nilkanth bapat

Amrutanubhav Prakaran 3

वाचाऋणपरिहार

१२ ऑगस्ट २०१४

सुप्रभातम्

ज्ञानेश्वरकृत अमृतानुभव

प्रकरण ३, वाचाऋणपरिहार ,ओवी ३.१

ययाचेनि बोभाटे । आत्मयाची झोप लोटे ।

पूर्ण तरी ऋण न फिटे । जे चेणेचि नीद की ।। ३.१ ।।

या चार वाणीच्या(ययाचेनि) गजराने (बोभाट्याने) आत्म्याची झोप नाहिशी होते व तो पूर्ण होतो तरी पण जागे होणे(चेणेचि) हीहि निद्राच(नीद) असल्यामुळे या वाणीचे ऋण फिटत नाही.

Atma is awakened because of outcry of the four types of speech .However since awakening is also sleep, indebtedness of the speech is not extinguished .

ह्या ओवीत ज्ञानेश्वर वाणीचे ऋण वआत्म्याची झोप ह्या संकल्पना स्पष्ट करत आहेत.परा,पश्यन्ति,मध्यमा व वैखरी ह्या चार वाणी होत.त्यांच्या बोभाट्याने आत्म्याची झोप लोटली.आत्मा झोपला म्हणजे आत्मा आपले शुद्ध स्वरूप विसरला व मी म्हणजे माझा जड देह असा विचार करू लागला,असा विचार तो जागेपणी करू लागला एवढेच नव्हे तर स्वप्नातही करू लागला. तो झोपला असतानाही जीवाला त्याच्या नावाने हाक मारली तर तो जागा होतो. मी म्हणजे माझा देह हा विचार त्याच्या सर्व अवस्थेत जागेपणी, स्वप्नावस्थेत व झोप झाल्यावरही त्याच्या मनात मी म्हणजे माझा देह,म्हणजेच द्वैत हाच विचार प्रबळ असतो.ह्या तीन अवस्थात वैखरी,मध्यमा व पश्यन्ति ह्या तीन वाणी सक्रीय असतात व मी देह आहे हाच विचार प्रबळ असतो.आत्मविचाराने मी देहरूप आहे हा विचार नाहिसा होतो.आत्म्याची झोप नाहिशी होते. पण विचाराने प्राप्त झालेली ही जाणीव आहे.पण जीवाला जरी मी देहरूप आहे अशी जाणीव झाली तरी जीव ब्रह्मरूप असतोच.त्याचे ब्रह्मरूपत्व कशानेच नष्ट होत नसते.  फक्त जीवाला त्याची विस्मृती झालेली असते.  मोठ्या प्रयत्नाने तो ती विस्मृती घालवतो.पण ते पुरेसे नाही.कारण त्याला मी ब्रह्म आहे ही जाणीव रहातेच.ही जाणीवही नष्ट व्हावयास पाहीजे.तरच मी खर्या अर्थाने ब्रह्मरूप झालो असे म्हणता येईल.

SHRI DNYANESHWAR EXPLAINS TWO IMPORTANT CONCEPTS VIZ. IDEBTEDNESS TO THE FOUR TYPES OF SPEECH AND THE SLEEP OF THE ATMA.(EGO).THE TYPES OF SPEECH ARE PARA,PASHYANTI ,MADHYAMA AND VAIKHARI.SLEEP OF THE ATMA MEANS FORGETTING THE TRUE NATURE OF ONESELF.THE MAN FORGETS HIS REAL FORM AND THINKS THAT “HE” MEANS HIS BODY.HE CONSIDERS HIMSELF TO BE DIFFERENT FROM THE UNIVERSE.HE FORGETS HIS IDENTITY WITH THE UNIVERSE.THIS AMOUNTS TO ACCEPTANCE OF DWAIT.BUT THROUGH RELENTLESS EFFORTS HE REALISES HIS TRUE NATURE I.E. HIS IDENTITY WITH THE UNIVERSE(PARABRAHM) WHICH EXISTS ALL THE TIME AND IT IS THE ONE WHO DOES NOT HAVE    BIRTH AND DEATH..THE PARABRAHM ALWAYS EXISTS WHETHER ONE TAKES ITS COGNISANCE OR NOT. IT BE UNDERSTSTOOD THAT EVEN WHEN ONE REALISES THE ETERNITY OF PARABRAHM THROUGH RELENTLESS EFFORTS   ONE  IS CONCIOUS OF IT WHEREAS THE EXISTENCE OF PARABRAHM DOES NOT DEPEND UPON SOMEONES ECOGNITION.

१४ ऑगस्ट २०१४

श्रीज्ञानेश्वरकृत अमृतानुभव

वाचाऋणपरिहार , प्रकरण ३ ,ओवी ३.२

एरव्ही परादिका चौघी । जीव मोक्षाच्या उपेगी ।

अविद्येसवे आंगी। वेचिती कीरू ।। ३.२ ।।

एरव्ही पहाता परादिका(परा,पश्यन्ति,मध्यमा व वैखरी)वाणी जीवाच्या मोक्षाच्या उपयोगी(उपेगी) असल्या मुळे अविद्येचा नाश झाल्यावर  त्या वाणी खरोखरच(कीरू)अविद्येबरोवरच,तात्काळ(सवें) लयाला(वेचिती) जातात.

The four modes of speech are useful to a man in his efforts to attain Moksha(salvation) .But they are the creations of Avidya (ignorance).When the ignorance vanishes thae four modes of speech associated with Avidya also vanish.

श्रीज्ञानेश्वर वाणीचे महत्व काय ह्याची चर्चा ह्या ओवीत करत आहेत.मोक्ष मिळवण्यासाठी वाणीचा निश्चितच उपय़ोग होतो.वाणीची निर्मिती ही अविद्येमुळे होते.अविद्या म्हणजे स्वतःविषयी भ्रामक कल्पना .मी म्हणजे माझे शरीर व ते ब्रह्मापेक्षा वेगळे आहे ही ती कल्पना.ही संकल्पना भ्रामक आहे. मी ब्रह्मापेक्षा वेगळा नाही.माझी ब्रह्माशी एकरूपता आहे हेही मी वाणीच्या सहाय्यानेच जाणतो.अविद्येने निर्माण केलेली वाणीच अविद्येच्या नाशास कारणीभूत होते,, अविद्याच नाहिशी झाली म्हणजे तिनी निर्माण केलेली  वाणीही नाहिशी होते.

Avidya is the ignorance about the nature of being.Man thinks about oneself as an assembly of different organs and distinct from the Almighty.Therefore he needs words ro express this relationship.The words are useful to him to understand the relationship.the   creation of words is the outcome of Avidya the    ignorance about oneself .But with the help of these  different modes of speech he realizes the true relationship with the Almighty and his complete integration with it. On realization of Adwait one no longer requires the four modes of speech.It is interesting to note that the  creation of words is the outcome of ignorance (Avidya) and at the same words and the four modes of speech are useful in annihilation of Avidya .

२५ ऑगस्ट २०१४

श्रीज्ञानेश्वरकृत

अमृतानुभव , प्रकरण ३

वाचाऋणपरिहार, ओवी ३.३ – ३.७

देहासवे हात पाये । जाती मनासवे इंद्रिये ।

का सूर्यासवे जाये । किरणजाळ ।। ३.३ ।।

ज्याप्रमाणे देहाबरोबर(देहासवे) देहाचे हातपायही जातात ,मनाबरोबर इंद्रियेही जातात सूर्याबरोबर त्याची किरणांचा समुदायही(जाळ) जातो

Just as when death takes place the hands and feet also die also die ,along with mind  different organs also disappears, when sun sets his  rays also disappear

नातरी निद्रेचिये अवघी । स्वप्ने मरती आधी ।

तेवि अविद्येचे संबंधी । अटती इया ।। ३.४ ।।

किंवा (नातरी) झोप संपली की सर्व(अवघी) स्वप्नेही लयाला जातात त्याप्रमाणे(तेवी) अविद्या नाश पावली की त्याअविद्येबरोबर अविद्येचे कार्य करणार्या चार वाणीही आटतात .त्यांचा अविद्येशी संबंध रहात नाही.

When sleep ends dreams end, similarly when ignorance ends all the four types of speech which create ignorance also disappear

मृते लोहे होती । ते रसरूपे जिती ।

जळोनि इंधने येती । वन्हि-दशे ।। ३.५ ।।

धातु मारली असता भस्मरूपाने ती रहाते .लाकडे जाळली असता अग्नीरूपाने ती रहातात

When metal is melted it remains in the form of liquid, when wood is burnt it remains in the form of fire

लवण अंगे विरे । परी स्वादे जळी उरे ।

नीद मरोनि जागरे । जोइजे निदे ।। ३.६ ।।

पाण्यात मीठ मिसळले तरी ते स्वाद रूपाने रहाते(जिती) .निद्रा(नीद) नाहिशी झाली तरी ,जागेपणाने(जागरे) ती रहातेच

When salt is mixed with water it remains in the form of  flavour ,when sleep ends it still remains in the form of awakening

तेवि अविद्येसवे । चौघी वेचिती जीवे ।

तत्वज्ञानाचेनी नांवे ।उठतिची या ।। ३.७ ।।

त्याप्रमाणे(तेवि) अविद्येच्या नाशाबरोबर चारी वाणी जीवानिशी(जीवे) नाहिशा (वेचिती) झाल्या तरी त्या तत्वज्ञानाच्यारूपाने पुनः उठतात.

In the same way when ignorance dies the four types of speech also die but they remain in the form of philosophy.

द्वैताचा विनाश करून अद्वैताची जाणीव होणे व त्याची मर्यादा कोणती हे ओवी क्र. ३ ते ७ मध्ये स्पष्ट केले आहे.जीव हा ब्रह्मरूपच असतो.त्याला त्याची जाणीव होवो न होवो.ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी श्रीज्ञानेश्वर समर्पक उदाहरणे देतात..सुरवातीच्या दोन ओव्यात मुख्य संकल्पना नाहीशी झाली की तिच्यावर आधारित इतर संकल्पनाही नाहीशा होतात हे प्रतिपादन केले आहे.उदाहरणार्थ , देह नाहीसा झाला म्हणजेच मृत्यू नंतर शरीराचे अवयवही नाहीसे होतात.सूर्य मावळला म्हणजे त्याची किरणेही नाहीशी होतात .झोप संपली म्हणजे स्वप्नेही संपतात.अविद्या नाहीशी झाली म्हणजे अविद्येने निर्माण केलेल्या चारी वाणीही नाहीशा होतात.पण अशा रितीने अद्वैताची जाणीव झाली तरी ती परिपूर्ण नाही कारण ही जाणीव द्वैताच्या विनाशातून झालेली असते ,म्हणजेच द्वैताची आठवण रहातेच.श्रीज्ञानदेव हा विचार चार उदाहरणाने स्पष्ट करतात.जडरूपात असलेले लोखंड नाहीसे केले म्हणजे ते आटवले तरी ते रसरूपाने रहाते.लाकूड जाळले तरी ते अग्नी रूपात रहाते .मीठ पाण्यात विरघळले तरी चवीरूपाने रहाते.झोप संपली व आपण जागे झालो तरी जागेपणाच्या रूपात झोप रहातेच.म्हणजेच झोप संपली ह्या जाणीवेने झोपेची आठवण रहातेच.त्याचप्रमाणे अविद्या(अज्ञान) नाहीशी होण्याबरोबर चारी वाणी नाहीशा होतात खर्या ,पण तत्वज्ञानाच्या रूपाने त्या अस्तित्वात रहातातच.तत्वज्ञान म्हणजे मी ब्रह्मरूप आहे ही जाणीव.

The four types of speech are the creation of Avidya(ignorance) .When ignorance vanishes ,its creation viz. the four types of speech also vanish.ShriDnyaneshwar explains this concept through very apt examples.He says ,When man dies his hands and feet also die The death of mind is followed by the death of all organs  also.When the sleep ends and the man is awakened ,the dreams also vanish.In  the same way the end of ignorance is followed by the end of four types of speech.And the man becomes aware of Adwait the unity…He realizes that Brahm the Almighty is not different from him.He realizes his identity with the Almighty.But according to Dnyaneshwar such identity is not complete. because  such realization leaves behind the traces of Dwait .

The four types of speech help him to understand the Adwait.One always remembers this help given by the speech. Awidya is not totally forgotten.Shri Dnyaneshwar illustrates this point through  four appropriate examples.When iron is melted it still exists in liquid form.When wood is burnt it remains in the form of fire.When salt is mixed with water it leaves behind the salty taste.When the sleep ends and one is awakened  one still remembers  that it is the sleep that has ended.Similarly when the Avidya ,the ignorance.vanishes one still remembers it as the one who helped him to realize his identity with the Almighty.

————–=========

2७ ऑगस्ट २०१४

ज्ञानेश्वरकृत अमृतानुभव

वाचाऋण परिहार.  प्रकरण ३ ,ओवी ३.८

हा तत्वज्ञानदिवा । मरोनि इही लावावा ।

तरी हाहि शीण लेवा । बोधरूपेचि ।। ३.८ ।।

ब्रह्मज्ञान (तत्वज्ञान) झाल्यावर चुकीची  समजूत करून घेणार्या  चार वाणी नाश(मरोनि) पावतात.पण त्या अहं बह्मास्मि हा तत्वज्ञान दिवा लावून नाश पावतात.पण अखंड ज्ञानरूप(बोधरूपेचि) आत्म्याने हा ज्ञानदिवा वागविणे व्यर्थच शीण होय.

On realization of Brahmdnyan the four types of speeches die but before that they light the lamp of my identity with the almighty.However it is fruitless to carry this lamp as Atma is always knowledgeable

अविद्येमुळे चार वाणी निर्माण होतात.अविद्या म्हणजे अद्वैताची जाण नसणे.परब्रह्माची जाणीव नसणे.जीव स्वतःला ब्रह्मापासून वेगळे समजतो. चार वाणींच्या सहाय़्याने जीव स्वतः व परब्रह्म ह्यातील ऐक्य समजाऊन घेतो.खर म्हणजे ते ऐक्य असतेच.पण अविद्येमुळे जीवाला ते समजत नाही.वाणीच्या सहाय्याने मी म्हणजे माझा देह ही कल्पना नाहीशी होते.व मी ब्रह्मरूप आहे हे त्याला जाणवते.अविद्या नाहीशी झाल्यामुळे त्यातून निर्माण झालेल्या चार वाणीही नाहीशा होतात.पण त्या विजताना तत्वज्ञानाचा दिवा लावून जातात.अहं ब्रह्मास्मि मी ब्रह्मस्वरूप आहे हे ते तत्वज्ञान. परंतु ह्या तत्वज्ञानाचा दिवा वाहण्यात काही अर्थ नाही.कारण मी ब्रह्मरूप मूलतःच आहे.त्याचे मला ज्ञान असो वा नसो.

When ignorance disappears,when it dies the four speeches which are the creations of ignorance also die.However before they die they light the lamp of the realization that I am AlmightyDue to ignorance man conceives himself as distinct from Brahm,the almighty.However the   power of speech enables him come out of this fallacious feeling and he realizes that he is Brahm.One may therefore feel obliged to powerful speech.But it is not necessary as my identity with The Almighty  always exists irrespective of whether  I recognize it or  not.It is not new finding.

—–=====

सुप्रभातम्

श्रीज्ञानेश्वरकृत अमृतानुभव

प्रकरण ३ , वाचाऋण परिहार, ओवी ३.९

येऊनि स्वप्न मेळवी । गेलिया आपणपां दावी ।

दोन्ही दिठी नांदवी । निद जैसी ।। ३.९ ।।

झोप आली असता स्वप्ने दिसतात(मेळवी) पण ती गेल्यावर  आपण एकटेच(आपणपां) आहोत हे जाणवते.पण या दोन्ही जाणिवात(दिठी) निद्राच आहे.(नांदवी)

माणूस झोपण्यापूर्वी एकटाच असतो. मी एकटाच आहे असे त्याला जाणवत नसते. पण झोप लागल्यावर त्याला अनेक स्वप्ने पडतात. त्याला अनेकत्वाचे भास होतात.अनेक गोष्टी दिसू लागतात. जागा झाल्यावर त्याला समजते की आपण पाहिले ते स्वप्न होते.खरे काहीच नव्हते.त्याला समजते की आपण एकटेच आहोत. हे एकटेपण स्वप्नातील बहुपणाच्या संदर्भात असते.तेही लटकेच असते.कारण तो मुळचा एकटाच होता.पण त्याला त्याची जाणिव नव्हती.दोन गोष्टी असतील तर एकटेपणाची जाणिव होते.दोनाच्या संदर्भात एक अर्थपूर्ण आहे.एकच असेल तर एकाला वेगळेपण गहातच नाही.

सुप्रभातम्

श्रीज्ञानेश्वरकृत अमृतानुभव

प्रकरण ३, वाचाऋण परिहार , ओवी ३.१०

जीती अविद्या ऐसी । अन्यथाबोधाते गिवसी ।

तेचि यथाबोधेसी। निमाली उठी ।।३.१०।।

जोपर्यंत अविद्या जिवंत आहे तोपर्यंत ती चुकीची समजूत करून देते (अन्यथा बोध) करून देते व जेव्हां ती मरते(निमाली) तेव्हा योग्य समजुतीच्या(यथार्थबोध) रूपाने परत उठते.

So long as ignorance is alive , it creates misunderstanding and when ignorance dies it becomes active in the form of right understanding.

