,सूर्य हाच प्रकाश्य व प्रकाशक , पाणी व तरंग,भूतेश व भवानी,निद्रा व जागृती,चंद्र व त्याचे तेज,मीठ व समुद्र,केळीचे साल व अवकाश.

ज्ञानदेवांनी शिव शक्तिचे द्वैतपण नाहिसे होणे व अद्वैत प्रस्थापित होणे ह्या क्रियेचे वर्णन विविध तर्हेने केले आहे.जगाचे जनक होणे,एकमेकास गिळणे,त्यांच्यातील भेद लाजणे,एकाच वस्तुत्वानं उलटणे,एकपण न फुटणे,एकपणाने नांदणे,जगामध्ये न मावणे , एकमेकांचे प्राण असणे,दंपतीप्रमाणे जागणे , दोनपणाची आटणी करणे,दोघे एकरूप असणे , ब्रह्मरसाचे भोजन घालणे,बुद्धी पांगळी होणे, अद्वैताचा दुष्काळ,अंग सोडणे,दोनपण कालवून एकत्र जेवणे,पहाणारा नाहिसा होणे, अलिंगन देणे,तरंग पाण्यात विरणे, आकाशात विरून जाणे,तरंग पाण्यात बुडी मारणे, तरंगरूपी कळ्यांचा सुगंध घेणे, अलिंगनात आनंद रहाणे            ,भेदरूपी शिरा खाणे, भोग घेणे,

इत्यादी.

ज्ञानदेव शिव शक्ति विषयीचा आदर वेगवेगळ्या शब्दाने व्यक्त करतात. नमस्कार, वंदन,नमन,अलिंगन,शरण जाणे अशा विविध तर्हेने आदर व्यक्त केला तरी त्या सर्वातील भाव एकच आहे आणि तो म्हणजे स्वतःचा अहंभाव सोडणे.

ज्ञानदेव अद्वैत तत्वज्ञान समजाऊन देताना रोजच्या जीवनातील ऊदाहरणे देतात.वाचकांनी ओवीचा शब्दशः अर्थ लाऊ नये.अद्वैताच्या संदर्भातच त्याचा अर्थ समजाऊन घ्यावा. उदाहरणार्थ.सदतिसाव्या ओवीत ज्ञानदेव लिहितात पती जेव्हा झोपी जातो तेव्हा पत्नी सृष्टीला जन्म देते.ह्याचा व्यवहारात अर्थ एक होतो तर अद्वैताच्या संदर्भात वेगळा होतो. अद्वैताचा जेव्हा विसर पडतो तेव्हा विविधरुपी विश्र्व प्रकर्षाने जाणवते हा अर्थ लक्षात घेतला पाहिजे.

 

Dnyandeo, after conveying deep respect to Shiv-Shakti through five shlokas written in Sanskrit language,explains the nature of Shiv-Shakti through examples from everyday life and through similies.It was necessary because the Adwit(unity) concept is an abstract one and difficult to understand.It is an attempt to explain ideas that defy explanation through words.It would be interesting to know what illustrations he has chosen for that purpose. They are :

Knowledge and work,man and woman,vocal instrument and sound,flower and scent,lamp and light,eye and sight,married couple and meals,sugar and sweetness,camphor and fragrance,sun and light,lover and loved,seer and sight,image and its reflection,mirror and reflection,musk and its` fragrance,fire and heat,Om and letters,ocean and Ganga,to bow and ego,gold and  glitter,speaker and speech, lighter and what is lighted,water and ripple,sleep and awakening,moon and moonlight,salt and ocean,banana skin and space.

Dnyandeo has described the process of disappearance of Dwait(Duality) and establishment of Adwait(Unity) in different words and phrases, such as becoming the creator of world, gulping each other,blush their difference, nondestruction of their unity,remain united, not to be contained in this world,be eachothers breath,live like a married couple, deplete duality,integrate into one,feed the essence of eternity,cripple the intellect, scarcity of unity,mixing duality and eating it, merging the waves in water, disappearance of a seer,merge in sky,waves plunge into water,smell the fragrance,enjoy a hug,eat the sweetened duality,enjoy.

 

Dnyandeo expressed his deep respect in different words such as greet,bow, surrender, embrace,obeisance,salute etc. but all words convey surrender of ones` ego.

 

While explaining his philosophy of Adwait(unity) Dnyaneshwar gives illustrations from everyday life but one has to be very careful while interpreting it .Reader should not interpret it literally.The shlok should be interpreted with reference to the Adwait concept.For example the shlok no.37 refers to the sleep of husband and the engagement of wife in outer world. In ordinary parlance this has bad connotation but  its philosophical meaning is that when one forgets the Adwait(unity) the diversity in the universe becomes prominent.

 

प्रकरण-१ शिव-शक्ति समावेशन

ऐशी ही निरूपाधिके।जगाची जिये जनके।

तिथे वंदिली मिया मूळिके।देवोदेवी।।१।।

 

निरूपाधिके-उपाधिरहित,गुणरहित;जनके-मातापिता,मुळिके-मूळ,आद्य;देव-शिव,देवी-शक्ति.

 

जी जगाची मातापिता आहेत, जी गुणरहित आहेत आणि जी जगाची मूळ कारण आहेत अशा ह्या देवोदेवींना मी वंदन केले.येथे देव-देवी म्हणजेच शिव-शक्ति होय.ती निरूपाधिक

आहेत म्हणजे त्यांचे कोणत्याही शब्दाने वर्णन करता येत नाही.

 

I paid deep respect to Deo-Devi  who are mother and father of this world,  who do not possess any attribute,  who are the origin of this world ,and who cannot be described by any word .

 

 

अमृतानुभव१५

प्रकरण-१ शिवशक्ति समावेशन

जो प्रीयुची प्राणेश्र्वरी।उलथें आवडीचिये सरोभरी।

चारुस्थळी एकाहारी।एका आंगाची ।।२।।

जो पती तोच पत्नी झाला,प्रेमाचे वेगाने आत्मस्वरूप,वृत्तिरूपाने आपल्याच ठिकाणी एकाच सत्तेवर व एकाच वस्तुत्वाने उलटते.

प्रियुची-शिव,प्राणेश्र्वरी-शक्ती,सरोभरी-वेगाने. आवडीचे-शिव,ब्रह्म हा एकटा असतो.आपल्या एकटेपणाचा त्यास कंटाळा येतो,त्याला दुसर्याशी संवाद करावासा वाटतो,ते त्याला आवडते आणि तो शक्तीरूपाने प्रगट होतो.ही क्रिया ह्मणजेच उलथने, उलथे.पण अशारितीने अद्वैताचे द्वैतात, दोनपणात रूपांतर झाले तरी शिव व शक्ती वेगळे होत नाहीत ते एकच असतात.चारुस्थळी म्हणजे शिवाच्याच, अद्वैताच्याच ठिकाणी, एकाहरी म्हणजे ऐक्याने रहातात.

 

Husband became wife and at a very fast rate unity i.e. oneness fastly converted into duality and merged in each other .

 

Unity i.e. oneness is alone and gets bored of its loneliness.It likes to talk to someone, establish dialogue with some one  and Shiv the unity expresses itself in the form of Shakti at a fast rate (Sarobhari).Dnyandeo calls this process by the word “Ulathe”.However this does not result in the creation of two different things.The result is one thing.Dnyandeo says they live together (Ekahari) and where do they live? .He says they live “Charusthali” i.e. in itself,in the form of Shiv himself.

 

 

 

 

 

 

 

 

 

अमृतानुभव-१६

प्रकरण-१ शिव शक्ति समावेशन

 

आवडीचेनि वेगे।एकएकाके गिळिती आंगे।

की द्वैताचेनि पांगे।उगळिते आहाती।।३।।

 

शिव व शक्ति ह्यांचे प्रेम अत्यंत गाढ असते आणि त्यामुळेच ते अत्यंत वेगाने एकमेकाला गिळतात व दोनपणाचे अंगच उरू देत नाहीत.

द्वैताच्या आश्रयाने ते उगाळतात म्हणजे प्रगट होतात.

ह्या ओवीत ज्ञानदेव शिव व शक्ति ह्यांच्यातील प्रेम किती उत्कट व घट्ट आहे ह्याचे वर्णन करतात व त्याची परिणती कशात होते हे सांगतात.ते एकमेकाला गिळतात असे ते सांगतात.ते एकमेकात पूर्णपणे विलीन होतात.जोपर्यंत ते पूर्णपणे मग्न आहेत तोपर्यंत ते एकरूपातच राहतात. पण जेव्हा त्यांना प्रेमाची जाणीव होते तेव्हा द्वैत निर्माण होते.जाणीव होणे ह्या प्रक्रियेत ज्याला जाणीव होते तो व ज्याची जाणीव होते ते असे द्वैत,दोनपण निर्माण होते.प्रेम हे द्वैताचा नाश करते आणि जाणीव हे द्वैत निर्माण करते.

Shiv and Shakti have very close relationship and therefore they gulp each other at a very fast rate with the result that their independent identities are completely lost.When they become conscious of their love they again become two different identities because consciousness implies two,one who becomes conscious and second the thing about which he becomes conscious. Love destroys seperateness and consciousness creates seperateness.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रकरण-१ शिव-शक्ति समावेशन

जे एकचि नव्हे एकसरे।दोघा दोनपण नाहीं पुरे

काय नेणो साकारे।स्वरूपे जिये।।४।।

 

शिव नेहमीच एकरूप असतो असे नाही.शिव-शक्तिरूपाने दोनपणात प्रगट होतो.पण ते कसे दोनपणात साकार होते हे सांगता य़ेत नाही.