ह्या ओवीत जो विचार मांडला आहे तो वरवर पहाता परस्परविरोधी वाटतो.पण श्रीज्ञानेश्वरांच्या मते तसे नाही.जोपर्यंत अविद्या जीवंत आहे तोपर्यंत ती जीवाच्या मनात विविध भास निर्माण करते.अविद्या म्हणजे अद्वैताचा विसर व द्वैताचे स्मरण.विश्वातील विविधता त्याला अधिक आकर्षित करते.व त्यातील ऐक्याचे विस्मरण होते.ह्यालाच ज्ञानेश्वर अन्यथा बोध असे संबोधतात.पण जेव्हां अविद्या मरते व जीवाला अद्वैत जाणवते व आपले ब्रह्म स्वरूप समजते तेव्हां ती परत जागृत होते.द्वैताची जाणीव नाहिशी होणे म्हणजेच अविद्येचे मरण.पण ती मेली व आपल्याला अद्वैताची जाणीव झाली ह्या प्रक्रियेत मेलेल्या अविद्येची आठवण रहातेच.ती आठवण रूपाने जीवंत रहाते.

The present O`wi reveals subtle meaning of a statement which apparently looks fallacious .the O`wi  refers to man`s ignorance about his relation with the Universe. This ignorance is called Avidya which makes him feel that he is distinct from the universe.He visualizes the universe in multifarious form and not in Adwait(unity) form.So long as this misunderstanding persists it creates illusions in the mind of the perceiver.But it revitalizes when the ignorance dies i.e.when he realizes unity in the universe .When something dies it does leave behind anything which has living part .But this happens .It looks absurd but according to Dnyaneshwar it is not.The next O`wi explains it further

–======

सुप्रभातम्

श्रीज्ञानेश्वरकृत अमृतानुभव

प्रकरण ३,ओवी ३.११

परी जिती ना मेली । अविद्या हे जाकळी ।

बंधमोक्षी घाली । बांधोनिया ।। ३.११ ।।

परंतु(परी) अविद्या जीवंत वस्तु नाही वा मेलेली वस्तुही नाही.पण ती बांधते  व बांधून ती बंधमोक्षाच्या बंधनात घालते  Ignorance(Avidya) is neither alive nor dead but it ties down a man and chains  him in bondage(Bandhan) and freedom(Moksha)

अविद्या म्हणजे अद्वैताचा विसर व द्वैताची जाणीव होणे.अशी ही अविद्या पूर्णपणे नाहीशी होत नाही.ती कोणत्याना कोणत्या स्वरूपात शिल्लक रहातेच हा विचार ह्या ओवीत स्पष्ट केला आहे.अद्वैताचा विसर होणे ही जिवंत अविद्या होय.हा अन्यथा बोध झाला.विचारामुळे जीवाला अद्वैताची जाणीव होते व त्याला द्वैताची जाणीव रहात नाही.ही मेली अविद्या होय.हा यथार्थ बोध होय.अविद्या नाहिशी झाली म्हणजे ती मागे शिल्लक रहाणार माही असा आपला समज होतो.ज्ञानेश्वर म्हणतात प्रत्यक्षात तसे होत नाही.ही मेली अविद्याही द्वैताची जाणीव ठेवतेच.बंधनाची म्हणजेच द्वैताची जाणीव करून देतेच.जीवाला द्वैतातून मुक्ती म्हणजेच मोक्ष मिळावा असे वाटते.थोडक्यात अविद्या जिवंत असो वा मेली असो बंधन व मुक्ती ह्या फेर्यात जीव अडकतोच.

अविद्या म्हणजे अद्वैताचा विसर व द्वैताची जाणीव होणे.अविद्या ही काही वस्तू नाही.त्यामुळे तीच्यासाठी जगणे आणि मरणे संभवत नाही.पण जीव मात्र मी अज्ञानी आहे असा चुकीचा समज करून घेतो. तो खर तर ब्रह्मस्वरूप,सर्वव्यापी आहे .पण तो चुकीची समजूत करून घेतो की मी देहापुरताच मर्यादित आहे.तो ज्ञानस्वरूप आहे पण तो स्वतःला अज्ञानी समजतो व विपरीत कल्पना करतो व स्वतःला बांधून ठेवतो.अशा चुकीच्या कल्पना विचाराने नाहिशा झाल्या म्हणजे मी मुक्त झालो असे समजतो.पण आत्म्याच्या बाबत बंधन व मुक्तता असा भेद नसतोच.जीव असा भेद अविद्येमुळे करतो.

Ignorance (Avidya) is a state of mind which fails to understand unity(Adwait).Failure to understand and repose faith in Adwait is live Avidya and realizing the existence of Adwait is dead Avidya.

सुप्रभातम्

ज्ञानेश्वरकृत अमृतानुभव

वाचाऋण परिहार ,ओवी ३.१२

मोक्षुचि बंधु होये । तरी मोक्ष शब्द का साहे ।

परी अज्ञानघरी वाये ।वाऊगी यांची ।।३.१२।।

मोक्ष हाही जर बंधच आहे तर त्याला मोक्ष शब्द कशाला लावायचा.पण अज्ञान आहे तोपर्यंत उगाचच(वाउगी) बद्धता व मुक्तता ह्या प्रतिष्ठा(वाये) मिरवितात,म्हणजे जीवच अज्ञानामुळे त्या बंध मोक्षाची कल्पना करतो.

If salvation also implies bondage then the word salvation is meaningless. But so long as ignorance(Avidya) exists  the concepts bondage and salvation display their grandeur .In other words it is because of ignorance the man imagines the existence of bondage and salvation.

आपल्याला रोजच्या जीवनात पूर्णपणे एकमेका विरूद्ध संकल्पना अनुभवास येतात.त्यातील एक हजर असेल तर दुसरी असत नाही.उदाहरणार्थ ज्ञान-अज्ञान,सुख-दुःख ,बंधन-मोक्ष इ.ज्ञानेश्वर वेगळे मत मांडतात.रोजच्या जीवनात जीवाला विविध बंधनांना तोंड द्यावे लागते.ही बंधने तो करत असलेल्या कर्मांमुळे निर्माण होतात.अविद्येमुळे तो अद्वैताला विसरतो व तो कर्मांच्या साखळीत अडकतो.ह्या बंधनातून तो मुक्ती मिळवू इच्छितो.म्हणजेच मोक्ष मिळवू इच्छितो.वाचा तथा शब्दांच्या सहाय्याने त्याला अद्वैताची जाणीव होते म्हणजेच त्याला मोक्ष तथा बंधन मुक्ती   मिळते.पण ज्ञानदेव म्हणतात अशा रितीने मिळवलेला मोक्ष बंधनमुक्त नसतो .मी बंधनमुक्त झालो ह्या जाणिवेतच बंधनाची आठवण शिल्लक रहाते व निखळ मोक्षप्राप्ती होत नाही.

In our daily life we often come across mutually exclusive events such as knowledge and ignorance, awakening and sleep, salvation  and bondage. If one of them is experienced the other one is missing.Shri Dnyandeo however argues that it is not always true.For exmple salvation(Moksha) implies that it is free from any bondage. we have in earlier Owi learnt that  it is because of ignorance (Awidya) that man forgets unity(Adwait) and as a consequence is entangled in the vicious circle of (Karma) actitivity.But he is anxious to get freedom from the bondage created by Karma.It is Vacha (language) that helps him to get the most coveted freedom.But he is not completely successful in his endeavour  He still remembers Dwait as he says to himself  “ I am now free from Avidya and Dwait “.Remebering what he wants to forget amounts to not forgetting it.Therefore he argues that if salvation includes bondage why should we call it salvation.

बागुलाचेनि मरणे । तोषावे की बाळपणे ।

येरा तो नाही मा कोणे । मृत्यु मानावा ।। ३.१३ ।।

आईने बागुल आला म्हटले असता खरे वाटून मूल भिते व बागुल मेला असे म्हटले तेहि खरे वाटून मूलआनंदी होते(तोषावे).पण ज्याला बागुल  अस्तित्वातच नाही असे वाटते तो बागुलाचे येणे व मरणे दोन्ही खोटेच मानतो.

A child gets frightened when he is told that a bugbear has come and he  becomes happy when  he is told that the bugbear has gone but one who knows that in reality the bugbear does not exist he treats both the events viz. bugbear coming and going are falsehood.

आूसो हा ज्ञानरूप आहे.त्यामुळे अविद्येमुळे निर्माण होणारी बंधने त्याच्याबाबत निर्माणच होत नाहीत आणि बंधनच नसल्यामुळे बंधनातून मुक्ती देणारा मोक्षही ओसत नाही.ही संकल्पना ज्ञानेश्वर एका लहान मुलाच्या गोष्टीद्वारे स्पष्ट करून सांगतात.रडत असलेल्या मुलाला आई बागुलबुवाची भिती दाखवते व त्याचे रडणे थांबले म्हणजे बागुलबुवा गेला असे सांगते.पण ज्याला माहीत आहे की बागुलबुवा खोटाच आहे त्याला बागुलबुवाचे येणे व जाणे दोन्हीही खोटेच वाटतात.

Because of ignorance(Adnyan) a person assumes that there exists bondage (Bandhan) and salvation (Moksha).But this is a myth.In reality   there is nothing like bondage and salvation.Shri Guru Dnyaneshwar attempts to elucidate this point through a popular children story.A child gets frightened  when he is told that a bugbear has come and feels relieved when he learns that the bugbear has gone. But one who knows that in reality the bugbear does not exist both his coming and going is unreal.Same is the case of Atma.He posses knowledge .He is replete with knowledge.Even a modicum of ignorance does not reside in him.Therefore the phenomenon , the concepts of bondage and salvation are not relevant with reference to Atma.Bondage is created because of ignorance but  ignorance has no relevance with respect to Atma.Therefore as bondage does not exist the question salvation(Moksha) does not arise.

घटाचे नाहीपण  । फुटले याची नागवण ।

मानितसे तें जाण । म्हणो ये की ।। ३.१४ ।।

घट अजून तयार व्हायचा आहे आणि तो फुटला व माझे नुकसान(नागवण) झाले असे म्हणणे  होईल

Just as it is meaningless to say that my earthen pot is broken and I have suffered a great loss when in reality the earthen pot is yet to be prepared.

आत्मा हा पूर्ण ज्ञानरूप आहे. अविद्येमुळे निर्माण होणारी बंधने त्याबाबत अर्थहीन आहेत.आत्म्याला बंध माहीत नाही.त्यामुळे चार वाणींच्या सहाय़्याने अविद्येचा नाश करून बंधनातून मुक्ती,मोक्ष मिळवणे संभवत नाही.तसे करणे म्हणजे घट निर्माण होण्यापूर्वीच तो फुटला व माझे नुकसान झाले असे म्हणण्यासारखे आहे.

It is  a common experience that on many occasions people claim that they have innovated something which already exists .It is often succinctly described as “Reinventing the wheel”. A similar phenomenon is observed in the case of Atma . It never happens that with the help of four Vani ignorance of Atma is removed and its pure, immaculate form is revealed. It is always pure .  Shri Dnyaneshwar explains this phenomenon through an illustration.It is meaningless to say” I have suffered a loss because my pot is broken when actually the pot is not yet manufactured.”

म्हणोनि बंधचि तव वावो । मा मोक्ष के प्रस्तावो ।।

परी मरोनि केला ठावो । अविद्या तया ।। ३.१५ ।।

आत्म्याच्या ठिकाणी बंधन नाही(वावो).तिथे मोक्षाचा प्रश्न निर्माण होत नाही.परंतु अविद्येने मरून मोक्षाला जागा मिळवून दिली(प्रस्तावो) म्हणजेच  अविद्या मेली  मी मुक्त झालो असे जीवाला वाटणे.

Atma is always bondage free and therefore the state of salvation never exists in the case of Atma.But the death of ignorance creates space for the salvation and  the ego feels that it has become free from bondage.

चार वाणींच्या सहाय्याने अविद्येमुळे मिर्माण झालेले बंधन नष्ट होते.आणि मोक्ष प्राप्त होतो.पण बंध पुर्ण नष्ट होत नाही.अविद्येचा ,,बंधनाचा  काही अंश रहातोच.खर म्हणजे आत्मा नित्य मुक्तच असतो. तेव्हा बंध जाऊन मुक्ती मिळण्याचा प्रश्नच् कुठे ऊद्भवतो.उपदेशामुळे अविद्या नाहीशी होते,ती मरते पण आत्म्याच्या ठिकाणी बंधाच स्मरण व मोक्षाची जाणीव ठेवून जाते ही संकल्पना ह्या ओवीत स्पष्ट केली आहे.

The four vani enlightens a person and frees him from the bondage.and attain Moksha the state of salvayion .But in reality   even though freedom is attained it is not complete. Traces of Avidya , ignorance and bondage are left behind ‘One remembers what has been removed and that is the constant reminder of what is removed .But this is not meaningful at all because Atma is aways free from any kind of bondage and removal is irrelevant.

——-====

अज्ञान हे बंध निर्माण करते हे तर सर्वमान्य आहे.पण श्री ज्ञानेश्वर त्यापुढे जाऊन हेही नमूद करतात की ज्ञानसुद्धा बंधन निर्माण करते.आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ते श्री शिव व भगवान श्रीकृष्ण यांचीही मते उद्धृत करतात.भगवान् शंकर ह्यांनी शिवसुत्रात ज्ञानं बन्धः असे म्हटले आहे व भगवान क्षीकृष्ण भगवतगीतेत सांगतात(१४.६)

तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम् अनामयम् । सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ ।

सत्वगुण निर्मल असल्यामुळे तो प्रकाश देणारा व उपद्रवरहित व पापरहित असणारा तो सत्वगुण ,सुखाच्या (मी सुखी आहे) व ज्ञानाच्या (मी ज्ञानी) या दोन पाशांनी बद्ध करतो.

श्री ज्ञानेश्वर पुढे हाही खुलासा करतात की भगवान शंकर व भगवान श्रीकृष्ण हे सांगतात म्हणून आपण ते मान्य करतो असे नाही  तर ते खरोखरीच सत्य आहे म्हणून ते मानतो.

In the following three O`wi Shri Dnyaneshwar quotes the opinions of the great authorities viz.Shri Shiv and shri Shrikrushna.Lord Shiv has expressed his opinion in his treatise Shivsutra, that knowledge creates bondage.Similarly the other great authority Bhagwan Shrikrushna in the Bhawatgeeta ,a guide to human action ,clearly states that even the pious enlightment creates bondage.His words are “

It contains Pious thought and it is clear,without mixture .is illuminator ,not creating any obstacles , but creates the feeling that I am happy and I am learned which  is bondage creator. However Shri Dnyaneshwar ensures that he does not accept the thesis that even the enlightenment is bondage creator just because the great authorities endorse this view but he accepts this view because it is really true

आणि ज्ञान बंधु ऐसे । शिवसुत्राचेनि .मिसे ।

म्हणितले असे । सदाशिवे ।। ३.१६ ।।

भगवान् शंकरानं ज्ञान बन्धः या शिवसूत्रात(मिसे ,निमित्ताने) ज्ञान हेही बन्धच आहे असे म्हटले आहे.

Shri Bhagwan Shankar in his Shivasutra has expressed that knowledge also creates bondage.

आणि वैकुंठीचेनीही सुजाणे । ज्ञानपाशी सत्वगुणे ।

बांधिजे हे निरोपणे । बहु केले ।। ३,१७।।

आणि वैकुंठीचा राजा भगवान श्रीकृष्ण(वैकुंठीचेनीही)  यांनीही (सुजाणे,चांगले जाणणारा)ज्ञानापाशी सत्वगुणाचं बंधन रहाते हे गितेत सांगितले(निरोपणे) आहे.

And the king of Vaikuntha (Heaven) Shrikjushna has also stated that (in Bhagwat Geeta)knowledge, enlightenment is associated with bondage

परी शिवे का श्रीवल्लभे । बोलिले येणेचि लोभे ।

मानू ते हे लाभे । न बोलताही ।। ३.१८।।

परंतु भगवान शंकरानी काय किंवा भगवान श्रीकृष्णानी म्हटले आहे म्हणून आम्ही ते मानतो असे नाही तर ज्ञान खरोखरीच बंधन आहे हे न सांगताही समजण्यासारखे आहे.

We  accept the statement that knowledge also creates bondage not just because it is  endorsed by Shri Shjv and Shrivallabha but we accept it because it is true.

जे आत्मज्ञान निखिळ । तेही घे ज्ञानाचे बळ ।

ते सूर्य चिंती सबळ । तसे नोहे ।। ३.१९ ।।

आत्मा हा सर्वथा(निखिळ) ज्ञानरूपच आहे आणि ज्ञानाच्या सहाय्याने मी बह्मरूप आहे ही जाणीव पक्की (बळ) करणे म्हणजे प्रकाशरूप सूर्याने आपल्या प्रकाश स्वरूपाचे सामर्थ्याने(सबळ) चिंतन करण्यासारखे आहे

Atma is always is  full of knowledge. Therefore it is meaningless to state that with the help of Guru and the four  Vani the ignorance is removed and the knowledge is impregnated into Atma.Such an argument is as absurd as the statement that the self illuminated Sun is illuminated by someone else.

चार वाणींच्या सहाय्याने अज्ञान नाहीसे करता येते.पण ह्या पद्धतीने अज्ञान दूर केले असता आत्मा आणि ज्ञान हे वेगळे आहेत असा समज होतो,पण ते बरोबर नाही कारण आत्मा हा ज्ञानरूपच असतो.ज्ञान काही  नव्याने मिळवायचे नसते.ते आत्म्याबरोबर असतेच. आत्मा अज्ञानरूप कधीच नसतो.त्यामुळे कोणाच्यातरी सहाय्याने अज्ञान दूर करण्याचा प्रश्न निर्माण हात नाही.तसे करणे म्हणजे स्वयंप्रकाशी सूर्याने प्रकाशासाठी दुसर्याची मदत मागण्यासारखे आहे.

Shri Dnyandeo explains in this O`wi the nature of Atma.Atma is always full of knowledge. It is Swayambhu i.e  the knowledge is not impregnated into Atma from outside.Atma does not contain even an ounce of ignorance.It is therefore self defeating  statement that Atma acquires knowledge with the help of Guru and the power of reason  Such a statement would be as absurd as the statement that the Sun who is self illuminated acquires light from other star.It amounts to saying that the Sun forgot that it is always illuminated.

ज्ञाने श्लाघतु आहे । ते ज्ञानपण धाडिले वाये ।

दीप वाचोनि दिवा लाहे । ते आंग भुललाचि की ।।३.२०।।

मी ज्ञानी आहे ,मी ब्रह्म आहे (अहं ब्रह्मास्मि) ह्या जाणीवेने जर जीव आपल्याला धन्य(श्लाघतु) मानू लागला तर आपली अखंड ज्ञानस्वरूपता तो विसरला (भुललाचि) असेच होईल.दिव्याने जर दुसरा दिवा प्राप्तकेला(लाहे)  तर तो स्वतःचे प्रकाशरूप विसरला असेच होईल .

The present O`wi explains the relation between Atma,knowledge(Dnyan) and ignorance(Adnyan).According to Shri Dnyaneshwar the Atma never posses even an ounce of ignorance.It  always posses Dnyan i.e. knowledge .It is as absurd as a lamp trying to acquire another lamp for its illumination

चार वाणींच्या सहाय्याने अज्ञान दूर केल्यावर जीवाला मी ज्ञानी झालो .मी ब्रह्म आहे असे वाटू लागते. आणि त्याचाच त्याला अभिमान,आनंद वाटू लागतो.पण ज्ञानेश्वर म्हणतात हे चुकीचे आहे. आत्मा हा सदासर्वदा ज्ञानरूपच असतो.त्यामुळे त्याचे अज्ञान नाहीसे झाले व तो ज्ञानी झाला असे म्हणणे अर्थहीन आहे.असे वाटणे हेच अज्ञान तथा बंधन आहे.हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वर एक अर्थपूर्ण उदाहरण देतात.ते म्हणतात दिव्याने दुसर्या दिव्याची प्रकाशासाठी याचना करण्यासारखे ते आहे.

One acquires DNYAN(knowledge) with the help of Guru and the four Vani and feels that he has now become fully learned one,He then feels that he has attained the highest position i.e. Brahm.But Dnyaneshwar argues that this is wrong state of mind.This is because Atma always posses knowledge.Then why one should boast that he has acquired Knowledge which implies that it as devoid of knowledge.It never happens that Atma acquires knowledge from outside..Such a statement is self defeating.It amounts to making an invalid statement.It implies that an  illuminated light takes the help of another lamp. It really amounts to saying that it has forgotten that it is already illuminated.

आपणपे आपणापाशी । नेणता देशोदेशी ।

आपणापे गिवसी । हे कीरू होये ।।३.२१।।

आपण आपल्यापाशीच असताना देशोदेशी हिंडून कोणी आपल्याला शोधण्याचा (नेणता) प्रयत्न केला तर तो खरोखरीच (कीरू) सापडेल (गिवसी) असे घडले  का.

Has it ever happened that , someone goes around the world in search of oneself when  one`s body is with himself and he found it  elsewhere?

आत्मा हा नेहमीच ज्ञानमय असतो. ज्ञान त्याला कधीच सोडून जात नाही .आत्म्याला अज्ञान माहिती नाही. असे असताना आत्म्याने कष्ट करून अज्ञान दूर केले व ज्ञान प्राप्त केले हे म्हणणे चुकीचेच आहे.हा मुद्दा ज्ञानेश्वर सहज पटणार्या एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करतात.माणसाचे शरीर हे त्याच्या जवळच असते.पण स्वतःला शोधायला तो बाहेर पडला तर ते त्याला सापडले असे कधी होईल का.हे जितके हास्यास्पद आहे तितकेच अज्ञान दूर करून आत्मा ज्ञानी झाला हे म्हणणे आहे.

In this Owe ,Shri Dnyaneshar explains his thesis that Atma is self made, he is Swayambhu and he is always accompanied by knowledge ..It never happens that he is ignorant and by removing his ignorance he acquires knowledge.(Dnyan i.e.Adwait).He explains this thesis thru an easy to understand simile.If someone says that he went out to search himself and he found himself .Will it not be a very absurd and a self defeating statement. The statement that Atma acquires knowledge by removing ignorance is equally an invalid statement.

परि बहुता का दिया । आपणापे आठवालिया ।

म्हणे मी यया । कैसा रिझो ।।३.२२।।

परंतु एकाद्यान स्वतःला खूप (बहुता)  दिवस (दिया) शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तो सापडला तर त्याला अत्यानंद (रिझो) होईल व त्याचे किती करू असे त्याला होईल

But if someone tried to move out and search oneself and if he does find  himself , he will be very delighted and will be puzzled how to express that joy.

आत्मा हा नेहमी ज्ञानरूपच असतो.त्याला अज्ञान माहिती नाही.तेव्हा चार वाणींच्या सहाय़्याने गुरूकडून अज्ञान दूर करून ज्ञानप्राप्ती केली हे म्हणणे आत्म्या बद्दल चुकीचेच आहे.हे अशक्य आहे.हा मुद्दा पटवण्यासाठी श्रीज्ञानदेव एक अत्यंत समर्पक दृष्टांत देतात.आपण आपल्यापाशीच असतांना जर एकादा स्वतःला शोधायला बाहेर पडला आणि मी सापडलो म्हणून आनंद व्यक्त करायला लागला तर ते किती हास्यास्पद होईल तसेच चार वाणीच्या सहाय़्याने आत्मज्ञान प्राप्त झाले हे म्हणणे चुकीचे आहे.

This O`wi will be more meaningful when read in continuation of the earlier one.If some one really forgets one`s identity and wanders around the world in search of himself and ultimately finds that he is with himself and not outside his body will he not rejoice very much? But is it fair and appropriate to celebrate that success . He realizes that it was futile to do so. His missing , his disappearance and then his discovery ,both were really false.Shri Dnyaneshwar uses this illustration to emphatically present his thesis that Atma is always in possession of  knowledge and to argue that he acquires knowledge from the Guru with the help of language and reasoning is absurd.The absurdity is brought to notice      with strength through another illustration which is equally absurd.

तैसा ज्ञानरूप आत्मा । ज्ञानेचि आपुली प्रमा ।

करितसे सोहमा । ऐसा बंधु ।। ३.२३ ।।

आत्मा हा नेहमीच ज्ञानरूप असतो आणि तोच त्याला जाणतो (प्रमा) आणि मीच ब्रह्म आहे असे समजतो.हाच ज्ञानरूप बंध (बंधु) आहे.

Atma is always in possession of  knowledge. It never contains Avidya i.e. ignorance. Atma recognizes the presence of oneself.This is bondage associated with knowledge.

आत्मा हा नेहमीच ज्ञानरूप असतो.अज्ञानी कधीच नसतो.अज्ञान बंध निर्माण करते गुरूकडून चार वाणींच्या सहाय़्याने अज्ञान दूर करून ज्ञान प्राप्त केले  म्हणजे मी मुक्त झालो.,बंध नाहिसे झाले हे समजणे चुकीचेच आहे.तो मीच आहे (सः अहं) असं जीवाला वाटते. मीच ब्रह्म आहे ही जाणीव होते.पण अशा जाणिवेतच बंधन आहे कारण त्या ज्ञानातच नष्ट झालेल्या अज्ञानाची जाणीव असते.अशा ज्ञानालाच श्रीज्ञानदेव अज्ञान तथा बंध असे म्हणतात.जो जीव तो(सः) आणि मी(अहं) हे वेगळे समजतो , तो अविद्याग्रस्त आहे.ती अविद्या चार वाणींच्या सहाय्याने दूर केली व मी ज्ञानी झालो असे जीवाला वाटते मी ब्रह्म झालो असा जप करू लागतो.मी व तो एकच झालो ह्या जाणीवेतच द्वैत आहे.श्रीज्ञानदेव म्हणतात अद्वैताची जाणीव निखळ,शुद्ध असायला पाहिजे . ती अज्ञानाच्या सापेक्ष असता कामा  नये.

The present O-wi comments on the concept of bondage associated with knowledge acquired through annihilation of ignorance.

जे ज्ञान स्वये बुडे । म्हणोनि भारी नावडे ।

ज्ञाने मोक्षु घडे । ते निमालेनि ।।३.२४।।

जे ज्ञान स्वतः बुडे म्हणजे लीन होते म्हणून त्याला काही किंमत नाही.जे ज्ञान नाहिसे होते ते आम्हाला आवडत नाही(नावडे).कारण हे ज्ञान लीन(निमालेनि) झाल असतानाच मोक्ष प्राप्त होतो.

We do not like, that knowledge which sinks on its own.. knowledge  enables you to reach salvation but only when it extinguishes on its own.

ह्य ओवीत श्री ज्ञानदेव ,ज्ञान,अज्ञान.अज्ञानाचा विनाश व मोक्ष ह्या चार संकल्पनांचे स्पष्टीकरण करतांत व त्यांचे एकमेकांशी असलेले संबंधही स्पष्ट करतात.अज्ञानाचा विनाश करून ज्ञान प्राप्त होते.मोक्ष प्राप्तीहोण्यासाठी अज्ञान नष्ट व्हावयास पाहीजे.

The present Owi explains the relation between knowledge, ignorance, its extinguishing, and salvation, Knowledge obtained by annihilation of ignorance has serious limitations. Ignorance creates bondage and therefore one tries to remove it ,to destroy it and acquire knowledge. But in the process of acquisition of knowledge one always remembers what ignorance  was destroyed and this  process creates bondage and therefore keeps away from salvation. Shri Dnyaneshwar argues that it is possible to attain salvation but only when even the knowledge  too is destroyed.

म्हणोनि परादिका वाचा । तो शृंगारू चौ आंगाचा ।

एवं अविद्या जीवाचा । जीवत्व त्यागी।।.२५।।

म्हणून परा वगैरे चार वाणी ह्या चार देहांचा शृंगार आहे आणि तो अविद्या आहे व जीवाचे जीवपण नाहिसे होते तेव्हांही वाणीच्या आश्रयाने रहातो .

Therefore the Paraa and the four kinds of languages are decoration of body but they actually represent   Ignorance and when one`s life ends it stays in its(vaani) shelter.

आंगाचेनि इंधने उदासु । उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशु ।

करी तेथे भस्मलेशु । बोधाचा उरे ।।३.२६।।

ज्याप्रमाणे आगीत लाकडे टाकल्यावर ती जळून जातात व खाली राख रहाते त्यप्रमाणे चार वाणींच्या आश्रयाने रहाणारी अविद्या वा चार देहांनी युक्त अविद्या यातील जडभाव जळून जाऊन खाली बोधरूप भस्म शिल्लक रहाते.

Just as when wood is thrown into fire it burns and turns into ash ,in the same way the Ignorance which  stays in the shelter of four languages(vani)   also is burnt into ashes but stays behind in the form of   knowledge(Dnyan)

आंगी लाविलिया विभूति । ते परमाणूही झडती ।

परी पांडुरत्वे कांती । राहे जैशी ।।३.२७।।

अंगाला विभूती लावल्यावर त्यातील परमाणू झडून गेल्यावर त्याचा पांढरेपणा शिल्लक रहातो

When ash is smeared all over body ,after sometime ash falls down but its whiteness stays behind.

जळी जळा वेगळु । कापुर न दिसे अवडळु ।

परी होऊनि परिमळु । उरे जेवी ।।३.२८।।

कापूर पाण्यात मिसळला असता कापूर कुठेच दिसत नाही पण सुवासाच्या रूपाने कापूर तिथेच असतो

When camphor is put into water it dissolves in water but it remains there in the form of its fragrance

ना वोहळला आंगी जैसे । पाणी पाणीपणे नसे ।

तर्ही वोल्हासाचेनि भिसे । आथीच ते ।।३.२९।।

स्नान केलेल्या माणसाच्या आंगावर पाणी रहात नाही पण  स्नान केल्याचं चिन्ह म्हणजे ओलावा तो रहातोच

When one takes bath water  flows out and does not remain on body but its dampness stays behind

नातरी माध्यान्ह काळी । छाया न दिसे वेगळी ।

असे पायातळी । रिगौनिया ।।३.३०।।

दुपारच्यावेळी आपली सावली आपल्याला दिसत नाही पण ती आपल्या पायाखाली लपलेली असतेच

We do not see our shadow at noon time but it exists below our feet.

तैसे ग्रासूनि दुसरे । स्वरूपी स्वरूपाकारे ।

आपुलेपणे उरे । बोध जो का ।।३.३१।।

(ज्याप्रमाणे दुपारच्यवेळी आपली सावली आपल्या पायाखालीच असते) त्याप्रमाणे द्वैताचा नाश करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचा बोध होतो

Just as our shadow exists below our foot during noon time) similarly  Atma looses its existence stays behind in the form of its Knowledge(Dnyan)

ते ऋणशेष वाचा इया । न फेडवेचि मरोनिया ।

ते पाया पडोनि मिया । सोडविले ।।३.३२।।

मी ब्रह्म आहे हा बोधच वाचेच ऋण आहे.ते ऋण मरणानंतरही फिटत नसल्याने मी ते गुरूच्या पाया पडून सोडविले आहे.

म्हणोनि परा पश्यंती । मध्यमा हन भारती ।

या निस्तरलिया लागती । ज्ञनी अज्ञानीची ।।३.३३।।

परा वगैरे चार वाणी अज्ञानकालीच भासतात आणि तो भास ज्ञानान नाहीसा करून ,ज्ञानकाली होणार यांचा भास भक्तीन नाहीसा करावा लागतो.

सुस्वागतम् २०१४

nilkanth bapat

पहिले लिखाण दीनांक ८ जानेवारी २०१४

View original post

Dnyneshwar describes in Chapter-2,the glory of Guru,the mentor. His charactristics forms the subject matter of this chapter.Nivrittinath is his elder brother and also his Guru.The functions of a Guru are well elucidated by Dnyaneshwar in this chapter.Guru`s blessing is salvation,a heavenly experience.One experiences eradication of ignorance.It is as holy as bath in the river Ganges.He helps you to understand the secrets of universe and destruction of one`s ego resulting into realization of prayer.Dnyaneshwar successfully describes the greatness of Guru .According to him Guru is larger than the Unverse and Shiv the creator of the universe.Guru exists but cannot be seen.He is right but He does not shine.He can be and cannot be respected by conveying Namaskar.
Nivrutinath is his elder brother and also e his Mentor.The name Nivruti suggests that he has relinquished something but that is not so .He is self-existent.Even when He exists in some form he is self-existent.Nivruti i.e.self denying is his natural form,his kingdom.Just as moon and its moonlight are blended in each other ,Nivruti name and his disposition are wholly integrated into each other.

अमृतानुभव-५३ प्रकरण-२
श्रीगुरूमहिमा
आतां उपायवनवसंतु । जो आज्ञेचा आहेव तंतु ।
अमूर्तचि मुर्तू । कारूण्याचा ।।१।।
जो विविध प्रकारच्या साधनरूपी(उपायरूपी) वनाला वसंतऋतूसारखा आहे व जो आज्ञेचा(अहंब्रह्मास्मि व तत्त्वमसि) अखंड धागा(तंतु) आहे,आणि जो अमुर्त असूनही करूणेने मूर्त आहे.
He is like spring season for the forest of different solutions and an unbroken thread of heavenly orders and though is formless is material ,tangible in terms compassion.

ह्या पूर्विच्या प्रकरणात ज्ञानदेवांनी शिव व शक्ती वेगळे नसून ते एकच आहेत हे स्पष्ट केले आहे.पण ही जाण सामान्य जीवाला नसते.त्याला सभोवतालचे जग व त्याचा निर्माता शिव हे वेगळे आहेत असे वाटते.तो गैरसमज दूर करण्यासाठी त्याला गुरूची मदत लागते.गुरूजवळ अनेक उपाय असतात.वसंत ऋतूत जसे वन प्रफुल्लित दिसते तसे गुरूच्या सानिध्यात जीव अद्वैताचे ज्ञान प्राप्त झाल्याने प्रफुल्लित होतो. गुरू हा आज्ञेचा अखंड धागा आहे.अहंब्रह्मास्मि व तत्त्वमसि ह्या त्या दोन आज्ञा की ज्यांच्या ज्ञानामुळे ब्रह्म आणि चराचर जग ह्यांच्यातील ऐक्य समजते.परमेश्वरापासून शिष्य परंपरेने हे ज्ञान गुरूला प्राप्त झालेले असते.यालाच ज्ञानदेव आज्ञेचा अहेव तंतु असे म्हणतात.ही ब्रह्मविद्या म्हणजेच गुरू अमूर्त आहे.पण शिष्याबद्दल वाटणार्या करूणेने,आस्थेने ही विद्या गुरूरूपाने साकार होते.ज्ञानदेव म्हणतात अमूर्तचि मुर्तू कारूण्याचा

Page-2,prakaran-2

In an earlier chapter Dnyandeo had explained the unity ,integration of Shiv and Shakti ,between the creator and the creation. Common man is confused and unable to understand and appreciate this relationship between Shiv and Shakti.He needs guidance of a knowledgeable and experienced.One who can perform this function is Guru ,the Mentor.Guru has many solutions to this problem.Just as oncoming of spring changes the atmosphere of a jungle by making it cheerful ad pleasant ,the many solutions that the Guru has contrived makes atmosphere of understanding the integration of Shiv and Shakti cheerful.The solution suggested by Guru is the divine order that I am Brahm and so also you.Guru has earned this ability to guide people through the tradition of teacher-student lineage.The principle of Brahm and therefore of Guru is an abstract and formless.But Guru has great compassion for everyone and therefore takes a suitable form.