 

शिव म्हणजेच अद्वैत.द्वैत हे अद्वैताचीच निर्मिती आहे.ते अद्वैतापेक्षा वेगळे नाही.पण अज्ञानी माणसाला तेच अद्वैत, द्वैत दिसते. ज्ञानी माणसाला मात्र ते अद्वैत दिसते.शिव आणि त्याचे स्फुरण तथा प्रगटीकरण ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत.आत्मा किंवा ब्रह्म ह्या शब्दानिही अद्वैत असे संबोधले जाते.

 

 

 

 

 

 

 

Shiv expresses himself in unity form but not always. Shiv does not necessarily exist only in Adwait (oneness) form. Sometime he manifests in duality (Dwait,Shakti) form .But how the manifestation takes place can`t be explained.

 

Sometime he expresses himself in Dwait (Duality) form too.However though the form is Dwait it is not different from Adwait.Ignorant person visualizes it as Dwait. Knowledgeable person recognizes the unity in diversity.Shiv the Adwit and its manifestation in Shakti, the dual form, are not different from each other.But it is not known how this manifestation of unity in diversity takes place.

 

 

 

 

 

 

 

 

अमृतानुभव १७

प्रकरण-१ शिव-शक्ति समावेशन

कैशी स्वसुखाची अळुकी।जे दोनीपण मिळुनी एकी।

नेदेतीच कवतुकी । एकपण फुटो।।.५।।

शिव शक्ति ह्यांना आपल्या सुखाची इतकी गोडी(आळुकी) आहे की शिव शक्ति रूपाने दोनपात प्रगट झाले तरी,त्यांचे दोनपण मिळुन एकपणच असते.त्यांचे एकपण गमतीखातरही फुटत नाही.

 

शिव हा मुलतः आत्मस्वरूपात असतो .पण त्याला स्वतःलाच पहाण्याची, उपभोगण्याची इच्छा होते .आपल्यालाच पहाण्यासाठी आपण जसे आरशासमोर उभे रहातो त्याप्रमाणे शिव शक्तिरूपात स्वतःला पहातो ,पण त्यामुळे त्यांच्यातील एकत्व नाहीसे होत नाही,ते फुटत नाही वा वेगळे होत नाही.

Shiv and Shakti develop so intimate lust for for eachother that even though they express themselves in duality form their duality is in reality unity.Their unity is not broken even as a fun.Even in lighter mood they do not disintegrate. Just as one looks into mirror to see oneself Shiv sees himself in Shakti but that does not create two different things.They are still one and only one.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रकरण १

शिव शक्ति समावेशन

हा ठावोवरी वियोग भेडे।जे बाळ जगा एवढे।

वियाली परी न मोडे।दोघुलेपण।।६।।

वियोगाच्या भीतीने या शिव शक्तीच्या दोनपणाच्या ठिकाणीच शक्तीने,जगाएवढ्या बाळाला जन्म दिला(वियाली). पण शिवशक्तीच्या दोनपणात बिघाड(मोडे) झाला नाही.

शिव शक्तीचे दोनपण अधिक स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव रोजच्या जीवनातील उदाहरण देतात.पती पत्नींचे प्रेम अपत्याच्या जन्मानंतर जसे अधिक दृढ होते तसेच शिव शक्तीचे ऐक्य हे त्यांनी निर्माण केलेल्या

विश्र्वरूपी बाळामुळे अधिक घट्ट होते.
Afraid of pangs of separation Shakti gave birth to a child in the form of Universe but that did not  result in the breakdown of their duality.

To make his point more clear,Dnyandeo gives an example from day today life.Just as husband and wife give birth to a child as an expression of their love and which would keep their togetherness, and yet  remain separate ,Shiv and Shakti too behave in the same way.Shakti gives birth to this universe out of fear of separation and loss of interest in each other.However that does not endanger their seperateness.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अमृतानुभव-१८, प्रकरण-१

आपुलिये आंगी संसारा।देखिलिया चराचरा।

परी नेदितीच तिसरा।झोंक लागो।।७।।

आपल्या अंगावर चराचर संसाराची उभारणी पाहिली तरी शिवशक्ती आपल्या दोघाहून निराळ्या तिसर्याचा स्पर्श(झोंक) होऊ देत नाहीत.

शिव व शक्ति यांचे ऐक्य या पूर्वी स्पष्ट करून सांगितले आहे.या ओवीत ज्ञानेश्र्वर शिवशक्ती व त्यांनी निर्माण केलेले विश्र्व ह्यातील ऐक्य स्पष्ट करून सांगत आहेत. शिवशक्ती हे विश्र्वाचे कारण आहे आणि विश्र्व हे त्यांचे कार्य आहे.शिव, शक्ति व विश्र्व ह्या तीन वेगवेगळ्या वस्तू नाहीत तर ती एकच अभेद्य वस्तू आहे.सोने व त्याची चकाकी जसे वेगळे नाहीत तसे .

Dnyandeo had explained unity among Shiv and Shakti in earlier shlokas.He explains in this shloka, unity among Shiv,Shakti and the universe that Shiv-Shakti had created.He argues that though Shiv-Shakti have given birth to the universe and is the creator of the universe ,the child universe is not an entity separate ,distinct from the creator.They have ensured that the child does not acquire the characteristic of distinct separateness.The three form unity.In other words he establishes unity between the cause(Shiv-Shakti) and the effect (universe).

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अमृतानुभव १९

प्रकरण १   शिवशक्ति समावेशन

जया एकसत्तेचे बैसणे।दोघा एका प्रकाशाचे लेणे।

जे अनादि एकपणे । नांदती दोघे।।८।।

 

ज्या शिवशक्तीला एकासत्तेचे बैसणे आहे व एकाच प्रकाशाचे दोघांनाही लेणे(अलंकार) आहे अशी ही दोघे अनादी एकपणाने नांदतात.

 

या ओवीत ज्ञानदेव हे स्पष्ट करतात की शिवशक्ति एकाच ठिकाणी असतात(एकसत्तेचे बैसणे) व दोघेही चैतन्यस्वरूप(एका प्रकाशाचे लेणे) आहेत.अनंत काळापासून ते एकत्र नांदत आहेत.ते अविनाशी आहेत.कार्य आणि कारण हे भिन्न ,वेगळे नाहीत ही त्यामागील मुख्य भुमिका आहे.

Dnyandeo states in this shloka that Shiv and Shakti  both exist together and at the same place.Both are adorned by light and they exist together from time immemorial.Both are full of energy.They never leave each other and remain together.They occupy the same space.Their living together is not occasional or of recent origin.Their unity exists from ancient times.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

M

 

 

 

अमृतानुभव २०

कप्ररण १, शिवशक्ति समावेशन

भेदु लाजोनि आवडी।एकरसीं देंत बुडी।

तो भोगणेया थांब काढी।अद्वैताचा जेथ।।९।।

शिव व शक्ति यांच्यातील भेद ,त्यांच्या परस्परात असलेल्या अत्यंत आवडीला पाहून लाजला व त्याने त्यांच्या परमप्रेमात बुडी मारली.तो आनंद भोगण्याकरिता भेद आनंदाचा शोध घेण्यास गेला,पण द्वैताचा शोध न लागता तो अद्वैताचा भोक्ता झाला.

शिव आणि शक्ति यांचे प्रेम अत्यंत दृढ असते.त्यांची एकमेकांबद्दल असलेली अत्यंतिक आवड पाहून भेदही शरमला,लाजला.त्याला वाटत होते की शिव व शक्ति हे भिन्न, वेगवेगळे आहेत.म्हणून तो भेद,द्वैत  शोधण्यासाठी गेला परंतु प्रत्यक्षात त्याला एकता, अद्वैत दिसले.

 

 

Shiv and Shakti apparently appear to be distinct and different.However the distinction was very bashful when it noticed very close intimacy between the two and to share their intimacy it jumped into their love.It expected Dwait,duality in them but it found Adwait,unity between the two.

 

 

अमृतानुभव २०

प्रकरण १, शिवशक्ति समावेशन

जेणेदेवे योगानेच संपूर्ण देवी।जियेविण कांही ना तो गोसावी।

किंबहुना एकोपजीवी।एकएकांची।।१०।।

 

देवाच्या(शिव) योगानेच देवी(शक्ति) संपूर्ण आहे. शिवामुळेच शक्तिला पूरणत्व येते.शक्तिवाचून शिव काही नाही असा होतो.शिव व शक्ति एकमेकावाचून रहातच नाहीत.

 

शक्तीत शिव आहे व तसेच शिवात शक्ति आहे.शिव व शक्ति हे जरी दोन वेगळे शब्द असले, त्यात द्वैत दिसत असले तरी त्यांचे अत्यंत ऐक्य आहे (एकोपजिवी).एकच वस्तु ज्ञान देव व देवी या दोन नावाने संबोधले जाते.शिव म्हणजेच शक्ति व शक्ति म्हणजेच शिव.शक्तिवाचून शिव काही नाही (गोसावी) असा होतो.

 

In this O`wi Dnyandeo explains the relation between Deo(Shiv) and Devi(Shakti).He emphatically states that though Deo and Devi are two different words the two are not two different entities.They are one.Deo includes Devi and Devi includes Deo.If one is absent the other becomes non entity,a non performer.The two are strongly attached to each other.The presence of one gives completeness to other.It makes other more meaningful.

 

अमृतानुभव २१   प्रकरण १

शिवशक्ति समावेशन

कैसा मेळु आला गोडिये।दोघे न माती जगीं इये।

की परमाणुमाजी उवायें।मांडली आहातीं।।११।।

शिवशक्तीच्या प्रेमाचा असा काही मेळ झाला आहे की ,दोघे वेगळेपणाने जगामध्ये मावत नाहीत(न माती).परमाणु परमाणूत ते प्रगट असतात(उवाये) तरी जगात मावू शकत नसल्यामुळे, जगाहून उर्वरितही राहिले आहेत.