ज्ञानेश्वरकृत
अमृताभव-५४ प्रकरण-२
गुरूमहिमा
अविद्येचे आडवे । भुंजीत जीवपणाचे भवे ।
तया चैतन्याचे धांवे । धावेकारू जो ।।२।।
अविद्यारूपी अरण्यात(अडवे) सापडून जीवपणाचे फेरे(भवे) भोगणार्या जीवचैतन्याने धावा केला(धांवे)असता त्याच्या धावेला जो धावून येणारा(धावेकरू) आहे.
And he is the one who instantly attends the call of a disciple who is lost in the jungle of ignorance and is caught in the cycle of birth and death and then seeks the help

ज्ञानदेव ह्या ओवीत गुरूचे महात्म्य सांगत आहेत.सामान्य जीव अज्ञानी असतो .तो स्वतःला ब्रह्मापासून वेगळे समजतो.हेच त्याचे अज्ञान आहे.त्यामुळे तो जन्म-मृत्युच्या फेर्यात सापडतो.त्याची स्थिती जंगलात वाट चुकलेच्या वाटसरूसारखी होते.त्याला बाहेर पडायचा मार्गच सापडत नाही.विविधतेने नटलेले हे जग त्याला स्वतःपेक्षा वेगळे वाटते.खर म्हणजे हे सर्व विश्व हे ब्रह्मच आहे व जीव हा त्याचाच एक अविभाज्य भाग आहे.पण जीवाला हे उमजत नाही.तो वेगळ्या भासणार्या विश्वाशी तादात्म्य पाऊ शकत नाही.अशा अवघड परिस्थितीत गुरू क्षणात धावून येतो.

In this O`wi Dnyandeo explains the greatness of Guru,the mentor.A common man is like a traveler lost in a thick jungle,unable to find a way out.A person is unable to comprehend the intricacies of the universe.He feels that the universe is separate from him. Dnyaneshwar calls this as Awidya,ignorance .Because of this ignorance he has to face the infinite number of birth-death cycle.In reality the two are inseperably integrated into one.. When the common man encounters such situation he intensely feels the need of a person who will help him out and it is the Guru who very ably performs this function.

अमृतानुभव-५५ प्रकरण-२
गुरूमहिमा

मोडोनिया माया कुंजरू । मुक्त मोतियाचा वोगरू ।
जेवविता सद्गुरू । श्रीनिवृत्ति वंदु ।।२.३।।

मायारूपी हत्तीमोडून ज्यांनी मुक्तपणाच्या मोत्याचे भोजन घातले,त्या सद्गुरू निवृत्तीनाथांना मी वंदन करतो.
I bow before the great mentor Nivrutinath who had killed the illusory elephant and fed the pearls in his head to all.

ह्या ओवीत ज्ञानदेव आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी एका लोकभावनेचा उपयोग करतात.हत्तीच्या गंडस्थळात मोती असतात अशी लोकभावना आहे.मोती हे शहाणपण दर्शवतात.कुंजरू म्हणजे हत्ती.हा हत्ती मायावी आहे . मायारूप जीवाच्या अज्ञानामुळे ते अज्ञान त्याला धोकादायक ठरते.शामान्य माणूस हा स्वतः व ब्रह्म ह्यात फरक करतो.तोही ब्रह्मच आहे.हे विश्व ब्रह्माचीच निर्मिती आहे.व तोही.तो व विश्व ह्यात संघर्ष निर्माण होतो.पण त्या अज्ञानामुळे तो दुःखी होतो. अशावेळी गुरू त्याच्या मदतीस येतो.ही घटना ज्ञानेश्वर मोठ्या काव्यमय भाषेत स्पष्ट करतात.मायारूप हत्तीला ते मारतात म्हणजेच जीवाचे अज्ञान नष्ट करतात .हत्तीच्या गंडस्थळातील मोती म्हणजेच शहाणपण सर्वाना वाटतात ,सर्वांना जेवू घालतात.
Dnyaneshwar in this Owi refers to a poetic general public feeling that an elephants head is a storehouse of pearls which represent wisdom. Here elephant represents worldly illusion .The elephant is killed and pearls of wisdom stored in its head are fed to the people.A common man is beset with illusions.He fails to comprehend the integration of the universe and the Brahm the creator.He genuinely feels that he is different ,separate from Brahm .This seperateness between him and the universe generates the enmity between the two and the major cause of grief and sorrow in life.It is in this context that Dnyandeo expresses great respect towards Nivrutinath and bows before him because the Guru kills the elephant who represents ignorance and feeds the pearls to people .

अमृतानुभव-५६ प्रकरण-२ ,
गुरूमहिमा ओवी-२.४
जयाचिये अपांगपाते । बंध मोक्षपणी आते ।
भेटे जाणतया जाणते ।जयापाशीं ।।४।।
ज्यांच्या कृपादृष्टीने बंधनच मोक्ष होते आणि ज्यांच्यापाशी जाणतेच जाणत्याला भेटते.
The blessings of Guru enable a bondage(Bandh) to attain Adwait(Moksha) and the perceiver unites with what is perceived.
आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे मनाची जी स्थिती होते तिला बद्धस्थिती असे म्हणतात.द्वैत हेच खरे आहे हे मानणे म्हणजे बंध.अद्वैत खरे आहे हे मानणे म्हणजे मोक्ष.ज्ञानेश्वर म्हणतात गुरूकृपेने बंधनालाच मोक्षरूप प्राप्त होते.गुरूकृपेमुळे जीवाला सर्वत्र द्वैत,विविधता न जाणवता त्यातील ऐक्य ,अद्वैत जाणवते.अशावेळी जाणताच,जे जाणायचे त्याला भेटतो. जाणणारा व जे जाणायचे ते हे वेगळे आहेत हा द्वैत विचार झाला. गुरूकृपेमुळे जाणणारा जे जाणायचे ते एकच होतात.दोन निराळ्या वस्तू पाहणे ही अविद्या होय व अद्वैत तथा एकच वस्तू पाहणे ही विद्या होय.
A common man fails to know oneself and it leads to many misunderstandings.He feels that he is chained to something(Bandh). Dnyaneshwar argues that this arises because man observes the universe as a collection of many different things,different from the creator.This is the state of Dwait and is called ignorance(Avidya).blessings of Guru a common man is able to attain Heaven(Moksha) that is the state of mind which recognizes the world as Adwait ,unity-oneness and not duality, Dwait In the state of Adwait,unity perceiver unites with what is perceived.The distinction between the perceiver and what is perceived vanishes..

अमृतानुभव-५७ प्रकरण-२

गुरूमहिमा, ओवी २.५
कैवल्य कनकाचिया दाना । जो न कडसी थोर साना ।
द्रष्ट्याचे दर्शना । पाठाऊ जो ।।२.५।।
मोक्षरूपी(कैवल्य) सोने(कनक) दान करताना जो लहान(साना) मोठा भेद, परीक्षा(कडसी) करत नाही आणि जो द्रष्टा जे आत्मरूप त्याच्या साक्षात्काराचा मार्ग दाखविणारा आहे.
Guru donates Moksha, Salvation to all irrespective of the status of a person whether he is a dignitary or a commoner .He is a guide and the right path towards search of Atma the self.

गुरू मोक्षरूपी सोन्याचे दान करतात.मोक्ष म्हणजे अद्वैत.गुरू अद्वैताची जाणीव करून देतात.अद्वैताचे दान करताना गुरू श्रीमंत गरीब,लहान थोर असा फरक करत नाहीत.ते सर्वांपाशी समदृष्टीने वागतात.आत्मा हा द्रष्टा आहे.गुरू आत्मसाक्षातकार धडवितात.आत्म्याचं दर्शन घडवितात.ज्ञानेश्वर गुरूचे वर्णन पाठाउ, आत्मदर्शन घडविणारा असे करतात.हे दर्शन तो सर्वाना समबुद्धीने घडवतो.

Guru offers Moksha to all.While doing so he does not discriminate between rich and the poor,dignitary and a commoner.He treets all equally.Guru helphs the devotee to realize Atma,oneself.Guru is a path finder.He shows the right path to a devotee.

अमृतानुभव ५८ प्रकरण-२ गुरूमहिमा ओवी २,६
सामर्थ्याचिनि बिके । जो शिवातेहि गुरूत्वें जिंके ।
आत्मा आत्ममुख देखे । आरसा जिये ।।२.६।।
सामर्थ्याच्याबळाने गुरू शिवापेक्षाही श्रेष्ठ ठरतात,कारण त्यांच्या आरशातच आपले मुख पाहू शकतो.
ह्या ओवीत गुरू गुरू व शिव ह्यांची तुलना करतात व गुरूची दोन महत्वाची वैशिष्ट्ये सांगतात.(१).गुरू हा शिवापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे. (२) गुरू जीवाला स्वतःची ओळख करून देतो.शिव हे मायारूपी विश्र्व निर्माण करतो व त्याची जीवाला ओळख करून देतो.आपल्या कर्मानुसार व जन्ममरणपरंपरानुसार जीवाला सुखदुःखाचा उपभोग घेण्यास मदत करतो.असा उपभोग घेताना जीव आपले आत्मस्वरूप विसरून जातो.सभोवतालच्या विश्र्वाला तो त्याच्यापासून वेगळा समजतो व त्याचा तो जास्तित जास्त उपभोग घ्यावय़ाचा प्रयत्न करतो.आपण त्या विश्र्वाचेच भाग ओहोत हे तो विसरतो.शिवाला शिवरूपाने जीवाचा उद्धार करता येत नाही.त्यासाठी त्याला गुरुरूप धारण करावे लागते. म्हणूनच गुरू हा शिवापेक्षाही मोठा,सामर्थ्यवान आहे.गुरू आपल्या विद्यासामर्थ्याने जीवाला शिवनिर्मित विश्र्व मायारूपी,खोटे आहे हे पटवून देतो व खर्या,मूळ स्वरूपाची जाणीव करून देतो.आपण आपले मुख पाहू शकत नाही.त्यासाठी आपल्याला आरशाची जरूरी भासते. स्वतःचे मूळ रूप पहाण्यासाठी आपल्याला गुरूरूपी आरसा मदत करतो.शिव ,जीवाला कर्माप्रमाणे विषयानंद मिळवून देतो तर,गुरू अखंड ब्रह्मानंद मिळवून देतो.

Owi 2.6

In terms of effectiveness,Guru is superior to Shiv, because a person can see his face in the teacher who appears in the form of mirror. In this Owi
Dnyaneshwar compares the effectiveness of Guru and Shiv on two points.1)Guru is more effective than Shiv and 2) Guru acts as a mirror and enables a person to see himself.Shiv is the creator of the imagery of the universe . Shiv introduces this imaginary universe to a person.He helps the person to enjoy the universe according to person`s deeds in this and the past world.In this process of enjoyment a person forgets his real self.He forgets his identity with the universe.He deals with the universe as if it is distinct from himself and this distinct feeling gives birth to numerous problems in his life.Shiv is unable to uplift a person make his life meaningful.On the other hand Guru has this capacity to uplift a person by making a person aware of his identity with the universe.Therefore Guru is more powerful than Shiv.It is common experience that a person is unable to see his face.He needs a mirror to experience the sight of himself.It is the Guru who provides this facility of knowing oneself.Shiv helps a person to know himself through his deeds .Guru helps a person to know himself through the realization of his identity with the universe ,often referred to as Brahmanand.

अमृतानुभव-५९ प्रकरण-२ गुरूमहिमा ओवी २.७
बोधचंद्राचिय़ा कळा । विखुरल्या एकवळा ।
कृपापुनीव लीळा । करी जयाची ।।२.७।।
चंद्राच्या कला सर्वत्र विखुरलेल्या असतात व पोर्णिमेला(पुनीव) त्या एकत्र(एकवळा) होऊन पुर्ण चंद्राचे दर्शन होते त्याप्रमाणे गुरूकृपेने सर्व द्वैत जाऊन अद्वैताचाच प्रत्यय येतो.
ज्ञान प्राप्त झाल्यावर अद्वैत व द्वैत हे दोन्ही अनुभव येतात का फक्त अद्वैताचाच अनुभव य़ेतो ह्याविषयीचे मत ज्ञानेश्र्वर येथे मांडतात. द्वैताची जाणीव ही अदवैताच्या जाणीवेतच होते.त्या दोन स्वतंत्र जाणीवा नाहीत.ब्रह्म ह्या शब्दाने एकचवस्तू दर्शविली जाते तसेच अनंत नामऱूपांनी देखील एकच वस्तू दर्शविली जाते असे ज्ञानेश्र्वरांचे मत आहे.हे मत अधिक स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्र्वर चंद्रकलांचा संदर्भ देतात.चंद्राच्या कला अमावास्येपासून पुढील पंधरा दिवस विखुरलेल्या असतात, त्याच पुढे पोर्णिमेला एकत्र होतात व आपणाला पूर्ण चंद्राचे दर्शन होते.अद्वैताचा प्रत्यय असाच आहे.आपल्याला अद्वैताचा (पोर्णिमेच्य़ा चंद्राचा) प्रत्यय असाच द्वैताद्वारे(चंद्रकला) येतो.
Dnyaneshwar addesses himself to the question whether on acquisition of Dnyan(knowledge) one perceives Adwait(unity) or Dwait(duality). Dnyaneshwar emphatically states that such a person realizes Adwait .Even realization of Dwait makes him perceive Adwait .He experiences Adwait through Dwait.In order to simplify this apparently a self defeating statement he refers to the natural phenomenon of waxing of moon in 15 phases and at the end on a full moon day we see the moon in its full form.

अमृतानुभव-५९ प्रकरण-२ | गुरूमहिमा ओवी २.८
जो भेटलियाचि सवे । परती उपायांचे धांवे ।
प्रवृत्तिगंगा स्थिरावे । सागरी जिये ।।२.८।।
गुरूची भेट झाल्याक्षणी(भेटलियाचि सवे) ब्रह्मप्राप्तीच्या उपायांकडे धावण्याची प्रवृत्ती बंद पडते.ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाली असता तिचे वाहणे बंद होते त्याप्रमाणे गुरूप्राप्तीत सर्व साधने संपतात.
A meeting with the Guru results in the stoppage of a search of new methods to attain Parbrahm.Just as a river meeting the ocean stops its flowing a meeting with a Guru any further search of a method to attain Parbrahm.
ज्ञानदेव गुरूचे माहात्म्य वर्णन करत आहेत.गुरूची भेट झाल्यावर जीवाला ब्रह्मप्राप्ती होते.त्याला ब्रह्मप्राप्तीसाठी आणखीन उपाय शोधण्याची जरुरी राहत नाही.परब्रह्म हे नेहमी पूर्ण स्वरूपातच प्राप्त होते.एका नामरूपातही ब्रह्म पूर्ण रूपातच असते.तेव्हा गुरूप्राप्ती झाल्यावर पूर्णरूपातच ब्रह्मप्राप्ती होते.त्याच्या शोधासाठी नवीन साधने वा उपाय शोधण्याची जरूरी रहात नाही.ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाल्यावर तिचे वाहणे थांबते त्याप्रमाणे गुरूप्राप्तीनंतर परब्रह्माचा शोध संपतो.
In this Owi Dnyandeo explains the greatness of Guru the mentor.He states that once a person meets the Guru and receives his blessings the disciple need not search new methods to attain Parbrahm.Meetig the Guru itself ensures the attainment of Parbrahm the ultimate state of a living creature.Parabrahm exists everywhere,at all times and even in minutest quantity.therefore meeting a Guru ensures attainment of Parabrahm .Just as when a river meets the ocean ,the river stops flowing,similarly meeting the Guru stops search of new methods to a ttain Parbrahm.

अमृतानुभव-६० प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.९
जयाचेनी अनवसरे । द्रष्टा ले दृश्याचे मोहरे ।
जो भेटत खेव सरे । बहुरूप हे ।।२.९।।

जोपर्यंत गुरूची भेट होत नाही तोपर्यंत(अनवसरे) द्रष्टा आपल्यासमोर नानाविध दृश्ये पाहतो(मोहिरे) .गुरूची भेट झाल्यावर हे बहुरूपी जग नाहिसे होते.
So long as a meeting with the Guru is not realized the perceiver perceives the world as consisting of a variety of things but once he meets the Guru the colourful universe with different forms disappears
गुरू ज्ञान मिळवून देतो.हे ज्ञान अद्वैताचे असते.त्यामुळे अज्ञान नाहीसे होते.जीवाचा द्वैत भाव नाहीसा होतो.विविध नामरूपाने,विविध आकारात ,रंगात नटलेले भोवतालचे विश्र्व त्याला न भासता त्याला नामरहित, रूपरहित असे अद्वैतच जाणवते.हे विश्र्व बहुरूपी स्वरूपात भासणे म्हणजेच अज्ञान व अद्वैत रूपात विश्र्व भासणे म्हणजे ज्ञान.
Guru gives Dnyan,knowledge to a person and that is ADWAIT.It causes destruction of Adnyan i.e.perception of universe in its different names,forms referred to as Dwait.Guru enables a disciple to visualize this universe as Adwait i.e.in the unity form.Guru`s greatness lies in his ability to enable a disciple to perceive this universe inits Adwai form.

अमृतानुभव-६१ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.१०
अविद्येचे काळवखे । स्वबोध सुदिने पाके ।
शिवतले प्रसादार्के । जयाचेनि ।।२.१०।।
ज्याच्या कृपेमुळे अविद्येचा अंधार नष्ट होतो व आत्मबोधरूपी दिवसाचा उदय होऊन तो सर्वत्र प्रकाशतो.
He is the one whose blessings destroy the darkness created by ignorance and the day of self realization dawns spreading its light allover.
येथे ज्ञानदेव गुरूचे महत्व स्पष्ट करत आहेत.गुरूप्रसाद म्हणजे सूर्यप्रकाश. सूर्याचा उदय झाला म्हणजे अज्ञानरूपी काळोख नाहीसा होतो व ज्ञानरूपी प्रकाश सर्वत्र पसरतो.ज्ञानाचा ,प्रकाशाचा सुदिन उगवतो.स्वबोध म्हणजे स्वतःचा बोध,आत्म बोध,अहं ब्रह्मासि ह्या वचनाचा बोध.गुरूने असा उपदेश केला तर तो सुदिन होय.
In this Owi Dnyandeo explains the importance of Guru.He visualizes Guru as Sun.When the sun rises, darkness disappears and its sunrays lighten the whole world.Similarly once Guru is met ignorance i.e.darkness disappears.Here ignorance refers to Dwait i.e.looking to the world as separate entity from you and unlimited lust for its consumption. To him this is darkness. A meeting with the Guru enlightens you and makes you aware of your identity with the universe.This is often refered to as Atmadnyan or Atmabodh.

अमृतानुभव-६२ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.११
जयाचेनी कृपासलिले । जीव हा ठावोवरी पाखाळे ।
जे शिवपणहि ओविळे । आंगी न लवी ।।२.११।।
गुरूच्या कृपारूपी जलात स्नान करून जीव इतका(ठावोवरी) शुद्ध(पाखाळे) होतो की तो मग शिवपणही अशुद्ध(ओवळे) समजतो व त्याचा आंगाला स्पर्श होऊ देत नाही.
गुरूची कृपादृष्टी झाल्यावर जीवाला आत्मज्ञान प्राप्त होते,स्वतःची ओळख पटते.ज्ञानेश्र्वर म्हणतात गुरूच्या कृपारूपी पवित्र जलात स्नान केल्यावर जीव अत्यंत शुद्ध होतो व त्याला शिवपणही म्हणजेच अद्वैतही अशुद्ध वाटायला लागते.जीवाची ही सर्वोच्य स्थिती होय.ह्या स्थितीत जीवाला सर्व विश्र्व निर्विकार,निरूपाधिक,निर्विशेष भासते.ज्ञानदेव म्हणतात शिवपणही ओवळे होते.आणि त्याचा अंगाला स्पर्षही होऊ देत नाही.
When a person receives blessings of Guru he becomes conscious of oneself and this realization is like a deep in the holy water.It results in ultimate purification of the sole.Purification level is so high that even Shiv becomes an untouchable i.e. even unity Adwait becomes irrelevant.In this state one experiences the universe as one without any form ,name,charachteristic,feelings.Thus Guru`s blessings makes Dwait, the duality irrelevant but even Adwait looses its relevance and one realizes this emptiness of this universe .

अमृतानुभव-६३ प्रकरण-२ गुरूमहिमा ओवी-२.१२
राखो जाता शिष्याते । गुरूपण धाडले थिते ।
परी गुरू गौरव जयाते । सांडिचिना ।।२.१२।।
शिष्याला संसारसमुद्रातून पार करताना(राखा जातो) गुरू आपले गुरूपण हरवून बसतो(थिते) पण गुरूपण मात्र त्याला सोडत नाही.(सांडिचिना)
गुरू शिष्य हे द्वैत आहे.गुरू हा ज्ञान देणारा व शिष्य हा ज्ञान घेणारा.गुरू व शिष्य हे दोन वेगळे जीव असतात तेव्हाचज्ञान देणे व घेणे ह्या प्रक्र्रिया होतात.गुरू जे ज्ञान देतो ते अद्वैताचे असते ,त्यामुळे शिष्यातील द्वैतभाव नष्ट होतो.जीव व सभोवातलचे विश्र्व ह्यातील एकरूपता याची त्यास जाणीव होते.गुरूने दिलेल्या ह्या ज्ञानामुळे शिष्य हाच गुरूरूप, अद्वैतरूप होतो.त्याचे शिष्यत्व नाहिसे होते.सर्वसाधारणपणे जेव्हा एकजण वस्तू दुसर्याला देतो तेव्हा ती वस्तू त्याच्याजवळ रहात नाही ती दुसर्याजवळ जाते.ज्ञानदेव म्हणतात गुरूच्याबाबत तसे होत नाही.त्याने शिष्याला जरी गुरूत्व दिले तरी त्याच्याजवळचे गुरूत्व नाहिसे होत नाही.ज्ञानाचे हे वैशिष्ट्य आहे की ते दिल्याने वाढते कमी होत नाही.
The present Owi explains the nature of relation between Guru and his disciple.Guru bestows the knowledge of Adwait(unity) to his disciple. Such process of give and take,takes place when the two are different entities i.e. Dwait (duality), but when what is donated is Guruness the Adwit the student looses his identity as a separate person.He realizes the integration of himself and the universe.He no longer remains a student but becomes Guru himself.Normally when one oerson gives something to others he no longer posses it and the product becomes other man`s property.In the case of Guru this does not happen.What Guru has donated is his Guruness and that still remains with him.

अमृतानुभव-६४ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.१३
एकपण नव्हे सुखास ।म्हणुनी गुरूशिष्याचे करूनि मिस ।
पाहणेचि आपुली वास । पाहतसे ।।२,१३।।
अद्वैत सारखे सुखाचे वाटत नाही.म्हणून गुरूशिष्य या द्वैताचा बहाणा(मिस) करून आपणच आपल्या पाहणेपणाला पाहतात.
ज्ञानदेव गुरूशिष्यतील ऐक्य स्पष्ट करून सांगत आहे.अद्वैत म्हणजे एकटेपण अत्यंत कंटाळवाणे असते.दुसर्या कोणाशीतरी संवाद साधावा असे वाटते.रोजच्या जीवनातही आपल्याला एकटेपण जाणवते.आपण आपल्याला पाहू शकत नाही.आपण आरशात पाहतो व एका अर्थाने दुसर्याशी संवाद साधतो.गुरूही तसेच करतो.तो शिष्याशी म्हणजेच दुसर्याशी संवाद साधतो व आत्मानंद मिळवतो.
Adwait , loneliness is very boring.One likes to have a dialogue with some one.You need one more person to talk to.we cannot see ourseves.We need a mirror to see our face.Guru also has the same problem.He is Adwait ,the only one.Guru cannot impart knowledge .unless there is someone else. He cannot teach himself.So a condition of Dwait(duality) is created.A disciple acts as a mirror to him and enables Guru to see himself, to perceive himself.

अमृतानुभव-६५ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.१४
जयाचेनि कृपातुषारे । परतले अविद्येचे मोहिरे ।
परिणमे अपारे । बोधामृते ।।२.१४।।
ज्यांच्या कृपारूपी तुषाराने अविद्येचे देखावे परत फिरले(परतले) व ते ज्ञानरूपाने परिणाम पावले(परिणमे).
ह्या ओवीत गुरूकृपेची महती सांगितली आहे.गुरूकृपेचा एक तुषार,थेंबही जरी अंगावर पडला तरी अविद्येचा मोहरा,लोंढा परत फिरतो.गुरू अद्वैतरूप आहे.अविद्या म्हणजे द्वैत.अद्वैताची जाण झाली म्हणजे द्वैत नाहिसे होते.गुरूकृपा झाली की अविद्या नाहिशी होते.ज्ञानदेव गुरूकृपेचे वर्णन अत्यंत समर्पक करतात.ते गुरूकृपेला बोधामृत असे संबोदतात.गुरू ज्ञान देतो.अद्वैताची जाणिव देतो.ज्ञानाचा एक तुषार द्वैताचे लोंढे परतवतो.ज्ञानाची ही प्रचंड शक्ती आहे.ते अमृत आहे.
• Dnyandeo in very apt words describes the glory of Guru`s blessings,his favour.Just as the spray of cool water is invigorating and destroys, vanishes fatigue ,similarly Guru`s favour destroys Avidya i.e.ignorance.Guru enlightens disciple and bestows the knowledge of Adwait(unity) on him.This drives out the flood of ignorance i.e. Dwait(duality).Dnyandeo describes the awareness of Unity as Bodhamrut i.e.knowledge that lasts for eternity.

अमृतानुभव-६६ प्रकरण-२ गुरूमहिमा ओवी २.१५
वेद्या देता मिठी । वेदकुहि सूये पोटीं ।
तर्हि नव्हेचि उशिटी । दिठी जयाची ।।२.१५।।
जाणल्या जाणार्या (वेद्य) ज्ञेय पदार्थांना मिठी मारल्याबरोबर वेद्य-वेदक दोघेही पोटात घेतले जातात.पण गुरूची दृष्टी वेद्य पदार्थाच्या भोगण्याने उष्टी होत नाही.
गुरूची कृपा होण्यापूर्वी जाणणारा, जे जाणायचे त्यापेक्षा, स्वतःला वेगळा समजतो.त्याच्या मनात द्वैत निर्माण होते.मी ज्ञेय वस्तू जाणत नव्हतो,मी अज्ञानी होतो आणि आता मला ज्ञान प्राप्त झाले आहे,मी ज्ञानी झालो आहे असे तो समजतो.अशी समज होण्याचे कारण म्हणजे ज्ञाता स्वतःला ज्ञेय वस्तूपासून वेगळा समजतो.त्याची जाण ही अहंकारस्वरूपाची असते.यालाच ज्ञात्याने आपली दृष्टी ऊष्टी केली असे म्हणतात. गुरूची शिकवण अद्वैताची आहे.त्याची दृष्टी अद्वैतरूप असते.ज्ञाता आपण काही वेगळी वस्तू पाहिली असे जाणत नाही.अशी अहंकारविरहित दृष्टी उष्टी होत नाही.ह्या स्थितीत पाहणे ही क्रिया स्फुरत नाही.
The present Owi is devoted the explanation of the act of seeing, perceiving.The act of seeing takes place when the perceiver and the object to be perceived are different.This is Dwait(duality) condition.In the act of seeing there is consciousness.Such an act is said to be a used one(Ushte).The perceiver is conscious of his ignorance and later on its destruction.Guru,the teacher however is an embodiment of Adwait(oneness).When he imparts the knowledge of oneness,the disciple(the seer) abandons the feeling of separateness from what is seen and establishes identity between the seer and what is seen.

अमृतानुभव-६७ पकरण-२
गुरूमहिमा ओवी २.१६
जयाचेनि सावाये । जीव ब्रह्मउपरो लाहे ।
ब्रह्महि हातातळील जाये । उदासे जेणे ।।२.१६।।
गुरूच्या साह्याने(सावाये) जीव ब्रह्मपणाने शोभू(उपरो) लागतो व त्याच्या उदास होण्याने ब्रह्मही जाते(हातातळील).
Guru`s blessings enables a living creature to attain the highest mental state of Adwait,Brahmhood and that adorns him to the maximum. However if Guru becomes depressed the disciple looses the attainment of Brahmhood.
जीव हा मुळात ब्रह्मरूप,अद्वैतरूप आहे.पण जीवाला त्याचा विसर पडतो. गुरूच्या कृपेने जीव अद्वैतरूपाने शोभू लागतो.त्याला आत्मप्राप्ती होते.पण आपणास ryआत्मप्राप्ती झाली आहे,ब्रह्मज्ञान झाले ह्याचा जीवाला अहंकार झाला तर गुरू उदास होतो.गुरूमुळे मिळालेले ब्रह्मज्ञानही नाहिसे होते.म्हणून मिळालेले हे ज्ञान प्रयत्नपूर्वक जपपावे लागते व गुरूची अखंड सेवा करत राहिली पाहिजे.गुरू प्रसन्न राहिले तरच ते आपला सांभाळ करतील पण उदास झाले तर नाही म्हणूनच जीवाने अहंभाव बाळगता कामा नये.
The present Owi emphasizes how Guru`s blessings help a living creature .Gurus blessings enables the disciple to attain the highest state of mind viz.Brahmhood,Adwait.But many a time the disciple boasts of this attainment and that makes the Guru pensive.If Guru is disheartened the disciple also looses his Brahmhood.It is very necessary therefore not to be conceit and arrogant .It may be necessary to extend service to the teacher and pay deep respect to him.

अमृतानुभव-६८ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.१७
उपास्तिवरी राबतिया । उपायफळे येती मोडोनिया ।
वरिवंडिले जयाचिया । अनुज्ञे का ।।२.१७।।
जे परमेश्र्वराची उपासना(उपास्ति) करण्यात दिवसरात्र(मोडोनिया) कष्ट करतात त्यांचे उपाय, गुरूच्या आज्ञेचे पालन करण्यास आपल्याला वाहून (वरिवंडिले)घेतल्या ने यशस्वी होतात.

One, who most obediently follows the instructions of the Guru day and night and worships Guru, experiences success in his efforts to reach God

गुरुकृपा व्हावी म्हणून शिष्याने काय करावे हे ह्या श्र्लोकात सांगितले आहे.शिष्याने गुरूच्या उपदेशाचे श्रवण व मनन करावे.त्याच्या आदेशाचे पालन करावे.आपल्याच मनाने गुरूची सेवा करू नये. गुरूच्या आज्ञेप्रमाणे वागावे व त्याप्रमाणे सेवा करावी.तसे केले तरच गुरूकृपेचे फल मिळते. गुरूला पूर्णपणे अर्पण व्हावयास पाहिजे.

The present Owi is devoted to the explanation of what a disciple should do to receive blessings of the Guru . The disciple should carefully listen and think over Guru`s advise and act accordingly .He should follow Guru`s instructions and accordingly extend sincere service to Guru.The disciple should not serve Guru as per his own volition.It is only when he faithfully follows Guru`s advice the disciple receives Guru`s blessings.

अमृतानुभव-६९ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.१८
जयाचा दिठिवा वसंतु । जंव न रिघे निगमवना आंतु ।
तंव आपुलिये फळी हातु । पुढे दृष्टीचेनि अलगे ।।२.१८।।
वेदरूपी अरण्यात(निगमवन) ब्रह्मानंदरूपी आत्मफळ आहे.पण जोपर्यंत गुरूचा ज्ञानरूपी वसंत त्यात प्रवेश करत नाही,तोपर्यंत ते फळ आपल्या हाती लागत नाही.
In the jungle of Vedas and Upanishadas there are many fruits of Brahmanand (awareness of unity) but until the spring season in the form of Guru`s blessings does not begin the fruits are not available.
येथे ज्ञानदेव, वेदरूपी उद्यानाच्या रूपकाद्वारे, गुरूकृपेचे महत्व विशद करत आहेत.वेदरूपी उद्यानात ब्रह्मरूपी फळे उपलब्ध असतात.ती मिळवण्यासाठी साधक अनेक उपाय योजतो.वेदांचा तो अभ्यास करतो व त्याद्वारे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचा सतत प्रयत्न करतो. परंतु गुरूकृपा झाल्याशिवाय त्याला य़श मिळत नाही.ज्ञानदेव मोठ्या अलंकारिक शब्दात हे मांडतात.ते म्हणतात गुरूचा कृपारूपी वसंत ऋतू सुरू झाल्याशिवाय साधकाला ब्रह्मरूपी फळे मिळत नाहीत.
In the present stanza Dnyandeo emphasizes the importance of Guru and for this he uses a metaphor.He visualizes the sacred books of Ved and Upanishad as a garden consisting of many fruit trees of knowledge .The disciple with great sincerity and arduousness studies these sacred books with the hope that he will be able to relish the fruits.Unfortunately this is not possible until he receives Guru`s blessings which Dnyandeo very aptly describes as the spring season .

अमृतानुभव-७० प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.१९

पुढे दृष्टीचेनि अलगे । खोची कीं निवटी मागे ।
एव्हढेया जैता नेघे । आपणपे जो ।।२.१९।।

गुरूची ज्ञानदृष्टी(दृष्टीचेनी) पुढे दृश्याला लागली(खोची) की दृश्यात आपल्याला पाहून दृश्यासह मागला द्रष्टाही नाहिसा(निवटी) होतो.पण एवढा जय मिळवूनही गुरू त्या जयाचा अभिमान बाळगत नाही.
When Guru`s vision reaches the view,the viewer and the view both extinguish and yet the guru does not boast his victory.

गुरू शिष्याला ब्रह्मज्ञान कसे मिळवून देतो ह्याचे स्पष्टीकरण ह्या ओवीत केले आहे.गुरू शिष्यकडे पहातो.गुरू ब्रह्मरूप आहे ,तो अद्वैतरूप आहे त्यामुळे त्याची दृष्टी शिष्यावर पडल्यावर शिष्यही अद्वैतरूप,ब्रह्मरूप होतो.तू देहरूप असलास तरी ते खरे नाही. तू ब्रह्मापासून वेगळा नाहीस ,तू ब्रह्म आहेस हा उपदेश गुरू शिष्याला पटवतो.गुरूचा जय होतो.पण गुरूला ह्याचा अहंकार होत नाही.द्रष्टा व तो पहात असलेले दृश्य हे वेगळे न रहाता एकच होतात.येथे गुरू हा द्रष्टा व शिष्य हे दृश्य असे कल्पिले आहे.

The present Owi is devoted to the explanation of the process of imparting the knowledge of Adwait to the disciple.Guru,the teacher ,is brahm ,Adwait.When he looks to his disciple ,the latter also acquires the features of Guru .In other words the disciple also becomes Brahm. Dnyaneshwar has used the words front and back and in this verse it means view and the viewer.When Guru looks ahead i.e.when he sees the view the viewer and the view extinguish.

अमृतानुभव-७१ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.२०

लघुत्वाचेनि मुदले । बैसला गुरूत्वाचे सेले ।
नासूनि नाथिले । सदैव जो ।।२.२०।।

मूळात अस्तित्वात नसलेल्याचा(नाथिले) नाश करून अखंड निरहंकारपणाच्या(लघुत्वाच्या) भांडवलावर (मुद्दलावरच) मोठेपणाच्या शेवटच्या टोकावर(सेले) गुरू बसले आहेत.
By destroying a nonexisting thing ,Guru on the basis of perennial smallness sits on the highest point of greatness

ह्या ओवीमध्ये ज्ञानदेव तुलनात्मकरित्या गुरूचे मोठेपण स्पष्ट करत आहेत.गुरू मोठेपणाच्या टोकावर बसले आहेत.ते सर्वात श्रेष्ठ आहेत.त्यांच्यापेक्षा मोठे काही नाही.लघुत्व म्हणजे लहानपण,अहंकार रहित असणे.ज्ञानेश्वर म्हणतात लहानपण,अहंकार नसणे हेच गुरूचे भांडवल आहे.सामान्य जीव अहंकारयुक्त असतो.पण जीव हाही परब्रह्माचा अंश आहे.मूळ ब्रह्म अहंकारविरहित आहे.अहंकारामुळे जीव स्थूल होतो.तो अव्यापक होतो.तो जितका लहान तितका तो अधिक व्यापक होतो.जीवाचा अहंकार नष्ट करून गुरू मोठे होतात.पण निवृतीनाथांचे गुरूत्व असे नाही.त्यांचे गुरूत्व स्वयंभू. स्वयंप्रकाशी आहे.