शिवशक्तीतील प्रेमाचे स्वरूप कसे असते ,विस्तार किती असतो हे ह्या ओवीत स्पष्ट केले आहे.त्या दोघातील प्रेम  इतके घनदाट आहे की ते विश्र्वातील प्रत्येक अणुरेणूत प्रगट होते आणि तरीसुद्धा ते शिल्लक रहाते.ते दोघे एकमेकाला अत्यंत आवडतात आणि त्या आवडीमुळे त्यांचा विस्तार एवढा वाढतो की ते जगात मावत नाहीत.

 

The present O`wi is devoted to the explanation of the nature and extent of unity between the two.They like each other and  they expand and grow to such an extent that they appear and exist in each and every atom in this universe and yet you find  their residual.Their unity remains intact.

 

 

 

 

 

अमृतानुभव-२२, प्रकरण-१

शिवशक्ति समावेशन

जिही एकएकावीण।न कीजे तृणचेही निर्माण।

जिये दोघे जीवप्राण।जिया दोघा।।१२।।

शिव आणि शक्ति हे स्वतंत्ररित्या ,एकमेकावाचून एकटे गवतही निर्माण करू शकत नाहीत.ते दोघे एकमेकांचे जीव की प्राण आहेत .एक क्षणभरही ते एकमेकापासून वेगळे राहू शकत नाहीत.

ज्ञानदेवांचा शिव आणि शक्तीविषयी वेगळा ,स्वतंत्र विचार आहे.सांख्यांचा प्रकृती व पुरूष किंवा वेदांतातील ब्रह्म व माया याविषयीचा विचार वेगळा आहे.त्यांच्या दृष्टीने दोघांना कमी अधिक महत्व आहे.ज्ञानदेव मात्र दोघांना समान महत्व देतात.ते प्रतिपादन करतात की शिव वा शक्ति स्वतंत्रपणे साधी गवताची काडीही निर्माण करू शकत नाहीत. ते एकमेकांशिवाय क्षणभरही वेगळे राहू शकत नाहीत.

The universe is the outcome of coming together of Shiv and Shakti.Such a pair of contributors is referenced in different ways by Sankhya ,Vedanti and others.Apart from difference in names there is fundamental difference arising from importance attached to each of them.Dnyandeo gives equal importance to each member of the pair ,whereas the others do not.He emphatically states that none of them is capable of ,individually, creating even a leaf of grass. They love each other so much that they can`t leave separately.

अमृतानुभव-२३ प्रकरण-१

शिव-शक्ति समावेशन

घरवाते मोटकी दोघे।जे गोसावी सेजे रिघे।

तै दंपत्यपणे जागे।स्वामिणी जे।।१३।।

ह्या चराचर सृष्टीत(घरवाते) केवळ शिव व शक्ति हे दोघेच आहेत.जेव्हा शिवरूप गोसावी झोपतो(सेजे रिघे) तेव्हा एकटी शक्ती दोघांच्या रूपाने(दंपतीपणे) जागते.

शिव,शक्ती व विश्र्व यातील नेमके संबंध(मोटके) स्पष्ट करण्यासाठी  ज्ञानेश्र्वरांनी पतीपत्नी ह्या युगुलाचे रूपक घेतले आहे.ह्या जगात फक्त शिवशक्तीच आहे.व्यवहारातही आपण अनुभवतो की पती बाहेर गेला असता पत्नीच सर्व व्यवहार पाहते.शिव जेव्हा झोपी जातो म्हणजे अद्वैताचे जेव्हा विस्मरण होते तेव्हा शक्ती (पत्नी) सक्रीय होते व जगातील विविधता प्रकर्षाने प्रगट होते.ह्यालाच ज्ञानेश्र्वर

दंपतीपणे जागे असे म्हणतात.

The present O`wi is devoted to the explanation of relation between universe and Shiv-Shakti.Shiv is an embodiment of unity(Adwait) .When he is inactive ,Shakti becomes active.Instead of unity variety,difference becomes prominent.When Shiv goes to sleep, Shakti represents both Shiv and Shakti. This concept is explained by a simile of Husband and Wife .When husband is occupied in outdoor duties wife takes the role of both husband and wife.

.

 

 

अमृतानुभव-२४  प्रकरण-१

शिवशक्ति समावेशन

जया दोघामाजी एकादे।विपाये उमजले होय निदे।

तरी घरवात गिळोनी नुसुधे।काही ना करी।।१४।।

या दोघांमध्ये जर(एकादे) कदाचित्(विपाये) ज्ञान स्फुरले(उमजले) तर संपूर्ण विश्र्व प्रपंच(घरवाते) गिळून शिवशक्ति नुसते निष्क्रिय होतात.

शक्ती म्हणजे चैतन्य,विविधता.शिवतत्व म्हणजे ऐक्य,अद्वैत.ह्या दोघांमध्ये जर यदाकदाचित् ऐक्य, अद्वैतभाव प्रगट झाला तर हे विविधतेने नटलेले विश्र्व नष्ट,नाहीसे होईल.ते निष्क्रीय होईल.दोघांच्यात जर एकच भाव निर्माण झाला तर शक्तीभाव,द्वैतभाव नष्ट होईल.कारण शिवतत्व,अद्वैत कधीच नष्ट होत नाही.

The present O`wi explores the thought:what will happen if both Adwait and Dwait think the same way?Dnyandeo argues that Adwait will prevail forever.It does not have death.Gharwate i.e.the universe with its variety will vanish.It will die.Shakti is active.It stands for variety.It chracterises birth and therefore death.

 

 

 

 

अमृतानुभव-२५  प्रकरण-१   शिवशक्ती समावेशन

दोहो आंगांची आटणी।गिंवसीत आहाती एकपणी।

जाली भेदाचिया वाहणी।आधाधी जिये।।१५।।

शिवशक्ती ही आपल्या एकपणात आपल्या दोनपणाची (दोहो आंगाची) आटणी करतात,म्हणजे दोनपणा भासूच(गिवसित) देत नाहीत अणि ते दोघे दोनपणाच्या प्रवाहात(वाहणी) अर्धे अर्धे(आधाधी) असतात.दोघांचा समान वाटा असतो.

ह्या ओवीत शिव व शक्तींचे त्यांच्या दोनपणातील ऐक्य स्पष्ट केले आहे.शिव हा विश्र्वाचा निर्माता आहे.तो अद्वैत म्हणजे एकटाच आहे.पण पण ह्या एकटेपणाचा कंटाळा आल्याने तो दुसर्याशी संवाद साधू इच्छितो व शक्तीची निर्मिती करतो.ह्यातूनच द्वैत निर्माण होते.ज्ञानदेव स्पष्ट करतात की असे असले तरी त्यांच्यातील ह्या दोनपणाची आटणी होउन त्यांच्यातील एकत्वच प्रस्थापित होते व एकपणात दोघांचा समान(आधाधी) वाटा असतो.

The present O`wi explains the relation between Shiv and Shakti.Shiv the creator of this universe felt loneliness and therefore desired to converse with someone and out of this desire he created Shakti,and in this process two ,duality is created.Though outwardly they two different things in reality it is not so.They are together and one.There is unity among them and both share equal status

 

अमृतानुभव-२६  प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

विषो एकमेकांची जिये।जिये एकमेकांची विषयी इये।

जिही दोघी सुखिये।जिये दोघे।।१६।।

शिवशक्ती परस्परांचे विषय आहेत व तसेच परस्परांचे विषयी आहेत.परस्परांच्या सहाय्याने परस्पर सुखी होतात.

शिव व शक्ती हे ह्या विश्र्वाचे समान महत्वाचे घटक आहेत हे ह्यापूर्वीच्या ओव्यात स्पष्ट केले आहे.ह्या ओवीत ते दोघे एकमेकाला सुखी कसे करतात हे सांगितले आहे.

ते एकमेकाला जाणतात,एकमेकाला जाणून घेतात.तसेच ते एकमेकाचे विषय होतात.म्हणजे जे जाणून घ्यावयाचे आहे ते.दोघेही समान महत्वाचे आहेत.जेव्हा एकजण दुसर्याला जाणतो तेव्हा दुसरा जाणण्याचा विषय होतो.दोघेही एकमेकाला जाणतात व त्यामुळे दोघेही जाणण्याचे विषय होतात.ह्या प्रक्रियेने ते एकमेकाला सुखी करतात.

In the earlier Shlokas Dnyandeo has emphatically stated that both  Shiv and Shakti are of equal importance.The present O`wi explain how they make each other happy.They know each other intimately.The process of knowing involves two parties :one who knows other and secondly one who is known by other.Shiv and Shakti assume both the positions :one who knows other and one who is known and thereby make each other happy.

 

अमृतानुभव-२७ प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

स्त्रीपुरूष नामभेदे।शिवपण एकले नांदे।

जग सगळे अधाधे-।पणे जिही।।१७।।

शिव आणि शक्ती यांच्यात स्त्रीलिंगी व पुरूषलिंगी नावे एवढाच भेद आहे.कारण दोन्ही ठिकाणी एक शिव हीच वस्तू आहे.स्त्रीवाचक व पुरूषवाचक शब्दाच्या दोनपणाने संपूर्ण जग शब्दापुरतेच दोनपणाने विभागले आहे.म्हणून शिवशक्तिपासून जग म्हणून काही वेगळी वस्तू निर्माण झाली आहे असे नाही.

Shiv and Shakti are nodoubt two different names and suggest two different sexes : male and female.But this difference is restricted to names only.It does not suggest that a new different world is created.Everywhere it is Shiv principle that prevails.Whether Shiv appears in the form of Shakti or world it is Shiv that appears everywhere.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अमृतानुभव-२८ प्रकरण-१ शिवशक्ती समावेशन

खालील दोन ओव्यात ज्ञानेश्र्वर रोजच्या जीवनात प्रत्येकाला येणार्या अनुभवाचा संदर्भ देऊन अद्वैतासारखी अवघड संकल्पना सामान्य माणसालाही समजाऊन देतात.दोन टिपर्या,दोन फुले,दोन दिवे,दोन डोळे,दोन ओठ हे सगळे दोन दोन आहेत पण त्यातून जे निर्माण होते ते एकच आहे.