Guru is great.No one excels him.He is at the top.He has achieved this greatness not by extinguishing false ego of the disciple but his greatness is self existent.Smallness stands for absence of ego.Small spreads everywhere but large cannot spread widely.therefore small is great inspite of being small.Smallness is Guru`s capital,his asset.in other words absence of ego is the characteristic of Guru.

गुरूमहिमा ओवी २.२२
आकाश हे सावेव । परि न बंधे आकाशाची हाव ।
ऐसे कोणी एक भरीव । आकाश जे ।।२.२२।।
श्रीसदगुरू हे एक भरीव आकाश आहेत.नानाविध पदार्थांना राहण्याला पोकळीभूत होणारे आकाश गुरूच्या आकाशाशी बरोबरी करू शकत नाही.
Guru is sky.However the physical sky made of emptiness and which accommodates every thing cannot equal Guru`s sky

ज्ञानदेव गुरूला आकाशाची उपमा देतात.पण गुरूमय आकाश हे आपण पाहतो त्या भौतिक आकाशापेक्षा वेगळे आहे,भैतिक आकाश ही एक पोकळी आहे,ते रिकामे आहे.त्यात कितीही वस्तू टाकल्या तरी ते भरत नाही.भौतिक आकाश सावेव आहे.सावेव म्हणजे साकार.आकाशाला आकार आहे म्हणजे ते अनंत नाही. त्याला मर्यादा आहेत .लांबी,रूंदी,उंची व काळ ह्या त्याच्या मर्यादा आहेत पण त्या निश्चित करता येत नाहीत.गुरूचे आकाश मात्र वेगळे आहे.ते भरीव आहे.ते पोकळ नाही.ते पूर्णपणे भरलेले आहे.ते गुरू तत्वाने भरलेले आहे.एकही क्षण असा नाही की किंवा असा एक ही इंच नाही की जिथे गुरू नाहीत.श्रीगुरूरूप आकाशाशी भौतिक आकाशाची तुलनाच होऊ शकत नाही.

Dnyandeo visualizes Guru as sky.However this sky is much different from the physical sky that we see with our eyes.The physical sky is empty,hollow and can accommodate anything.Guru`s sky is not an empty thing but is fully packed and solid. In his sky Guru exists every where.There is not an inch which is not occupied by Guru.Dnyandeo describes the characteristics of sky.Physical sky is Savev i.e.it has a form .Everything which has a form , has limits.Though the sky looks unlimited it is not so.It is bounded by length,breadth,height and time. However the bounds are not definable and they are not fixed.The sky accommodates many many things of different forms and which consists of constantly moving particles .Though the particles,the tiniest parts are moving, the thing maintains its form .there is some force which binds them together and prevents disintegration.This binding force is Guru.It pervades every where.

अमृतानुभव-७४ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.२३

चंद्रादि सुशीतळे । घडली जयाचेनी मेळे ।
सूर्य जयाचेनी उजाळे । कडवसेनी ।।२.२३।।

चंद्र आणि इतर शितल ग्रह ज्यांच्या मिलनयुक्त स्पर्शामुळे घडले आहेत आणि सूर्यासारखे स्वयंप्रकाशित तारे ज्याच्या एका कवडशाने प्रकाशित होतात

A slight touch of Guru has created moon and such other cool planets and so also sun and other self illuminated stars became luminous.

ज्ञानदेव गुरूची निर्मितीक्षमता स्पष्ट करत आहेत.पृथ्वीपासून हजारो मैल दूर असणारे चंद्रासारखे शितल ग्रह आणि सूर्यासारखे स्वयंप्रकशित तार्यांची निर्मिती ही गुरूकृपेमुळे होते.गुरूच्या अल्पशा स्पर्शानेही चंद्र शीतल प्रकाश देतो व सूर्य तेजस्वी प्रकाश देतो. येथे गुरू म्हणजे गुरूतत्व ,अद्वैत तत्व.गुरू म्हणजे हाडामांसाचा मानवी शिक्षक नव्हे.
The present O`wi is devoted the creativity of guru.Guru is an embodiment of the principle of Adwait,i.e.unity.and the creation of the moon and other plants as well as sun and other self illuminating stars is the result of a feather touch of Guru .Guru is not the one in the form of living person but he is the one who teaches Adwait.

अमृतानुभव-७५ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.२४

जीवपणाचेनि त्रासे । यावया आपुलीये दशे ।
शिवही मुहूर्त पुसे । जया जोशियाते ।।२,२४।।
शिवही, जीवपणाच्या त्रासाने पूर्ण ब्रह्मरूपाला येण्याकरता ,श्रीगुरूरूपी ज्योतिषाला मुहूर्त विचारतो.

शिवापेक्षाही गुरू श्रेष्ठ आहे हे ह्या ओवीत स्पष्ट केले आहे.परब्रह्म हे निर्गुण,निराकार आहे.परंतु त्यास आपण अनेक व्हावे असे वाटते व तो विविध रूपात प्रगट होतो.शिव हा शक्तीरूपाने,विविध रूपात प्रगट होतो.पण असे करताना त्याला आपल्या मूळ अद्वैताचे विस्मरण होते.त्याच्यात अहंभाव निर्माण होतो.हीच शिवाची जीवदशा होय.असे असले तरी शिवाचे मूळ अद्वैतरूप नाहिसे होत नाही.अल्पकाळासाठी झालेले द्वैत रूप त्याला नकोसे होते .त्यातून सुटका व्हावी असे त्याला वाटते म्हणून तो गुरूस सुटकेचा मुहुर्त विचारतो.
In this O`wi Dnyandeo compares the strength of Guru and Shiv and concludes that Guru is more powerful.Shiv stands for Adwait(unity) but as he finds his loneliness boring ,he creates a world consisting of many things with their different names and characteristics.For a while Shiv forgets his original form of Adwait.He becomes aware of this change in his form and looks forward to the resumption of his original state of Adwait and then Shiv asks Guru what time the resumption will take place.

अमृतानुभव-७६ प्रकरण-२
गुरूमहिमा ओदी २.२५

चांदणे स्वप्रकाशाचे । लेईला द्वैत दुणीचे ।
तर्ही उघडेपण चांदाचे । न वचे जया ।।२.२५।।

ज्याप्रमाणे चंद्राने आपले प्रकाशरूपी दुहेरी(दुणीचे) वस्त्र पांघरले म्हणून काही त्याचे,वस्त्र पांघरण्यापूर्वीचे,एकपण(उघडेपण) जात नाही त्याप्रमाणे गुरूनी द्वैतरूपी दुहेरी वस्त्र पांघरले म्हणून त्यांचे द्वैतापूर्वीचे अद्वैतपण गेले असे होत नाही(न वचे).
Just as covering oneself by twofold blanket of light by moon does not result into loss of its oneness ,so also covering oneself by duality by Guru does not result into loss of unity of Guru.
चंद्र आणि गुरू ह्यांच्यातील साम्य ह्या ओवीत स्पष्ट केले आहे.चंद्र हा आपल्या प्रकाशाद्वारे प्रगट होतो.एका अर्थाने हे द्वैत झाले.चंद्र आणि त्याचा प्रकाश ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत असे वाटते.पण तो भास आहे.कारण प्रकाश काही चंद्रापासून वेगळा करता येत नाही.ते दोन्ही एकच आहेत.गुरूबाबतही हेच खरे आहे.गुरू हा द्रष्टा आहे तो दृश्य पाहतो.पाहणे ही क्रिया दोन स्वतंत्र गोष्टीबाबतच शक्य असते.ह्या ठिकाणी द्वैताचा भास होतो .पण प्रत्यक्षात गुरू हाच द्रष्टा व दृश्य आहे.
In this O`wi Dnyaneshwar compares performance of moon and Guru. Moon illuminates light and it covers moon with a blanket of light. Apparently one gets the feeling of twoness,duality.one considers moon and its light as two different things.But in reality it is not so.It is only illusion.Light cannot be separated from moon.Moon and its light form one thing.Same is the case of Guru ,the seer .Guru as a seer sees something and one gets the impression that the seer and what is seen I,e, the view are two different things.But in reality it is not so.The viewer and the view merge into one.

अमृतानुभव-७७ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.२६

जो उघड कीं न दिसे । प्रकाशे कीं न प्रकाशे ।
असतेपणेचि नसे । कवणीकडे ।।२.२६।।

जो उघड असूनही दिसत नाही .प्रकाशक असूनही प्रकाशित नाही.असा हा गुरू सर्वत्र असूनही कोठेच दिसत नाही.
He is one who appears but cannot be seen.He is illuminator but does not illuminate.He exists everywhere and he does not exist anywhere.

ह्या ओवीत ज्ञानदेव निकराचे,पराकोटीचे अद्वैत ही संकल्पना स्पष्ट करून सांगत आहेत.गुरू इतके अद्वैतरूप आहेत की ते स्वतःलाच दिसत नाहीत.ते सर्वत्र आहेत पण ते कुठेच रहात नाहीत. ते द्वैतच जाणत नाहीत त्यामुळे द्वैताचा विनाश होऊन निर्माण होणारे अद्वैतही ते जाणत नाहीत.द्वैत-अद्वैतरहित अशी गुरूची स्थिती आहे. दृश्याचे ज्ञान झाले तर द्रष्ट्याचे ज्ञान होईल पण दृश्यच जाणले नाही तर द्रष्ट्याचे ज्ञान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गुरूला स्वतःची किंवा दुसर्याची जाणीव होत नाही कारण तो द्रष्टाही व दृश्यही आहे.ते वेगळे असले तरच जाणीव निर्माण होते.श्रीगुरू आपले स्वरूप कधी विसरतच नाहीत व त्यामुळे त्यांना आपले स्वरूप कळतच नाही.ह्याचेच वर्णन “असतेपणचि नसे ”
सूर्यामुळे सर्व जग प्रकाशित होतं.अंधाराचा नाश होऊन आपल्याला जग दिसू लागते.पण सूर्य स्वतःला पाहू शकत नाही कारण पाहणे ही क्रिया पाहणारा जेव्हा जे पहावय़ाचे त्यापेक्षा वेगळा असतो तेव्हाच संभवते.सूर्य हा तर सतत प्रकाशित असतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात सूर्याबाबत प्रकाश्य आणि प्रकाशक हे वेगळे नसतात.

The present O`wi is devoted to the explanation of the concept of absolute Adwait(unity).Guru pervades everywhere and yet he does not see himself.The act of seeing takes place only when there are two different things ,the seer and the thing seen.Unless .If there is no view, the act of seeing does not arise .Guru embodies both the seer and the thing seen.Guru always remembers his status and therefore does not understand his form.He never forgets it.Dnyaneshwar describes this phenomenon as “his nonexistence resides in its existence”.This concept can best be undersood by reference to sun.Sun illuminates light which enables the world to see.However sun does not see itself.Sun never experiences darkness .It always remains lighted.Therefore sun never experiences the act of seeing.

अमृतानुभव-७८ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.२७
आता जो तो इही शब्दी । के मिळवू अनुमानाची मांदी ।
हा प्रमाणाही वो नेदी । कोणाही मा ।।२.२७।।

श्रीगुरू असे जाणण्यासारखे नसल्यामुळे शब्दांनी कितीही अनुमानं काढली तरी कोणत्याही प्रमाणांना ते आपल्यापाशी य़ेऊ देत नाहीत.
Guru being beyond recognition ,he cannot be described.Words are inadequate for its description and even a huge collection of inferences are not useful nor any mode of description useful for it.

गुरू म्हणजेअद्वैत.त्यामुळे अद्वैताचे वर्णन म्हणजे गुरूचेच वर्णन होय.कोणत्याही शब्दाने गुरूचे वर्णन करता येत नाही ते त्यामुळेच.एकाद्याचे वर्णन करताना आपण जो किंवा तो अशी सर्वनामे वापरतो.परंतू हे दोन शब्दच काय पण कोणत्याच शब्दांनी गुरूचे(अद्वैताचे) वर्णन करता येत नाही.कोणत्याही तर्काने वा अनुमानाने गुरूचे वर्णन करता येत नाही.ज्ञानदेव म्हणतात अनुमानाच्या मांदीने (समुच्चयाने) वर्णन करता येत नाही.काणत्याही साधनाने(प्रमाण) वर्णन करता येत नाही,जाणता येत नाही.जाणणे ह्या क्रियेत तीन गोष्टी(त्रीपुटी) येतात.जाणणारा,प्रमाण व जे जाणायचे ते(प्रमेय).पण अद्वैत म्हणजे एकपण.त्याला द्वैत वा अनेकत्व कसे सहन होईल.

Dnyandeo proposes ,in chapter two, to highlight the characteristics of Guru.Guru embodies the concept of Adwait and therefore the description of Guru is really the description of Adwait(unity).According to Dnyandeo it is not possible to describe Guru.Guru defies any description.Words are inadequate to describe him.We often use the words “who” or “this” and “that” to refer to something.But such words are meaningless in the case of Guru.Guru cannot be described by the use of logic or science of inference. It will be a paradox if we assume that he can be described . because description involves three things one who describes,the subject that is to be described and the medium used to describe and Adwait stands for oneness , unity.

अमृतानुभव-७९ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.२८

देथे शब्दाची लिही पुसे । तेणेसी चावळो बैसे ।
दुजियाच्या रागी रूसे । एकपणा जो ।।२.२८।।

ज्या अवस्थेत शब्दप्रवृत्तीच होत नाही(लिही पुसे) त्या अवस्थेशी(तेणेसी) गुरू बोलत रहातात(चावळो बैसे) ,दुसरेपणाच्या(दुजियाच्या) आवडीला रूसणारा(रागी रूसे) असा गुरूचा एकपणा आहे.
Guru speaks to one who does not use words to convey something .Guru`s Adwait makes him dislike those who love Dwait.

शब्द,तर्क वा अनुमान ह्यांच्या सहाय्याने गुरू समजून घेता येत नाही असे मागच्या ओवीत स्पष्ट केले आहे.ह्या ओवीत शब्दाच्या सहाय्याने गुरूचे वर्णन करता येत नाही असे प्रतिपादन केले आहे.आपण रोजच्या जीवनात दुसर्याशी संपर्क शब्दाद्वारेच साधतो.आपले विचार हेही शब्दरूपातच असतात.कोणत्याही गोष्टीचे वा घटनेचे वर्णन शब्दातच करतो.पण गुरूचे वर्णन शब्दात करता येत नाही.गुरू परब्रह्म आहे,अद्वैतरूप आहे.हे केवल अद्वैत.निकराचे अद्वैत आहे.द्वैताचा विनाश करून निर्माण झालेले हे अद्वैत नाही.जेथे द्वैत आहे तेथे वर्णन करण्यासाठी शब्द उपयोगी पडतात. जो मुकपणे ,शब्दावीण संवाद साधतो त्याच्याशी गुरू प्रेमाने बोलतात.परंतु जे शब्दाद्वारे संवाद साधू इच्छितात त्यांच्यावर गुरू रुसतात.गुरूचे अद्वैत,द्वैताच्या रागी म्हणजे स्मरणसुद्धा न ठेवणारे आहे.

The last O`wi is devoted to the failure of words,logic and a pack of inferences to understand Guru.In the present O`wi Dnyandeo emphasizes the failure of words to describe Guru.Guru represents Adwait(unity) which is opposed to Dwait(duality).Use of words or logic to describe something involves Dwait.We use words to describe everything.Our thinking process involves extensive use of words.We describe something or speak through the words.Even our silent thinking involves use of words.Words are used to describe something,talk to some one or think silently in the mind.However words are inadequate to describe Guru who is Adwait.Guru is not friendly with anyone who tries to contact him through words .However Guru is friendly and sympathetic towards one who contacts him in silent mode.ecause he dislikes Dwait.