 

दो दांडी एकी श्रुती।दोहो फुली एकचि दृति।

दोहो दिवी दीप्ती।एकीची जेवी।।१८।।

ज्याप्रमाणे दोन वीण्यातून एकच नाद निघतो,दोन फुलात एकच सुगंध असतो,दोन दिव्यात एकच तेज असते त्याप्रमाणे शिव व शक्ती एकच आहेत.

Just as striking two sticks generate one sound ,two flowers generate one scent ,two lamps generate one light,Shiv-Shakti are not two but one.

दो ओठी एकी गोष्टी।दो डोळा एकी दृष्टी।

तेवी दोघी जिही सृष्टी।एकीचि जे।।१९।।

दोन ओठात एकच शब्द,दोन डोळ्यांची एकच दृष्टी असते त्याप्रमाणे या सृष्टीत शिवशक्ती ही दोघे एकरूपच आहेत.

Just as two lips generate one word,two eyes see one picture,similarly Shiv And Shakti are not two different things but one.

 

 

अमृतानुभव-२९ प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

दाऊनी दोनीपण ।एकरसाचे आरोगण।

करीत आहे मेहूण।अनादि जे।।२०।।

शिवशक्ती दांपत्य(मेहुण) अनंत काळापासून(अनादि) आहे.आपल्या ठिकाणी दोनपण दाखवून ते एकमेकांना आनंदाचे(एकरसाचे) भोजन(आरोगण) घालते.

Shiv-Shakti couple exists from ancient times.It exhibits duality and thereby it feeds meals of happiness to each other.

जे स्वामीचिया सत्ता ।वीण असो नेणे पतिव्रता।

जियेवीण सर्वकर्ता।काही ना जो।।२१।।

शक्ती ही अत्यंत पतिव्रता स्त्री आहे.ती पतीवाचून क्षणभरही राहू शकत नाही.आणि ह्या विश्र्वाचा सर्वकर्ता शिव तिच्याशिवाय काहिही करू शकत नाही.

Shakti is a very faithful wife.She cannot live without Shiv ,her husband, even for a moment.Similarly.Shiv cannot do anyting  without  Shakti,his wife.

वरील दोन ओव्यात ज्ञानदेव शिव व शक्तीचे वेगळेपण,

व त्याचबरोबर त्यांच्यातील ऐक्य स्पष्ट करून सांगत आहेत.आपल्यातील दोनपण दाखवून ते आनंद मिळवतात.ते आनंदाचे भोजन एकमेकांना देतात असा कौटुंबिकजीवनातील दाखला देतात. एकमेकांशिवाय ते जगुही शकत नाहीत.

अमृतानुभव-३० प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

जे कीं भाताराचें दिसणें।भातारू जियेचे असणें।

नेणिजती दोघेजणे।निवडूं जिये।।२२।।

शक्ती(पत्नी) ही आपल्या पतिची(शिवाची) दृष्टी(दिसणे) आहे आणि शिव हा शक्तीचे अस्तित्व(असणे) आहे असे हे दोघेजण एकमेकापासून निवडून वेगळे करता येत नाहीत.

Shakti(wife) is vision of Shiv(husband) and Shiv is the very existence of Shakti and the two cannot be consciously separated from each other.

गोडी आणि गुळु।कापुर परिमळु।

निवडु जाता पांगुळु।निवाडु होय।।२३।।

गुळ व गुळाची गोडी,वा कापुर व त्याचा सुगंध निवडून एकमेकापासून वेगळे करायचा प्रयत्न केला तर ते निवडणेच पांगळे होते,निवडणारी बुद्धिच चालत नाही.

If we try to separate sweetness from sugar or good smell from camphor the efforts prove to be futile and our brain fails to work.

वरील दोन ओव्यात ज्ञानदेव शिव-शक्तितील एकात्मता व त्या दोघांची फारकत होण्यातील अशक्यता स्पष्ट करून सांगत आहेत.त्यासाठी ते दैनंदीन जीवनातील उदाहरणे देतात.शक्ती ही शिवाची दृष्टी आहे व शिव शक्तीचे अस्तित्व आहे असे ते सांगतात.तसेच गुळ आणि त्याची गोडी वा कापूर व त्याचा सुगंध वा दिवा आणि त्याचा प्रकाश हे जसे वेगळे करता येत नाहीत तसेच शिवशक्ती एकमेकापासून वेगळे करता येत नाहीत.

 

अमृतानुभव-३० प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

जैसा सूर्य मिरवी प्रभा । प्रभीं सूर्यत्वाचा गाभा ।

तेवि भेद गिळीत शोभा । एकचि जे ।।२५।।

ज्याप्रमाणे सूर्याच्या ठिकाणीच प्रकाश असतो व प्रकाशामध्येच घनरूपातील सूर्य असतो ,त्याप्रमाणे शिवशक्ती आपल्यातील दोनपणा गिळीतच शक्ती शिवाची शोभा बनते.

Just as light forms an integral part of sun and sun is the part of sunshine,Shiv-Shakti forget their seperateness and Shakti becomes the expression of Shiv.

कां बिंब प्रतिबिंबा द्योतक । प्रतिबिंब बिंबा अनुमापक ।

तैसे द्वैतमिषे एक । मिरवतसे ।।२६।।

बिंब हे प्रतिबिंबाला प्रकाशित(द्योतक) करते व प्रतिबिंबावरूनच बिंबाच्या अस्तित्वासंबंधी अनुमान करता येते(अनुमापक). बिंबप्रतिबिंबामुळे एक बिंबच सिद्ध होते,द्वैत सिद्ध होत नाही.

 

Original thing illuminates its image,and the image brings out the existence of the original.Original and its image are not two different things .They together establish oneness ,the unity and not the duality.

द्वैतातून अद्वैतच कसे सिद्ध होते हे दोन उदाहरणांच्या सहाय्याने फार छानरित्या ज्ञानेश्र्वर समजावून सांगतात.सूर्यापासून प्रकाश निर्माण होतो.सूर्य कारण आहे व प्रकाश त्याचे कार्य आहे.पण ह्या प्रकाशातच सूर्याचा समावेश होतो.म्हणजेच सूर्य कारणही आहे आणि कार्यही आहे.सगुण सूर्य आणि निर्गुण प्रकाश ह्यांच्यातील ऐक्य येथे सहज पटते.हीच संकल्पना बिंब आणि प्रतिबिंब ह्यांच्या सहाय्यानेही पटवून दिली आहे.बिंब स्वतःला पाहू शकत नाही.  आरशातील प्रतिबिंब पाहिल्यावरच आपले मुख दिसते.म्हणजेच बिंब व प्रतिबिंब ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत.त्य एकच आहेत.

 

अमृतानुभव-३१ प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

सर्व शून्याचा निष्कर्षु।जिया बाईला केला पुरुषु।

जेणें दादुलेनि सत्ता विशेषु।शक्ती झाली।।२७।।

सर्व शुन्याचा निष्कर्ष जी सत्ता(सत्य),तिलाच बाईने आपला पती(पुरुषु) केला आणि केवल सत्यरूप पतीच्या(दादुला) सहाय्याने विशेष सत्त्यरूप झाली.

The present O`wi explains intimate and close relation between Shiv and Shakti.Shakti married Shiv who is an embodiment of truth and eternal existence and therby merged into truth and theonly truth.

जिये प्राणेश्वरीविण।शिवीहि शिवपण।

थारो न शके ते आपण।शिवे घडली।।२८।।

ज्या शक्तिशिवाय(प्राणेश्र्वरी) शिवाला शिवपण येऊ शकत नाही

ती शक्ती(प्राणेश्र्वरी) शिवाचीच झाली आहे.

has become wife of Shiv.This O`wi emphasizes the interdependence of Shiv and Shakti. Shakti the one without whom Shiv cannot secure  his Shivness has become wife of Shiv.

वरील दोन ओव्यात ज्ञानदेव शिव व शक्तिमधील एकात्मता स्पष्ट करत आहेत.त्यांनी वापरलेला शुन्य शब्द समजावून घेणे आवश्यक आहे.रोजच्या व्यवहारात शुन्य म्हणजे अभाव,काहीही नसणे.ह्या ओवीत शुन्य म्हणजे अविनाशी सत्त्य,अस्तित्व, म्हणजेच शिव .अशा शिवाला शक्तिने पती म्हणून निवडले.ज्या शक्तिमुळे शिवाला शिवपण प्राप्त होते ती शक्तिच शिवाची झाली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अमृतानुभव-३२ प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

ऐश्वर्येसि ईश्वरा।जियेचे अंग संसारा।

आपलाहि उभारा।आपणचि जे।।२९।।

सर्व ऐश्र्वर्यासह ईश्र्वरपण हे जिचा अंगपसारा आहे व जी आपणच आपली सर्व उभारणी करते.

The clutter of Shakti consists of varied and numerous things and all this is own creation

पतीचेनि अरूपपणे।लाजोनि आंगाचे मिरवणे।

केले जगा एवढे लेणें।नामरूपाचे।।३०।।

शिवरूप पतीला नामरूपरहित(अरूपपणे) पाहून शक्तिला लाज वाटली व तिने आपल्या नामरूपात्मक अंगाचे(आंगाचे मिरवणे),पतीचे ठिकाणी जगाएवढे लेणे(अलंकार) केले.

Shiv does not have a form.He is not known by any name .His wife feels ashamed of this.At the same time she appears with  several names and she feels shy of this situation.She adorned him with her varied names.

वरील दोन ओव्या अर्थपूर्ण होण्यासाठी त्यांचा एकत्रित विचार केला पाहिजे.पहिल्या ओवीत शक्तिच्या ऐश्र्वर्ययुक्त पसार्याचे वर्णन आहे.आणि हा पसारा शक्तिने स्वतःच उभारला आहे.परंतु तिला त्याची लाज वाटते कारण तिचा पती नामविरहित आहे.त्याचे ऐश्र्वर्ययुक्त वर्णन करता येत नाही.ह्या जाणिवेतून शक्ती शिवाला आपल्या नामरूपी अलंकारांनी सजवते.निराकार,रूपहीन,अचश्रु असलेल्या परब्रह्माला शक्ती नामरूपात्मक दागिन्याने सजवते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अमृतानुभव-३३ प्रकरण-१ , शिवशक्ती समावेशन

ऐक्याचाही दुकाळा । बहुपणाचा सोहळा ।

जिये सदैवाचिया लीला । दाखविला ।।३१।।

ज्या शिवाच्या ठिकाणी अद्वैताचाच दुष्काळ(दुकाळा) आहे तेथे शक्तीने सहजच(लिला) अनेकत्वाचा उत्सव(सोहळा) सहजपणे दाखवला.

Shiv is short of unity(Adwait) but Shakti easily exhibited her assembly of many .

ह्या ओवीत ज्ञानेश्र्वर ऐक्याचा दुष्काळ ही संकल्पना मांडतात.हे ऐक्य द्वैताच्या नाशातून निर्माण झालेले नाही.शिवाचे अद्वैत हे स्वयंभू,निकराचे अद्वैत आहे.ते द्वैताच्या संदर्भातले,सापेक्ष “अ द्वैत” नाही.शिव हा एकल, एकटाच आहे.ह्या परिस्थितित “अ-द्वैत” ह्याला काहीच अर्थ नाही.सूर्य हा नेहमीच प्रकाशमान असतो.त्याच्या ठिकाणी कधीच अंधार नसतो.अंधार नसणे म्हणजे प्रकाश ही संकल्पना सूर्याच्या संदर्भात व्यर्थ आहे.शिवाचे अद्वैत हेही असेच आहे.म्हणून ज्ञानदेव ऐक्याचा दुकाळा असे म्हणतात. असे असले तरी शिव आपल्या पत्नीच्या सहाय्याने ह्या विश्र्वाचा ,त्याच्या बहुपणाचा सोहळा सहजपणे साजरा करतो.

Dnyaneshwar intrduces a novel concept: absolute unity which does not owe its existence to the destruction of duality .Sun is always lighted.It does not come in existence as result of disappearance of darkness. Since unity is absolute oneness ,it loses its meaning even as one ,as one is meaningful only  in relation to two.If there is no second the first looses its relevance.Inspite of such condition Shakti has created this universe easily.

 

 

अमृतानुभव-३४ प्रकरण-१      शिवशक्ती समावेशन

आंगाचिया आटणिया । कांतु उवाया आणिला जिया ।

स्वसंकोचे प्रिया । रूढविली जेणें ।।३२।।

स्वतःचा संकोच करून(आटणीने) जिने आपल्या प्रियकराला(कांतु) प्रगट केले(उवाया) आणि ज्या प्रिय पतीने आपला संकोच करून आपल्या प्रिय पत्नीला प्रगट केले(रूढविली).

She brought to light her lover by contracting herself and her lovable husband in turn brought his the loved one,his wife,to  limelight by contracting himself.

ह्या ओवीत शिवशक्तीचा संकोच व विकास ह्या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत.शिव हा सर्वत्र आहे.प्रत्येक अणुरेणुत तो आहे.त्याचा संकोच वा विकास संभवत नाही.सामान्य जीवाला संकोच वा विकास भासतो.जीवाला जेव्हा शक्तीच्या प्रगटीकरणात द्वैत न दिसता ऐक्यच दिसत तेव्हा सामान्य जीवाच्या दृष्टीने शक्तीचा संकोच होतो व शिवाचा विकास होतो.त्याचप्रमाणे जेव्हा सामान्यास शक्तीच्या नानाविध रूपात द्वैत अनुभवास येते तेव्हा शक्तीचा विकास होतो व शिवाचा संकोच होतो.आपण जेव्हा पाण्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला जर लहरी प्रकर्षाने दिसल्या तर तो पाण्याचा विकास होय.या उलट जर लहरीच जाणवल्या नाहीत फक्त पाणीच जाणवले तर तो शक्तीचा संकोच व शिवाचा विकास होय.

Shiv exists everywhere.It is omnipresent.Therefore the concepts; contraction and expansion are irrelevavnt in relation to Shiv. However a common man feels contraction and expansion. When he perceives this world with its diversity it is expansion ofShakti and contraction of Shiv and when the universe is perceived as unity it is expansion of Shiv and contraction of Shakti.

अमृतानुभव-३५ प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

 

जियेते पहावयाचिया लोभा ।चढे द्रष्टृत्वाचिया क्षोभा ।

जियेते न देखत उभा । आंगचि सांडी ।।३३।।

जिला पाहावे अशी प्रेमवृत्ती उत्पन्न झाली असता,तो द्रष्टा होतो व जेव्हा तो पाहत नाही तेव्हा(द्रष्टृत्वाचे) आंगच सोडून देतो.

 

When affection for Shakti is created in Shiv,he becomes seer and when he is not affectionate ,he ceases to be seer.

हा श्र्लोक समजून घेण्यासाठी द्रष्टा ही संकल्पना समजून घेतली पाहिजे.द्रष्टा म्हणजे जो पाहतो तो.आणि जे पाहिले जाते ते दृष्य.हे द्वैत झाले.शिव हा केवल आहे.तो एकटा आहे. त्याच्याबाबत पाहणे ही क्रिया संभवत नाही.शक्तीबाबत मात्र हे संभवते कारण तिच्यात अनेकत्व आहे.म्हणून ज्ञानदेव म्हणतात शक्तिच्या सहाय्याने शिव द्रष्टा होतो.जेव्हा तो पाहत नाही तेव्हा तो द्रष्टा राहत नाही(आंगची सोडी)

Seer is one who sees something.The act of seeing involves two things,one who sees and the thing that he sees i.e. it is Dwait,duality. Shiv is unique,he is one and the only one.The act of seeing does not arise in the case of Shiv.To see something he has to take the help of Shakti.Without Shakti ,Shiv cannot see the universe around.

 

 

 

 

 

अमृतानुभव-३६  प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

कान्तेचिया भिडा । अवलावो जगा एवढा ।

आंगविला उघडा । जियेविण ।।३४।।

शक्तिरूप पत्नीच्या(कांता) मर्जीखातर(भिडा) शिव जगाएवढा विस्तारतो(अवलावो) व तिच्यावाचून तो (आंगापुरतो)उघडा राहतो.

For the love of his wife Shakti,Shiv expands to the size of universe and when the love is absent he shrinks to nothing.

शक्तिच्या साहाय्याने आपल्याला जगाची प्रचिती येते.आपल्याला जे कळत नाही ते अस्तित्वात नाही असे आपण समजतो. असे आत्म्याबद्दल असे होत नाही.तो एकटा आहे.त्याच्याबद्दल कळणे न कळणे हे संभवत नाही.कळणे ह्या क्रियेसाठी कळणारा व जे कळायचे ते अशा दोघांची जरुरी असते.आत्म्याबाबत हे संभवतच नाही.शक्तीच्या सहाय्याने शिव हा जगाएवढा मोठा होतो. तिच्याशिवाय तो उघडा पडतो म्हणजे जगाच्या प्रत्ययावाचून राहतो.

जो हा ठावोवरी मंदरूपें । उवाईलापणेंचि हारपे ।

तो झाला जियेचिनि पडपे । विश्र्वरूप ।।३५।।

 

येथपर्यंत(ठावोवरी) आत्मवस्तूचा सामान्यपणे(मंदरूपे)विचार झाला ,तो वस्तू प्रगट(उवाईला) असून लोपली(हरपे) कशी या संबंधी झाला.तो लोपला असलेला शक्तीच्या प्रेमामुळे(पडपे) विश्र्वरूप झाला.

Uptill now unity ,Adwait was dicussed in general.How the expanded universe was shrunk was considered.The shrunk universe was expanded due to Shakti`s affection.

अमृतानुभव-३७ प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

जिया जेवविला शिवु । वेद्याचे बोणें बहु ।

वाढतेनसी जेऊ-।-नि धाला जो ।।३६।।

पुष्कळ प्रकारच्या जाणता येणार्या(वेद्य)पदार्थांच्या पक्वान्नाने भरलेले ताट(बोणे) वाढून शक्तिने आपल्या पतीला,शिवाला जेऊ घातले व तो शिव वाढणार्या शक्तिसह(वाढतेनसी) पक्वान्नाच भोजन करून तृप्त झाला(धाला).

Shakti prepares meals with many delicious items for her beloved Shiv and Shiv in turn enjoys it with Shakti

निदेलेनि भातारे । जे विये चराचरे ।

जियेचा विसंवला नुरे । आंबुलेपणहि ।।३७।।

शिवरूप पती(भातारे) निजला(निदेलेनि) असता,शक्ती चराचर विश्र्वाला उत्पन्न(विसवते) करते आणि आणि जिने विश्रांती(विसंवला) घेतली असता शिवाचे मीपण(आंबुलेपण) पतित्वही नाहिसे होते.