अमृतानुभव-८० प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.२९
प्रमाणाची परिसरे । तै प्रमेयची आविष्करे ।
नवल मेचु इये धुरे । नाहीपणाची ।।२.२९।।
प्रमाणाची प्रवृत्ती(परिसरे) झाली असता ,त्या त्या प्रमाणाने कळणारे प्रमेय कळते(आविष्करे) पण नवल हे आहे की ,श्रीगुरूंना कोणाच्याही पुढे(धुरे) नाहीपणा मिरवण्याची फार आव़ड(मेचु) आहे.
The conventional means of understanding something are useful in ordinary life but they are not useful in understanding Guru .
श्रीगुरूच्या ठिकाणी पमाण व प्रमेय असा फरक नसतो.प्रमा म्हणजे ज्ञान. प्रमाण म्हणजे ज्याच्या सहाय्याने ज्ञान मिळवले जाते ते साधन.अशी सहा साधने आहेत. प्रत्यक्ष, अनुमान,उपमान,शब्द,अर्थापत्ति,अनुपलब्धि आणि मन ही ती सहा साधने.प्रमेय म्हणजे ज्याचे ज्ञान मिळवावयाचे तो विषय.जो ज्ञान मिळवतो तो प्रमाता.आपण डोळ्याने गुलाबाचे सुंदर फूल पहातो. आपल्याला ते आवडते.येथे डोळा हे प्रमाण व फूल हे प्रमेय.डोळा आणि फूल असे द्वैत निर्माण होते.गुरू साक्षात परब्रह्म आहे.त्याच्या बाबतीत असे द्वैत निर्माण होत नाही.म्हणूनच ज्ञानदेव म्हणतात गुरूला अशा द्वैताला नाही म्हणण्याची आवड आहे.गुरू म्हजेच परब्रह्म,अद्वैत समजण्यासाठी वरील सहा प्रमाणे उपयोगी पडत नाहीत.
Pramaa means knowledge.Pramaan means the instrument that is used to acquire knowledge.Pramaataa means one who acquires knowledge. Pramey means the subject whose knowledge is obtained.In the case of Guru the problem of the distinction between the instrument used to know something and the Gurusubject about which knowledge is obtained does not arise.My eyes see a rose flower .Here eye is Pramaan and rose is Prameya .Guru being the embodiment of Adwait and Parabrahma , the conventional means of acquiring knowledge fail to understand Guru.
अमृतानुभव-८१ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.३०
कांही बाहीं अळुमाळु । देखिजे एखादे वेळु ।
तरी देखतेहि टवाळु । जयाच्या गावी ।।२.३०।।
आत्मरूप श्रीगुरूने एखादवेळी भलतेच(काहीबाही)कदाचित सहज (अळुमाळु)पाहिलेच, तर त्या पाहिलेल्या वस्तुसह(देखतेही) पाहतेपण ज्याच्या ठिकाणी(गावी) खोटे(टवाळु) ठरते.
Guru stands for unity(Adwaait) and if by chance he views something ,then the viewer and what is viewed both disappear
गुरू हे परब्रह्म आहेत.दोनपणावर आधारलेली कोणतीही गोष्ट त्यांच्याबाबत होत नाही.जाणणे,बोलणे,पहाणे ह्या दोनपणावर आधारलेल्या गोष्टी आहेत .चुकून,सहजपणे जर त्यांनी एखादे दृश्य पाहिले तर द्रष्ट्यासह दृश्य नाहिसे होते.गुरू हा एकटाच आहे .दुसरे कोणीच नाही अशा परिस्थितीत तो पहाणार तरी काय.त्यांनी पाहिलेच तर गुरूच्या गावी म्हणजेच त्याच्या ठिकाणी तो दोषच होय.गुरूच्या अद्वैतस्थितीला कधीच बाधा येत नाही.
Guru is Parabrahm ,unity as against duality.As regards Guru anything involving duality does not take place If by coincidence such duality occurs then the viewer and the view ,both disappear.Guru is alone and therefore there is nothing that he can see.And if such thing happens ,it is incongruent with his nature .

—————

अमृतानुभव-८२ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.३१
तेथे नमन कां बोले । केऊतू सुये पाऊले ।
आंगी लावुनि नाडिले । नांवचि जेणे ।।२.३१।।
त्या अत्यंत द्वैतरहित गुरूच्या ठिकाणी,नमनाचे किंवा बोलाचे पाऊल कसे प्रवेश (सुये)करेल,कारण आंगी नाव लावून त्यांनी नावाला खोटे ठरविले(नाडिले)
How is it possible for Guru who stands for unity and who is without duality,that conveying respect through salute or talk takes place.He has proved that the act of naming is false by calling himself by name

श्रीगुरू हे अद्वैतरूप आहेत.त्यांच्या बाबतीत कोणत्याही स्वरूपाचे द्वैत,दोनपणा उद्भवत नाही.तेव्हा नमस्कार करणे किंवा बोलणे ह्या क्रिया संभवतच नाहीत.नमस्कार करणे ह्या क्रियेत द्वैत आहे.नमस्कार करणारा व ज्याला नमस्कार करायचा तो असे दोघेजण नमस्कार क्रियेत असतात.बोलणे ह्या क्रियेतही बोलणारा व ऐकणारा असे दोघेजण असतात.श्रीज्ञानेश्वरांचे गुरू निवृत्तीनाथ ,ह्यांच्या नावाबाबतीतही द्वैत का अद्वैत हा प्रश्न निर्माण होतो.कारण शरीररूपातील माणूस व त्याचे नाव ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु परब्रह्म हे सर्व व्यापक आहे.त्याच्याशिवाय दुसरी वस्तू नाही.ब्रह्म व नामरूपे यांचे तादात्म्य आहे.श्रीगुरूचा व त्यांच्या नामरूपांचा द्वैतसंबंध नाही.त्यांच्या आंगाला लागलेले नामरूप हे खोटे आहे.

Shriguru is an embodiment of Adwait,unity.He does not include even a modicum of Dwait,duality.Therefore the act of conveying respect by bowing before someone or talking to some one is not relevant to Guru because both acts involve two persons i.e. Dwait.Bowing before someone involves one who bows and the person before whom bowing takes place.Similarly talking involves two ,one who talks and the other listener.Dnyandeo`s Guru Shri Nivrutinath however has defied this concept by identifying oneself by a name Nivruti.The process of naming involves separation of body of a person from his name amounting to Dwait.But in reality it is not so.The name which distinguishes him from his body really does not do that.

अमृतानुभव-८३ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.३२

नाहीं आत्मया आत्मप्रवृत्ति । वाढविता के निवृत्ति ।
परी या नामाची वाय बुंथी । सांडीचि ना ।।२.३२।।

आत्म्याचे ठिकाणी आत्मा या शब्दाचाच संबध(प्रवृत्ती) नाही.तर आणखी निवृत्ती या शब्दाचा संबंध आणखी कुठे वाढविता .पण निवृत्ती नावाचा खोटा संबंध (वाय बुंथी) मात्र श्रीगुरू टाकून देत नाहीत(सांडीचि ना)
The word Atma(unity) is irrelevant in the case of (concept)Atma. However Guru does not abandon his name Nivruti.

आत्मा हा निर्गुण, निराकार आहे . त्यामुळे आत्म्याचे ठिकाणी आत्मा शब्दाचाच काही संबंध नाही.कारण वाच्य-वाचक हा संबंध दोन भिन्न गोष्टींचा होतो.ज्यांचे वस्तूत्व व अस्तित्व भिन्न भिन्न असते त्यांना भिन्न पदार्थ म्हणतात.आत्मा हा अत्यंत व्यापक आहे त्यामुळे दुसर्या भिन्न वस्तूचे अस्तित्वच मानता येत नाही.आत्म्याशी आत्म| शब्दाचाच संबध नाही गुरू हा परमात्मा आहे.गुरूलाही कोणत्याही नावाने संबोधने अर्थहीन आहे.ज्याला कोणतेही नाव लावता येत नाही त्याला निवृत्ती हे तरी नाव कसे लावता येईल.येणारच नाही.तरी परंतु श्रीगुरू निवृत्तीनाथ आपले नाव टाकून देत नाहीत.
हे चमत्कारिक वाटते ,पण ते खरे नाही.आत्मा हा सर्व व्यापी आहे.सर्वांशी त्याचे तादात्म्य असल्यामुळे नामरूपेही त्याच्याशी जवळकीने रहातात.म्हणून आत्मरूप गुरूचे निवृत्ती नाव स्वाभाविक आहे.

Atma is attributeless and formless .Therefore the word Atma is meaningless .Atma is universal and it exists everywhere.Therefore there does not exist anything which is not covered by Atma.Atma does not tolerate difference.Two things are supposed to be different if their existence and form are different.Atma does not recognize difference. Guru is Atma all pervading and therefore how is it possible that he is named Nivruti .But that is not alarming in this case.Since Atma stands
for oneness ,unity everything carrying name is united to Atma and therefore Guru carrying name Nivruti is not incongruent with the idea
Atma.

अमृतानुभव-८४ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.३३

निवर्त्य तवं नाही । मा निवर्तवी हा काई ।
परि कैसा बैसे ठाय़ी । निवृत्ती नामाच्या ।।२.३३।।

निवृत्ति करतात(निवर्तवी) म्हणून श्रीगुरूंना निवृत्ति म्हणतात असे म्हणावे तर निवृत्ति करण्यासारखे काहीच नाही.पण श्रीगुरू निवृत्ति नाव घेऊन बसले आहेत
If one feels that Guru is named Renouncer(Nivruti) because he renounces the worldly things then it is wrong as there is nothing to be renounced.And yet Guru carries the name Nivruti.

निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे मोठे भाऊ व त्यांचे गुरू.त्यांचे गुरूपण कशा स्वरूपाचे हे ह्या ओवीत स्पष्ट केले आहे.प्रवृत्ती म्हणजे क्रियाशिलता व निवृत्ती म्हणजे क्रियाहिनता. गुरू प्रवृत्तीचा नाश करतात म्हणून त्यांचे नाव निवृत्ती आहे असे नाही. नाश करण्यासारखे काहीच नाही आहे.गुरू अद्वैतरूप आहेत.ते परब्रम्हमरूप आहेत.परब्रह्म हे सर्वत्र आहे.ते विशाल आहे.व त्यात द्वैतभाव कुठेच नाही.द्वैत असेल तर एकजण दुसर्याचा नाश करेल.जिथे एकचजण आहे तिथे कोण कोणाचा नाश करणार.परब्रह्म अतिविशाल असल्यामुळे सर्व नामरूपेही त्या परब्रह्माचाच एक भाग आहे. त्यामुळे गुरूंचे निवृत्ती हे नाव असणे स्वाभाविक आहे.निवृती हे नाव स्वयंभू आहे.

Nivrutinath is the elder brother and also Guru of Dnyandeo.The present Q`wi is devoted to the explanation of the nature of his being Guru.The literal meaning of Nivruti is renouncing.Nivrutinath renounces everything and therefore he assumes the name Renouncer(Nivruti).But in reality there does not exist anything which may be renounced.Guru is Parbrahm,Adwait and pervades everywhere.The act of renouncing takes place only when there is Dwait .In the case of Guru Dwait does not exist.There is cohesion between Guru,the universe and all things carrying names.Therefore there is no contradiction in guru having the name Nivruti.

अमृतानुभव-८५ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.३४

परि सूर्यासी अंधःकारू । कै झाला होता गोचरू ।
परी तमारि हा डगरू । आलाचि कीं ।।२.३४।।
सूर्याला अंधःकार दिसला(गोचरू) व त्याने त्याचा नाश केला असे कधी झाले नाही पण अंधःकाराचा नाश करणारा(तमारू) ,अशी त्याची प्रसिद्धी(डगरू) झालीच.
Sun illuminates every moment.It never happens in sun`s life that that he sees darkness and destroys it.And yet he is named Tamari the destroyer of darkness.

श्रीगुरू निवृत्तिनाथ यांच्या नावाची व्युत्पत्ती ह्या ओवीत ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत.ते प्रतिपादन करत आहेत की श्रीनिवृत्तिनाथांचे नाव स्वयंसिद्ध आहे.ते अभावात्मक नाही, असतो.तो कधीच अंधःकार पहात नाही.त्यामुळे अंधःकार दूर करून तो प्रकाशमान झाला असे कधीच होत नाही.तरीही त्याला तमारू म्हणजे अंधाराचा शत्रू असे म्हणतात.सूर्यापुढे जसा अंधःकार येऊ शकत नाही त्याचप्रमाणे श्रीगुरू निवृत्तिनाथ यांचे नाव स्वयंसिद्ध आहे.कशाचा तरी विनाश केला म्हणून ते निवृत्ती नाहीत.

Dnyandeo, by giving a very apt example ,explains the origin of his Guru`s name Nivruti .According to him the name Nivruti does not indicate absence of something,but it is self existent.He refers to the name of sun .Sun is often referred to as Tamari which means one who destroys darkness.But this is wrong.Sun illuminates every moment.It never sees darkness.Therefore the question of destroying darkness never arises in sun`s life.Just as sun illuminates every moment and it assumes the name sun as selfexistent ,the name Nivruti is self existent and not a derivation from something else.

—————

अमृतानुभव-८५ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.३५

तैसा लटिके येणे रूढे । जड येणे उजिवडे ।
न घडे तेहि घडे । याचिया मावा ।।२.३५।।

याप्रमाणेच श्रीगुरू निवृत्तिनाथ आपल्या मायेने एकपणाला सोडून नाही(लटिके) असे दोनपण दाखवितात(रूढे) व खोटे(लटिके) जडपण प्रकाशित (उजिवडे)करतात.फार काय सांगावे यांच्या मायेने(मावा)अघटित घडते.
Shriguru at times gets bored of loneliness and is prompted to create a new world in Dwait form.But this is fake and does not contradict his Adwait form . His power creates an untoward incidence of .
ज्ञानदेव आपले गुरू निवृत्तिनाथ ह्यांचे एक वेगळेच कर्तृत्व स्पष्ट करून सांगत आहेत.अद्वैताला,एकपणाला बाधा न आणता गुरू द्वैताचा आभास निर्माण करतात. परब्रह्मही आपल्या एकटेपणाला कंटाळतात आणि विविधतेने नटलेले विश्व निर्माण करतात.ह्या नवनिर्मित जगाला ब्रह्माचे अधिष्ठान असतं.अचेतन व जड विश्वाला ते प्रकाशमान करतात.परंतु ते अद्वैताला विरोधी नाही.एकादा विद्वान विनयाने म्हणतो की मी अल्पज्ञानी आहे ,माझी चूक झाली तर माफ करा,मला समजून घ्या.पण प्रत्यक्षात तो ज्ञानी असतो व लोकही ते समजून घेतात.आपले गुरू निवृत्तिनाथ ह्यांनी निर्माण केलेले द्वैतरूप विश्वही असेच आहे.ते अद्वैतविराधी नाही.

The present O`wi is devoted to the explanation of Guru`s unusual creativity.Guru is Brahm and Brahm is oneness.But this oneness is sometime very boring and then Guru creates through its illusory power a world representing Dwait, variety which for a while looks real and therefore an apparent contradictory to its Adwait.However this not so.The Dwait world`s apparent existence is really is not self defeating. Many a time we notice a learned man very apologetic and in a public meeting expresses his ignorance but in reality he is very well informed person.Same is the case of Guru appering in DWAIT FORM.

अमृतानुभव-८६ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.३६

हा गा मायावशे दाविसी । ते मायिक म्हणोनि वाळिसी ।
अमायिक तव नव्हशी । कवणहि विषो ।।२.३६।।

हे श्रीगुरू , जेवढे मायेमुळे आम्हास दाखवितोस ते खोटे(मायिक) म्हणून त्याचे निराकरण(वाळिसी) करतोस आणि मायारहित(अमायिक) तू तर ज्ञानाने जाणणारा(विषो) होत नाहीस
Oh Guru on one hand you show us multifarious universe and at the same time you convince us that it is an illusion ,an imaginary thing and further you yourself do not become an object of perception

अद्वैतरूप श्रीगुरूचे येथे वर्णन केले आहे.ते स्वप्रेमामुळे द्वैत,दोनपणा निर्माण करतात. अद्वैताचा विसर पडून जेव्हा दोनपणाचा भास होतो त्याला माया म्हणतात व असे दोनपण अद्वैतविरोधी असते.पण अद्वैताचा विसर न पडता जेव्हा दोनपणाचा भास होतो तेव्हा ते भासणे अद्वैतविरोधी नसते.हीच संकल्पना ज्ञानदेव ह्या ओवीत स्पष्ट करून सांगत आहेत.ते म्हणतात श्रीगुरू विविधतेने नटलेले द्वैतरूपी विश्व दाखवतात आणि ते खोटे आहे हेही पटवतात.श्रीगुरू अद्वैतरूप आहेत.ते कोणाला जाणत नाहीत कारण ते एकटेच असल्यामुळे अन्य कोणाला जाणण्याचा प्रश्नच येत नाही.जाणणे ह्या क्रियेसाठी दोघांची जरूरी असते जाणणारा आणि जे जाणायचे ते.जाणणारा कोणीच नसल्यामुळे गुरूला जाणणे हेही संभवत नाही व आपणच आपल्याला जाणण्याची आवशक्यता नाही.
Dnyandeo explains the nature of Shriguru.He addresses Guru and expresses his bewilderment as on one hand Guru presents before him the multifarious universe and at the same time emphatically renounce it as this universe in its dual form is illusory . The fact is that when we experience the universe in its dual form without forgetting the Adwait it is not an illusion.But when we forget Adwait .the universe in its multifarious form is an illusion.Further Guru when experienced in its Adwait form the question of he knowing something or someone recognizing him does not arise as the act of knowing or recognition involves two things ,i.e.one who recognizes and the other that is reecognised

अमृतानुभव-८७ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.३७

शिव शिवा सद्गुरू । तुजला गूढा काय करूं ।
एकाही निर्धारू धरूं । देतासी ना ।।२.३७।।
हे शिवशक्ती स्वरूपा ,सद्गुरूनाथा ,तुमचे रूप इतके गूढ आहे की तूम्ही तुमच्या रूपाविषयी एकही निश्चयकरू देत नाही.
Oh Guru you represent both Shiv and Shakti and you are inscrutable.It is impossible to fix you in any one form
श्रीगुरूंचे स्वरूप कसे आहे हे ह्या ओवीत स्पष्ट केले आहे.श्रीज्ञानदेव श्रीगुरूस उद्देशून म्हणतात हे गुरू तुमचे रूप अत्यंत गूढ आहे, ते अनाकलनीय आहे.तुम्ही अद्वैतरूप आहात असे समजावे तर तुम्ही एकटेपणाचा कंटाळा आला म्हणून हे विविधतेने नटलेले विश्व निर्माण केलेत आणि सर्व जग त्यात रममाण झाले. त्यांना त्यातील ऐक्याचा विसर पडला.पण म्हणून तुम्ही द्वैतरूप आहात असे म्हणावे तर तेही खरे नाही.आपण पूर्ण आहात.आपल्यात अपूर्णता येतच नाही.तर द्वैतरूप येणारच कसे.आणि द्वैतरूप नाही म्हणावे तर द्वैताचा नाश करून तुम्ही अद्वैतरूप झालात हे कसे.तुमचे स्वरूप अतर्क आहे हेच खरे..म्हणूनच कोणालाही विचारले तुम्ही कसे आहात तर एकच उत्तर मिळते.
नेति नेति.
Dnyandeo explains in this O`wi the nature of Guru.According to him Guru is inscrutable.He says “Oh Guru I fail to understand you.Are you Adwait or Dwait.Are you the only one or many.If I visualize you in numerous forms,and as objects with several names it contradicts your eternal description as the only one.You are absolute,the only one.You cannot be fragmented into pieces and therefore how is it possible to visualize you in numerous forms.At the same time you attain Adwait form by destroying Dwait , manyness and variety.Does it mean you destroyed what did not exist.Oh Guru we are really confused.Are you unique and the only one or you are in different and numerous form””
अमृतानुभव-८८ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.३८