When Shiv is asleep Shakti creates this universe in it manifold form and when she takes rest Shiv looses his husbandhood

ज्ञानदेव वरील दोन ओव्यात शिव आणि शक्ती यामधील संबंध स्पष्ट करत आहेत. त्यासाठी त्यांनी पतीपत्नीच रूपक घेतल आहे.३६व्या ओळीत पत्नीने म्हणजे(शक्तिने) पतीला(शिवाला) पक्वानाने भरलेले ताट वाढले आणि शिवाने पक्वान्नाने भरलेले ताट सेवन केले.पक्वान्नाचे ताट म्हणजे विविध वस्तुंनी नटलेले विश्र्व.शिवाला स्वतःला विश्व निर्माण करता येत नाही.त्यामुळे शक्तिच्या सहाय्याने निर्माण केलेल्या विश्वाचा तो उपभोग घेतो.३७व्या ओवीत शिव झोपला आहे असे कल्पिले आहे.अद्वैताचा विसर पडणे म्हणजेच शक्ती सक्रीय होणे व विविध वस्तुरूप जगाचा प्रत्यय येणे.शक्ती जेव्हा विश्रांती घेते तेव्हा शिव आपले शक्तिशी असलेले पत्नीचे नातेही विसरतो व बहुरूपी विश्वाला विसरतो.तो अद्वैत होतो.

 

अमृतानुभव-३८  प्रकरण-१

शिवशक्ती समालोचन

जंव कान्त लपो बैसे । तव नेणिजे जिया उद्देशे ।

जिये दोघे आरसे । जिया दोघा ।।३८।।

जेव्हा(जंव) पति(कान्त) शिव लपतो,(लपो बैसे)तेव्हा शक्तीमुळेच(जिया उद्देशे) जाणला जात नाही(नेणिजे).कारण शिवशक्ती हे परस्परांचे परस्परांना दाखवून देणारे आरसे आहेत.

When Shiv hides himself ,he is not recognized because of Shakti because they are two mirrors showing each other.

जियेचेनि अंगलगे । आनंद आपणा आरोगूं लागे ।

सर्व भोक्ता परि नेघे । जियेविण काही ।।३९।।

जिच्या अंगसंगाने(अंगलंगे) आनंदरूप पुरूष आपल्या आनंदाचे आपणासच भोजन(आरोगूं) घालतो.सर्व भोक्ता तोच असला तरी ज्या शक्तीवाचून काहीही भोग घेऊ शकत नाही.

With the help of Shakti ,Shiv who. is an embodiment of pleasure,alone enjoys his meals.Though he is the sole consumer he cannot enjoy anything without the help of Shakti.

३८ व ३९ ह्या दोन ओव्यात ज्ञानदेव शिव व शक्ती यांचे एकमेकांवरील परावलंबित्व आरसा व भोजन ह्या दोन संकल्पनांद्वारे स्पष्ट करत आहेत. आरशात प्रतिबिंब दिसते.शिव हा शक्तीत आपले रूप पाहतो.त्याच्या दृष्टीने शक्ती हा आरसा आहे.तसेच शक्तीच्या दृष्टीने शिव हा आरसा आहे आणि त्यात ती आपले रूप पाहते.

दुसर्या ओवीतही शिव व शक्तीचे एकमेकावर कसे अवलंबून आहेत ह स्पष्ट केले आहे.आपण झोपेत स्वप्न पाहतो .आपणच आपले स्वप्न उपभोगतो.शिवही आपणच आपल्याला भोजन घालतो.स्वप्नरूपी भोजन म्हणजेच प्रकृती.प्रकृतीच्या सहाय्याने शिव आनंदाच भोजन स्वतः उपभोगतो.

 

 

अमृतानुभव-३९  प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

 

जें प्रियाचे अंग । जो प्रियु जियेचे चांग ।

कालवुनि दोन्ही भाग । जेविते आहाती ।।४०।।

जी शक्ती शिवाचे(प्रियाचे) शरीर (अंग) आहे व जो प्रियपती शिव जिचे पूर्णत्व(चांग) आहे .पण हे दोघेजण आपले दोनपण एककरून(कालवून)आनंद भोगतात(जेविते).

Shakti is body of Shiv and Shiv is Shakti`s ultimate completeness .the Two forget their seperateness and integrate into one enjoy thir oneness.

 

जैसी कां समीरे सकट गती । का सोनया सकट कान्ति ।

तैसी शिवेसी शक्ति । आघवीचि जे ।।४१।।

ज्याप्रमाणे गती वायुसहच(समीरे सकट) असते किंवा कांती सोन्यासहच असते त्याप्रमाणे शक्ती शिवासहच असते

Just as velocity is associated with wind and radiance is associated with gold and so Shakti is with Shiv.

 

का कस्तुरी सकट परिमळु । का उष्मे सकट अनळु ।

तैसा शक्तीसी केवळु । शिवुचि जो ।।४२।।

ज्याप्रमाणे सुगंध(परिमळु) हा कस्तुरीसहीतच(सकट) असतो,आणि अग्नी हा उष्णतेसहच(उष्मे) असतो त्याप्रमाणे शक्ती म्हणजे केवळ शिवच आहे.

Just as fragrance is always with musk and fire is with heat,so also Shakti is with Shiv

अमृतानुभव-४०  प्रकरण-१  शिवशक्ती समावेशन

राती आणि दिवो । पातली शूर्याचा ठावो ।

तैसी आपुला साची वावो । जिये दोघे ।।४३।।

ज्याप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी रात्र आणि दिवस संभवत नाहीत,दोन्ही सूर्य स्वरूपचहोऊन जातात, त्याचप्रमाणे शिवशक्ती त्यांचे अद्वैतज्ञान झाल्यावर त्यांच्यातील दोनपण(जिये दोघे) नाहीसे होते.

Just as day and night are not relevant in the case of sun,both merge in sun,similarly once unity in Shiv and Shakti is realized distinction between the two vanishes.

सूर्य हा नेहमीच प्रकाशमय असतो.त्याच्याबाबत रात्र व दिवस संभवत नाहीत.ज्यांना काही काळ सूर्य दिसत नाही त्यांना दिवस व रात्र भासतात.पण सूर्याच्या दृष्टीने रात्र संभवतच नाही.सूर्यावर नेहमी प्रकाशच असतो.अंधार कधीच नसतो.पृथ्वीवर दिवस रात्र संभवतात.कारण काहीकाळ सूर्य दिसत नाही.जेव्हा अद्वैताचा विसर पडतो तेव्हाही असेच होते.तेव्हा सर्वातील ऐक्य लक्षात येत नाही व विश्वातील विविधता खरी वाटू लागते.खर म्हणजे अद्वैत हेच खरे आहे.अद्वैत द्वैत हे वेगळे नाहीत.ते एकच आहेत.

Dnyandeo emphasizes integration of Shiv and Shakti.He takes the example of sun and its two phases day and night.He states that day and night are relevant for us the residents of earth but it is not relevant for the sun because sun is always lighted.It emits light every moment.There is no night the condition of no light ,there is always light.Similarly Shiv and Shakti are not two different things but one and the same.

अमृतानुभव-४१ प्रकरण-१ शिवशक्ती समावेशन

किंबहुना तिये । प्रणवाक्षरी विरूढतिये ।

दशेचीहि वैरिये । शिवशक्ति ।।४४।।

किंबहुना,प्रणवातील अ,उ,म या अक्षरांच्या द्वारा बहुरूप(वीरूढतिये) होणारी शिवशक्ती दशेची(कार्यकारण दशेची) वैरी आहेत म्हणजे शिवशक्ती व विश्व यांच्यात कार्यकारण भावही नाही.

The multiform Shiv-Shakti created by the letters A,U,M of Pranav is enemy of cause-effect proposition i.e.there is no cause-effect relation between Shiv-Shakti and the universe.

प्रणव व त्याची अक्षरे अ,उ,म ,वैरी,दशा हे शब्द नीट समजून घेतले पाहिजेत.

भारतीय तत्वज्ञानानुसार ह्या विश्वाची निर्मिती ओम(प्रणव) ह्या शब्दातून झाली आहे .ओम हा शब्द अ,उ,म ह्या तीन अक्षरांचा मिळून झाला आहे.सर्व शब्दांची निर्मिती ओम मधून झालेली आहे.शब्द हा अक्षरे व अर्थ यांचा मिळून झालेला आहे.अर्थावरून वस्तुचे रूप व गुणधर्म समजतात.शब्दातून विश्व निर्माण होते,शब्द अक्षरातून निर्माण होतात ,अक्षरे ओममघून निर्माण होतात.प्रणवापासून सर्व सृष्टी निर्माण झाली.प्रणवच सृष्टी एवढा विस्तारतो.पण प्रणवही शिवशक्तीपासून उद्भवतो म्हणजेच सर्व सृष्टी शिवशक्तीपासून निर्माण होते.असे असले तरी ज्ञानेश्वर प्रतिपादन करतात की शिवशक्ती दशेची वैरी आहे.दशा दोन संभवतात,एक कारणदशा व दोन कार्यदशा.शिव कशाचाही कारण नाही वा कार्यही नाही.सृष्टी हे शिवाचे कार्य नाही शिवच आहे.शिवशक्तीचा दोनपणा हा शब्दापुरताच मर्यादित आहे.शिव व शक्ती हे दोन शब्द वेगळे आहेत एवढेच.अज्ञानामुळे ते दोन वेगळे आहेत असे वाटते.

Universe is the creation of words and word is the creation of letters which in turn is the creation of Om(pranav)consisting of three fundamental letters A,U and M.Prnav is the creation of Shiv.Therefore universe is the creation of Shiv which apparently looks like cause and effect relationship which involves duality,But Shiv stands for unity,oneness.Shiv and Universe are not two different entities.Their duality is the outcome of ignorance.

Universe consists of variety of things but it stands for unity.

 

अमृतानुभव-४२ प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

जयाच्या रूपनिर्धारी । गेली परेसी वैखरी ।

सिंधुसी प्रळयनिरीं । गंगा जैसी ।।४६।।l

ज्यांच्या स्वरूपाची निश्चिती करू पाहता शब्दच उरत नाहीत.प्रलयामद्ध्ये सर्व जलमय(निरीं) झाल्यावर जसे समुद्र व गंगा यांना अलग करता येत नाही,त्याप्रमाणे हे शिवाचे रूप व हे शक्तीचे रूप सांगणारा शब्दच उरत नाही.

Words are not sufficient to describe the nature of Shiv and Shakti.In times of disaster it is not possible to identify the distinction of waters of Ganga and the sea .

 

वायु चळवळेसी । जिराला व्योमाचिये कुशी ।

आटला प्रलयप्रकाशीं । सप्रभ भानु ।।४७।।

 

ज्याप्रमाणे वायु आपल्या वाहतेपणासह आकाशात मिळून जातो व प्रलयकाली सूर्य आपल्या प्रकाशासह नाहीसा होतो त्याप्रमाणे शिव व शक्ती एकमेकात मिसळून जातात.

Just as wind along with its flow merges in sky and sun along with its light vanishes during disaster ,Shiv and Shakti merge in each other.

 

 

 

 

 

 

 

ोनअमृतानुभव-४३ प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

जया दोघांच्या अलिंगनीं । विरोनी गेली दोन्ही ।

आवघियाचि रजनी । दिठी जेवी ।।४८।।

शिवशक्तीच्या अलिंगनात त्याचे दोनपण पुर्णपणे नाहिसे होते.ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशात अंधार आणि उजेड हा फरक राहत नाही ,फक्त प्रकाशच राहतो त्याप्रमाणे शिवशक्तीच्या अलिंगनात फक्त आनंदच राहतो

Duality vanishes when Shiv and Shakti merge in each other.Just as distinction between darkness and brightness disappears in sunshine ,in the same way in the embrace of Shiv and Shakti it is

the happiness that remains.

शिवशक्तीला ते दोघे वेगळे आहेत हे भासत नाही.ते दोघे वेगळे आहेत असे सामान्य जीवाला वाटते.अलिंगन हे दोघांच्यात संभवते.दोघे वेगळे असतील तरच अलिंगन अर्थपुर्ण होईल.जीवाच्या दृष्टीने त्यांचे अलिंगन अर्थपुर्ण आहे.जीव जेव्हा ज्ञानदृष्टीने पाहतो तेव्हा त्याला दोनपणातील ऐक्य जाणवते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अनृतानुभव-४४ प्रकरण १

शिवशक्ती समावेशन

तेवि न्याहाळता ययाते । गेले पाहणेनसी पाहाते ।

पुढती घरौते वरौते । वंदिली तिये ।।४९।।

शिवशक्तीला पहायला गेले असता पहाणारा पाहण्यासह नाहिसा होतो.अशा या शिवशक्तीला(पतीपत्नी-घरौते वरौते) मी नमस्कार केला

When one tries to see Shiv-Shakti the seer disappears with what is to be seen.I bow before Shiv-shakti.

पाहणे ह्या कृतीत तीन गोष्टी येतात.एक पाहणारा,दोन जे पाहवयाचे ते आणि तीन पाहणे ही क्रिया.ज्ञानेश्वर म्हणतात शिवशक्तीला पाह्यला गेले असता ह्या तिन्ही गोष्टी नाहिशा होतात.अद्वैत समजले म्हणजे द्वैत नाहिसे होते.पाहणे ही द्वैत कृती आहे.शिवशक्तीचे दोनपण नाहिसे होते.आणि फक्त अद्वैत शिल्लक राहते. जोपर्यंत अद्वैत भासते तोपर्यंत द्वैतही शिल्लक राहतेच. अहंपणा राहतोच.ह्या अद्वैताचाही भास राहू नये म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात मी शिवशक्तीस पुनः वंदन करतो. वंदन म्हणजे अहंकार नष्ट होणे.प्रेमानेच अहंकार नष्ट होतो.वंदन हे आदरपूर्वक प्रेमानेच होते.वंदन हे भक्तीचे लक्षण आहे.अद्वैतरूपी अहंकाराचा नाश व्हावा म्हणून ज्ञानेश्वर  प्रेमरूपी वंदन करतात.

In this O`wi Dnyaneshwar  explains  the concepts Adwait ,Dwait, their  realization and annihilation ,adoration with suitable example of day today act of seeing.The act Seeing involves three things one who sees ,the seer;the thing that is to be seen and the actual act of seeing .When one realizes unity ,(Adwait),duality vanishes and so also seer,the thing seen and the act of seeing.But even then one continues to hold consciousness of Adwait which is egoistic .In order to destroy this ego Dnyaneshwar bows before ShivShakti.Whole hearted devotion takes place when  ego vanishes completely.

 

 

 

अमृतानुभव-४५ प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

जयाचिया वाहणीं । वेदकु वेद्दाचे पाणी ।

न पिये परी सांडणी । आंगाचीहि करी ।।५०।।

शिवशक्ती यांच्या प्रवाहात(वाहणी), विषयी(वेदकु) शिव हा शक्तिरूप विषयाचे (वेद्याचे)पाणी देखील पीत नाही.एवढेच नाहीतर आपल्या द्रष्टेपणाचा(आंगाचाही)  त्याग(सांडणी) करतो.

In the stream of Shiv-Shakti one who knows does not even drink water of what is to be known.Not only that he surrenders his body too.

शिव आत्मप्रेमामुळे शक्तीची निर्मिती करतो.शिव हा एकटा (अद्वैत) आहे.त्याला कोणाशीच संवाद साधता येत नाही.म्हणून तो शक्तिची(द्वैताची) निर्मिती करतो.ही प्रक्रिया सतत चालू असते.पण या प्रवाहात शिवशक्तिचे ऐक्य बीलकूल नष्ट होत नाही.मी काही पाहिले असे भासतच नाही.पाहणे म्हणजे द्वैत ,पण तसे होतच नाही. आपल्यापेक्षा वेगळ्या वस्तुचा ऊपभोग म्हणजेच भोक्तृत्व निर्माण होत नाही.दृश्यच नसल्यामुळे द्रष्टा(वेदकु) काय पाहणार.म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात वेद्याचे(विषयाचे) पाणी वेदकु(विषयी) न पिये.शिव आपल्या द्रष्टेपणाचा म्हणजे द्वैताचा, दोनपणाचा, त्याग करतो

Shiv is alone.(Adwait).He feels to communicate but he being alone he cannot.He therefore creates Shakti(Dwait).However in this process Shiv & Shakti do not loose their unity. Communicating with Shakti amounts to communicating with oneself.It is not communicating with other.Perception involves duality .It is creation of unity and therefore it is not different from duality.therefore perception,perceiver concepts are of no relevance.

 

 

 

 

अमृतानुभव-४६ प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

तेथ मी नमस्कारा । लागो उरो दुसरा ।

तरी लिंगभेद पर्हा । जोडूं जावो ।।५१।।

शिव व शक्ती हे दोन नसून एकच  आहेत.त्यांना नमस्कार करण्याकरिता मी निराळा कसा राहीन.कारण नमस्कार करण्याकरिता वेगळे राहणे म्हणजे त्यांच्याशी(पर्हा-परब्रह्म) लिंगभेद जोडणे होय.

ज्ञानेश्वर म्हणतात मी एकरूप असणार्या शिवशक्तीचाच एक भाग आहे.तेव्हा त्यांना नमस्कार करणे म्हणजे त्यांच्यापासून वेगळे होणे होय.नमस्कार हा दुसर्याला केला जातो.नमस्कार करणे म्हणजे भेद ,वेगळेपण मानण्यासारखे होय.शिवशक्ती ह्या दोन स्वतंत्र वस्तू नाहीत आणि मी त्यांच्यापासून वेगळा नाही.माझे नमस्कार करणे हे अभेदाने आहे.

Shiv and Shakti are integrated into one.And when I convey my respect to them and bow before them I do it not as one separate from them but as a part of them.

The act of conveying respect and bow before someone involves accepting distinction between one who bows and the person before whom one who bows.However Dnyaneshwar does not accept this separateness.He pleads unity between the two and therefore his bowing before Shiv-Shakti is as aintegral part of universe which is manifestation of Shiv-Shakti.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अमृतानुभव-४७ प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

परी सोनेनसी दुजे । न होता लेणें सोना भजे ।

ते नमन करणे माजे । तैसे आहे ।।५२।।

सोन्याहून निराळा(दुजे) न होता जसा अलंकार सोन्याचा होऊन जातो(भजे),तसे माझे हे नमन आहे.

Just as golden ornament without being separate from gold remains as a gold ornament,so is my bowing before Shiv-Shakti.

सांधिता वाचेते वाचा ।ठावु वाच्य वाचकाचा ।

पडता काय भेदाचा । विटाळु होय ।।५३।।

वाणीने वाणी(वाचा) शब्द उच्चारला(सांधिता) असता वाच्य(शब्दाचा अर्थ)वाचकाचा(शब्द) भाव(ठावु) निर्माण होतो पण येथे दोन भिन्न वस्तूंचा भाव निर्माण होत नाही.

When the speaker utters the word speech,apparently two different entities are created but are they are really not because speech is of the same person.

 

 

सिंधु आणि गंगेच्या मिळणी ।स्त्री पुरुष नामाची मिरवणी ।

दिसतसे तरी काय पाणी ।द्वैत होईल।।५४।।

समुद्राला गंगा मिळाली म्हणजे स्त्री आणि पुरूष हे दोन शब्दांचे मिरवणे झाले पण त्यांचे पाणी काही वेगळे झाले नाही.

When the river Ganga meets an ocean ,it is only a display of male(ocean) and female(Ganga) the two words.But what is merged is water and it is the same.

 

 

 

 

 

अमृतानुभव-४८ प्रकरण-१

शेवशक्ती समावेशन

पाहे पा भास्य भासकता । आपला ठायी दाविता ।

एकपण काय सविता । मोडतसे ।।५५।।

सूर्य(सविता) प्रकाशित झाला म्हणजे तोच त्याच्या प्रकाशाने दिसतो.तोच प्रकाशक व तोच प्रकाशित होतो.पण म्हणून सूर्याचे एकपण नाहिसे होते का ?

When the sun shines ,it`s light enables us to see the sun i.e.one who illuminates the light is the same as one who is lighted.The two are not separate but the same,the sun.

 

चांदाचिया दोंदावरी । होत चांदणियाची विखुरी ।

काय उणे दीप्तीवरी । गिवसो पां विपु ।।५६।।

चंद्राचा(चांदाचिया) प्रकाश चंद्राच्याच पोटावर(दोंदावरी) पसरतो(विखुरी).त्यामुळे चंद्र अधिक शोभिवंत दिसतो.त्याचप्रमाणे दिव्याचा प्रकाश त्याला सोडून(उणे) राहत नाही.त्यामुळे दिवा कमी होत नाही.

When the moon shines it`s light spreads allover it`s space and it looks more beautiful.Similarly though the flame appears to be separate from the lamp,the light does not leave the lamp and the lamp`s brightness is not reduced.

 

मोतियाची कीळ । होय मोतियावरी पांगुळ ।

आगळे निर्मळ । रूपा ये की ।।५७।।

मोत्याचे तेज(कीळ) मोत्याचे ठिकाणी अचल(पांगुळ) असेल तर ते मोती अधिक(आगळे) सुंदर दिसतात.

When brightness of a pearl has a long life the pearl looks more beautiful.

 

 

 

 

अमृतानुभव-४९

मात्राचिया त्रिपुटिया । प्रणव काय केला चिरटिया ।

कीं ण कार तिरेघटिया । भेदावला काई ।।५८।।

प्रणवाच्या अ उ म अशा तीन(त्रिपुटिया) मात्रानी,तीन तुकडे(चिरटिया) केले म्हणून त्यात भेद झाला काय किंवा णकार तीन रेषांनी(रेघटिया) दाखविला म्हणून त्याच्यात भेद झाला काय ?

A,U,M together make Pranav,and apparently they divide Pranav in three pieces but does it mean that amounts to duality or the letter ण  is formed by three lines but does it amount to duality.

 

अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभु मिळे ।

तरी स्वतरंगाची मुकुळे । तुरंबुं का पाणी ।।५९।।

अद्वैताची मुळ स्थिती(मुद्दल) कमी न(न ढळे) होता जर दोनपणाच्या भासाने सौंदर्याचा लाभ होतो तर पाणी आपल्या तरंगरूपी कळ्यांचा(मुकुळे) सुगंध(तुरंबु) का न घेवो.

If  the duality is  going to add to the beauty , then why water should not enjoy the fragrance of ripples?

 

म्हणोनि भूतेशु आणि भवानी । न करूनि सिनानी ।

मी रिघालो नमनीं । ते हे ऐसे ।।६०।।

म्हणून शिवशक्तीला(भुतेशु-भवानी) निराळे(सिनानी) न मानता मी त्यांना जो नमस्कार करितो तो या प्रमाणे.

Therefore my salutation is one without considering Shiv and Shakti as separate enities.

 

 

 

 

 

 

अमृतानुभव-५० प्रकरण-१  शिवशक्ती समावेशन

कां दर्पणाचेनि त्यागे । प्रतिबिंब बिंबीं रिघे ।

कां बुडी दिजे तरंगे । वायूचा ठेला ।।६१।।

ज्याप्रमाणे, आरसा(दर्पण) बाजुला सारला असता प्रतिबिंब बिंबात मिळून जाते किंवा वायु शांत(ठेला) झाल्यावर तरंग पाण्यात बुडी मारतो.

Just as removal of mirror results in merger of original obgect and the image or when the wind stops flowing the ripples merge in water.

 

नातरी निद जात खेवो । पावे आपुला ठावो ।

तैसी बुद्धित्यागे देवी देवो । वंदिलीं मिया ।।६२।।

जसे,निद्रा संपल्यावर त्याक्षणी(खेवो) आपण आपल्या ठिकाणी(ठावो) राहतो,त्याप्रमाणे बुद्धीचा त्याग करून मी देवोदेवीना वंदन केले.

Just as on finishing the sleep we are instantly awakened and become conscious of oneself ,similarly I I abandoned the intellect and bowed before Dewo-Devi.

 

सांडुनि मीठपणाचा लोभु । मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभु ।

तेवि अहं देऊनि शंभु । शांभवी झालो ।।६३।।

 

ज्याप्रमाणे मीठाने खडेपणाचा,कठीणपणाचा अभिमान सोडून सिंधुत्वाचा(समुद्राचा) लाभ करून घ्यावा,त्याप्रमाणे शंभूला(शिवाला) मीपणा देऊन मी शांभवी(शक्ती) झालो.

Just as salt surrenders its solid form and merges in ocean,similarly I surrendered my ego to Shambhu and I became Shambhavi.

 

 

 

 

 

अमृतानुभव-५१ प्रकरण-१

शिवशक्ती समावेशन

 

 

शिवशक्ति समावेशे । नमन केले म्या ऐसे ।

रंगागर्भ आकाशे । रिघाला जैसे ।।६४।।

ज्याप्रमाणे केळीची सालं सोलली असता त्यांनी व्यापलेली जागा आकाशात मिसळून जाते त्याप्रमाणे मी, मीपणा सोडून व शिवशक्तिचे ऐक्य करून, नमन केले.

Just as when skin of a banana trunk is peeled the occupied space merges into sky,I surrendered my ego ,imagined unity of Shiv and Shakti and offered my deep respect .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अमृतानुभव-५२ प्रकरण-१ समाप्त

शिवशक्ती समावेशन

शिवशक्ती समावेशन हे प्रकरण येथे समाप्त होत आहे.ह्यात मंगलाचरणचे पाच संस्कृत श्लोक व मराठीतील ६४ श्लोक असे ६९ श्लोक होते.शिव(अद्वैत) व शक्ती(द्वैत) ऐक्य हा ह्या प्रकरणाचा विषय आहे.ब्रह्म हे अद्वैतरूप आहे.आपण जे दृष्य जग पाहतो ते(शक्ती) व ब्रह्म(शिव) हे एकमेकापासून वेगळे नाहीत.पण आपल्याला रोजच्या जीवनात आपल्याला तसे जाणवत नाही.कारण आपल्याला ब्रह्म म्हणजे काय हे माहीत नसते.आपण भोवतालचे जग हे आपल्यापेक्षा वेगळे समजतो.मी म्हणजे माझे शरीर असे मला वाटते आणि बाह्य जग हे उपभोग्य आहे ,मी त्याचा उपभोग घ्यायचा आहे हा माझा विश्वास आहे.तो उपभोग घेण्यास मिळाला नाही म्हणजे मला दुःख होते. ह्या दुःखाचा नाश व्हावयास पाहिजे.म्हणून शिव,जीव व जग(शक्ती) ह्या तीघांचा विचार केला पाहिजे.ते एकरूप आहेत.सुख आपल्यापाशीच आहे.ते दुसर्यापासून मिळवायचे नाही त्यामुळे ते अखंड राहते.

ज्ञानेश्वर म्हणतात शिव हा एकच ,अद्वैत आहे.तो शक्तीरूपात,दोनपणात प्रगट होतो व ते प्रगटीकरणही शिवरूपातच राहते.शिव व शक्तीला वेगळे करता येत नाही.शक्तीला वेगळे करायला गेल्यास हाती शिवच येतो.

जग म्हणजे शिवशक्ती होय.जग ही आणखीन तिसरी वेगळी वस्तू नव्हे.जग हे शिवशक्तीचे नामरूपाने नटणे होय.पण जीवाला म्हणजे आपल्याला मी शिवच आहे असे वाटत नाही.हे न वाटणे हीच जीवाच्या दृष्टीने शिवाची झोप होय.असे होते याचे कारण म्हणजे मी शिवापासून ,ब्रह्मापासून  वेगळा आहे हे समजतो.शिव हा अमर्याद आहे.आणि मी शिवच आहे हे जाणले पाहिजे.माझा मीपणा मी शिवाला अर्पण केला पाहिजे.अर्पणातही अहंकार असतो .मी शिवचरणांची प्रेमाने सेवा केली म्हणजे तो अहंकार नाहिसा होतो.

 

 

 

Amrutanubhav-52 Prakaran-1

Shiv-Shakti Samaveshan, Epilogue

This is the end of ch-1,titled Shiv-Shakti Samaveshan.The chapter consists of 69 Shlokas of which 5 were devotional in praise of Shiv the creatorAnd Guru,the mentor.Tey are rit language the rest 64 shlokas are in vernacular.The integration of Shiv(unity) and Shakti (duality) is the subject matter of this chapter.Shiv is also referred as Brahm.Its characteristic is unity,oneness.It expresses itself in Shakti which stands for duality,many.In day to day life we feel that the two ,Shiv and Shakti are different from each other.We do not realize that the two are different only in the form of names.Actually the two are same.Our failure to appreciate their oneness is because I identify myself with my body,my physical existence which has craving for the surrounding things in this world.We consider the outer world different from Me.When I am unable to get things from the outer world I feel sorry.The grief,the sorrow is eliminated when I realize the oneness of “I”,Shiv and the universe(Shakti).When I realize this ,the unity the grief/sorrow does not arise.When there is only “one” ,happiness is not in the outer world ,it is in myself.It has not to be secured from outside .

 

Dnyaneshwar argues that Shiv is in Adwait/unity form.It expresses itself in Shakti the duality form.Shakti is Shiva`s expression not something different from Shiv.The universe is not something separate from Shiv.Any attempt to select universe separately, one ultimately gets Shiv.”I” feeling onself different from hiv is often referred to as Shiva`s sleep. To realize the oneness,the unity I should surrender my ego.Surrendering ego is also not sufficient because surrender is also an expression of pride and arrogance.It can be avoided by wholehearted loving devotion to Shiv.