नामेरूपे बहुवसे । उभारूनि पाडिली ओसे ।
सत्तेचेनि आवेशे । तोषलासीं ना ।।२..३८।।

नाना(बहुवसे) नामरूपांची उभारणी करून तितकीहि नामरूपे आपण ओस पाडलीत आणि जिकडे तिकडे आपलीच सत्ता पसरून दुसर्याची सत्ताच ठेवायची नाही या आवेषातच(आवेशे) आपल्याला संतोष(तोषलासी) वाटतो
Oh Guru you created this world consisting of several things carrying different names and you extinguished all of them too.Oh Guru thereby you established your authority everywhere .Is it that you enjoy being the supreme authority.
गुरू साकार आहेत का निराकार आहेत,ते सगुण आहेत का निर्गुण आहेत ह्याचे निरूपण ह्या ओवीत केले आहे.ह्या जगात अनेक वस्तू आहेत व त्या विविध नावाने संबोधल्या जातात..त्या विविध वस्तूंचा गुरूशी संबंध जोडून गुरू सगुण आहे असे समजावे तर ते चूक आहे कारण गुरूवाचून दुसरी वस्तूच नाही व गुरूचेच सर्वत्र अस्तित्व असल्यामुळे अशी नामरूपे ओस ठरतात म्हणजे अशी नामरूपे नाहीतच. गुरू अद्वैतरूप असल्यामुळे त्याशिवाय अन्य ,दुसरी वस्तू कल्पिताच येत नाही..त्यामुळे गुण व आकार ह्यामुळे निर्माण झालेली विविधताही कल्पिता येत नाही.गुरू सगुणही आहे व निर्गुणही आहे .ते साकारही आहेत व निराकारही आहेत .ते साकार आहेत निराकार नाहीत असे म्हणता येत नाही.किंवा निराकार आहेत साकार नाहीत असेही म्हणता येत नाही. अशारितीने सर्वत्र श्रीगुरूंचीच सत्ता चालते.
In this O`wi Dnyandeo discusses nature of Shriguru,Is he characterized by any form or no form .Is he characterized by any attributes or without any attribute.Dnyandeo says “I am perplexed”.The world consists of innumerable things carrying different names with different forms and different attributes .If he is identified with such world it contradicts his true form.He represents Adwait .He abhors Dwait i.e.duality.He does not tolerate anything other than himself.What it really means is that a world with different forms and attributes does not exist outside the perview of Guru does not exist.Guru is alone and at the same time all pervading.He exists every where in the world.Guru is alone ,the only one and at the same time He is everywhere.This is not self contradictory. He has form and and at the same time he is formless.Guru exercises his power in both the worlds ,the world formless and of form .

——— —————— ——————
अमृतानुभव-८९ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.३९

जीवु घेतल्याविणे । चालो नेदिसी साजणें ।
भृत्यु उरे स्वामीपणें । तेहि नव्हे ।।२.३९।।

जीवाचे वेगळे अस्तित्व मानणे(जीवु) ह्या विचाराचा बळी घेतल्यावाचून हे श्रीगुरू तुम्ही सेवक(भृत्य) सबंध किंवा सेव्यसेवकादी प्रेमसंबंधही(साजणे) चालू देत नाही(नेदिसी). पण सेवकाने स्वामीशी मिळून स्वामी पणाने रहावे तसे जीवभाव सोडून श्रीगुरूस्वरूप (भृत्यु उरे स्वामीपणे) होऊन रहाणेही नव्हे.

अमृतानुभव-९० प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.४०
विशेषाचेनि नावे । आत्मत्वहि न साहवे ।
किंबहुना न व्हावे । कोणीच यया ।।२.४०।।

विशेषणाच्या दृष्टीने पहाता श्रीगुरूला परमात्मा,आत्मा हे शब्दही सहन होत नाहीत. तो ते शब्द आपल्याला लावू देत नाही.किंबहुना सामान्य किंवा विशेष यापैकी कोणाचाच संबंध श्रीगुरू होऊ देत नाही.
Shriguru does not tolerate its description by any word even by the word Atma.The word Atma is untouchable for him.He defies any effort to be described by general or special name.

वस्तूचे विशेष व सामान्य रूप ह्या संकल्पनांद्वारे ज्ञानेश्वर श्रीगुरूचे वर्णन करत आहेत.जीवाला प्रत्येक वस्तूत विशेष व सामान्य भाव जाणवतात.नाव वा रूप याद्वारे जीवाला जेव्हा वस्तूचे ज्ञान होते तेव्हा त्याला विशेष ज्ञान असे म्हणतात.आणि नामरूपाने वस्तू जेव्हा कळण्याजोगी नसते तेव्हा ती सामान्य रूपाने असते.ती आहे एवढेच कळते.वस्तूचे सामान्य रूप “असणे” एवढेच असते.हेच ब्रह्मरूप होय.जीव.परब्रह्मावाचून इतर वस्तूंच्या ठिकाणी असलेला सामान्य व विशेषभाव ,मूळ वस्तू व तिचे कार्य या रूपाने घेतो.पाणी हा सामान्यभाव व लहरी हा विशेषभाव. परब्रह्मरूप गुरूच्याठिकाणी नामरूपाने येणारा कोणताही विशेषभाव असत नाही.आत्मा ह्या शब्दानेही गुरूचे रूप समजूशकत नाही.हे थोडसे विरोधी वाटते.पण तसे नाही.पाणी आणि पाण्यावरील लहरी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे आपल्याला वाटते कारण आपण स्वतःला वेगळे समजतो.पण पाण्याला तसे वाटत नाही.पाण्याला ते कळतही नाही.आत्म्याचेही तसेच आहे.
Dnyaneshwar explains the nature of the Guru by a reference to two forms in which everything in this world exists.One is general and the other is special.When anything is referenced by a name suggesting its form it is special and when a word is unable to describe the form or its features it is general.In the latter case the thing only exists.Existence is its feature.This is its Parabrahm form. Dnyaneshwar therefore says that the Guru does not tolerate any effort to describe him by any word even by the word Atma.To describe the Guru by any word amounts to Dwait i.e. treating the Guru and its description by the word Atma as two separate things.A common man visualizes water and the ripples on it as two different things but water does not feel that way.From the point of water there is a complete integration between water and ripples.Same is the case with The Guru and the Atma. The two are so finely integrated that the Guru And Atma are not separate things.

श्रीज्ञानदेवकृत
अमृतानुभव-९१ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.४१-२.४६

पुढील पाच ओव्यात श्रीज्ञानदेव रोजच्या जीवनातील काही घटना आपल्यासमोर मांडतात.वरवर पाहता त्यात द्वैताचा,दोनपणाचा भास होतो.परंतु विचार केल्यावर त्यात आपणाला अद्वैताचीच जाणीव होते
In the next few O`wis Dnyandeo presents some events from day to day life which apparently create the impression of Duality but in reality they exemplify Adwait,the Unity.

राती नुरेचि सूर्या । नातरी लवण पाणिया ।
नुरेचि चेइलिया । नीद जैसी ।।२.४१।।
जसे सूर्याला रात्र कळत नाही(नुरेचि) ,सागराच्या पाण्यात मीठ वेगळे रहात नाही(नातरी) व जागेपणी(चेइलिया) निद्रा दिसत नाही
Just as the sun never experiences night and salt cannot be distinctly experienced from the water in an ocean and the awakened does not experience sleep

कापुराचे थळिव । नुरेचि आगिची भरव ।
नुरेचि रूप नाव । तैसे यया ।।२.४१।।
कापराच्या वड्या(थळिव) जाळल्या असता लाकडाप्रमाणे काही अग्नी मागे ठेवत नाहीत(नुरेचि),त्याप्रमाणे गुरू आपल्या ठिकाणी नामरूपे अलग ठेवित नाहीत.
Just as the burning of camphor does not leave ashes behind ,similarly The Guru does not leave behind his separate identity in the form of names and form

याच्या हातापाया पडे । तंव वंद्यत्वे पुढे न मंडे ।
न पडेचि हा भिडे । भेदाचिया ।।२.४२।।
हात जोडून या गुरूच्या पाया पडावे तर हा आपल्यासमोर वंदनीय म्हणून उभा रहात नाही कारण तो भेदाच्या पलिकडे आहे.
One experiences utter failure when one tries to express his deep respect for the Guru by bowing before him as the Guru never presents himself as the revered one.

श्रीगुरूच्या ठिकाणी कधीही द्वैत असू शकत नाही ,ते अशक्य आहे हे अनेक उदाहरणांद्वारे ज्ञानेश्वर पटवून देत आहेत.आदरणीय असणे हे द्वैत आहे कारण त्यात आदर दाखवणारा व ज्याच्याबद्दल आदर दाखवायचा असे दोघेजण येतात.
It is impossible to experience Dwait in the Guru.The concept of impossibility is explained through some events which every common man experiences in his life.

आपणाप्रति रवि । उदो न करी जेवि ।
हा वंद्य नव्हे तेवि । वंदनासी ।।२.४४।।
ज्याप्रमाणे(जेवि) सूर्य आपला उदय करत नाही त्याप्रमाणे(तेवि) श्रीगुरूही वंदनास वंद्य होत नाही
Just as the sun never experiences dawn the Guru never presents himself as the revered one.

का समोरपण आपुले । न लाहिजे काही केले ।
तैसे वंद्यत्व घातले । हारवुनि येणें ।।२.४५।।
कितीही प्रयत्न केला तरी आपण आपल्यासमोर ऊभे राहू शकत नाही(लाहिजे), त्याप्रमाणे श्रीगुरू आपल्याठिकाणी वंद्यभाव येऊच देत नाही.
Just as one can never stand before oneself ,the Guru never appears as the revered one.

आकाशाचा आरसा । नुठी प्रतिबिंबाचा ठसा ।
हा वंद्य नव्हे तैसा । नमस्कारासी ।।२.४६।।
आकाशाच्या आरशात जसे प्रतिबिंब पडत नाही(नुठी) त्याप्रमाणे श्रीगुरू नमस्काराचा विषय होत नाहीत.
Just as an image is never seen in the mirror like sky ,the Guru is never a subject of reverence.

– ———————-

ज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव-९२ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.४७

परि नव्हे तरी न हो । हे वेखोसे का घेवो ।
परि वंदितयाहि ठावो । उरो नेदी ।। २.४७ ।।
श्री गुरूच्या ठिकाणी वंदन करणारा व वंद्य याचा विरोध(वेखोसे) आहे हे कितीवेळा सांगायचे पण वंदन करणार्यालाही ते अलग राहू देत नाहीत(नेदी)
It is often made clear that The Guru does not tolerate distinction being made between one who expresses deep reverence and the one who is highly revered but it is also true that the Guru does not abandon the one who expresses respect.
श्रीगुरू हे अद्वैतरूप आहेत.त्यांच्या ठिकाणी कसल्याही स्वरूपाचे द्वैत असत नाही. त्यामुळे वंद्य आणि वंदीत,ज्याला वंदन करायचे तो व जो वंदन करतो तो असे द्वैत गुरूला आवडत नाही.अशा द्वैताला त्याचा विरोध आहे.पण ह्याचा अर्थ असा नाही की गुरू शिष्याला ,वंदन करू इच्छिणार्याला वार्यावर सोडून देतो.वंदीतालाही तो आपल्याबरोबर घेतो.म्हणजेच वंद्य व वंदीत दोघेही एकरूप होतात .ते वेगळे रहात नाहीत. द्वैत-अद्वैतरहित अशी ही स्थिती होय.
Shriguru is an epitome of the Unity,the Adwait.Being Guru he is the most respectable and every one aspires to bow before him and convey one`s respect.However the situation so created amounts to accepting the Duality,the Dwait which Guru abhors.therefore the situation is discarded.It does not suggest ,at the same time that,The guru abondons whoever desires to convey deep respect towards him.On the contrary TheGuru absorbs him in his fold of Adwait .It results in abolition of Dwait and survival of Adwait in its ultimate form where there is neither Adwait nor Dwait
—*—

श्रीज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव-९३ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.४८

आंगौनि एकुणा झोलु । फेडिताचि तरि तो बाहिरिलु ।
कडु फिटे आतुलु । न फेडिताचि ।। २.४८ ।।

धोतराच्या सोग्याची बाहेरची(बाहेरिलु) गाठ(झोलु) सोडल्यावर आतली(आतुलु) गाठ आपोआप सुटते (त्याप्रमाणे वंद्यत्वाबरोबर वंदन करणाराही जातो)
Once the outer knot of a Dhoti is loosened the inner one is automatically loosened.(It means once a reverend disappears the one who expresses reverence also disappears)

अद्वैतरूपी गुरूचे वर्णन करताना श्रीज्ञानदेव माणसाच्या पेहरावाचे उदाहरण देतात.भारतात विशेषतः महाराषट्रात मागच्यापिढीपर्यंत पायजमा,पॅंटऐवजी धोतर नेसण्याची प्रथा होती.धोतर हे एक सलग चारपाच वार कापड असे.त्यास कुठेही शिलाई वा काजे बटन नसे .ते कंबरेभोवती लपेटून घेतलेले असे.त्यास दोन पदर असत व गाठीने घट्ट बांधले जाई .बाहेरची गाठ सोडली म्हणजे आतल्या पदराची गाठ आपोआप सुटे.थोडक्यात एक क्रिया केली म्हणजे दुसरी क्रिया आपोआप घडे.वंद्यभाव व वंदकत्व ह्याबाबत असेच होते.गुरूच्या ठिकाणी द्वैतभाव संभवतच नाही.गुरूजरी वंद्य असले तरी ते कोणाचाही नमस्कार घेत नाहीत कारण वंदन ही क्रिया द्वैत निर्माण करते.गुरूच वंद्यभाव नाकारतात त्यामुळे वंदन ही क्रियाही नाहिशी होते.
Dnyandeo posseses unusual skill of simplifying otherwise very hard concepts by referring to events experienced in day to day life.He proposes to explain the concept of Adwait.It has been explained earlier that Shriguru does not like Dwait and though he is very respectable he does not accept any one`s act of bowing before him and conveying reverence.As he does not tolerate being revered, the question of someone expressing reverence does not arise.Both the revered and the one expressing reverence disappear.This concept is explained by reference to an old fashioned men`s wear viz,Dhoti.Dhoti is a long cloth worn by a man around his waist and tightened by a knot.Dhoti has two layers the inside and the outside. When the outer knot is loosened the inner is automatically loosened and does not require separate effort.Shri Dnyandeo says the disappearance of the revered and the one conveying reverence disappear as easily and smoothly as the act of loosening Dhoti knots.

श्रीज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव-९४ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.४९

नाना बिंबपणासरिसे । घेऊनि प्रतिबिंब नासे ।
नेले वंद्यत्व येणे तैसे । वंदितेनसी ।।२.४९।।
किंवा बिंबपणाला बरोबर घेऊनच(सरिसे) प्रतिबिंब नाहिसे(नासे) होते ,त्याप्रमाणे श्रीगुरूंनीआपल्या वंद्यत्वाबद्दल वंदन करणाराही शिल्लक ठेवला नाही.
Or just as the image disappears along with the object Shriguru ensured that no one exists who expresses deep reverence for him .

श्रीगुरूं स्वतःला वंदनीय समजत नाहीत व त्यामुळे ते कोणालाही आपल्याला वंदन करून देत नाहीत.त्यामुळे वंदनीय व वंदन करणारा हे दोघेही नाहीसे होतात. ज्ञानदेव हीच घटना एका चपखल उदाहरणाद्वारे स्पष्ट करतात.एकाद्या तलावात पाणी असते. अशावेळी आपल्याला त्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसते.ते पहाणारा द्रष्टा,ते दृष्य व पहाण्याची क्रिया असे अनेकपण अस्तित्वात येते.पण पुढे तलाव आटून गेला तर आपल्याला प्रतिबिंबही दिसत नाही व त्या परिस्थितीत पाहण्यासाठीच काही नसल्याने पहाणाराही रहात नाही व त्यामुळे अनेकपण आपोआपच नाहीसे होते.तसेच वंदनियता व वंदन करणारा एकाचवेळी नाहीसे होतात.

Shridnyandeo is exploring the concept of Guru who according to him is the epitome of Adwait .Inspite of the fact that He is the most revered one he does not accept any one who conveys respect to him.In his case the pair of the respected and the one conveying respect does not exist.Both disappear simultaneously.He elaborates this concept through an illustration of an object and its image.Imagine a situation where you see an image of the sun in a water tank.When the water tank dries up the reflection,the image of the sun also vanishes and so also the viewer as there is nothing to be viewed.The same thing happens in the case of the revered and the one who expresses reverence.

श्रीज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव-९५ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी२.५०

नाही रूपाची येथ सोय । तेथे दृष्टिचे कांहीच नोहे ।
आम्हा फळले हे पाय । ऐसिया दशा ।।२.५०।।
जेथे रूपाचा व रूप पाहणार्या दृष्टीचा संबंध(पाय) लागत नाही,अशा अवस्थेत(ऐसिया दशा) श्रीगुरूचे पाय आम्हाला फळले.
When there does not exist anything which has a form the question of seer who sees does not arise.Under such condition we experienced the feet of Guru.

जेथे रूप नाही तेथे द्रष्टादृष्यरहित स्थिती असते.वस्तुला आकार नसेल तर ती वस्तू कोणालाच दिसत नाही.ती वस्तू पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.जर रूप असेल तरच पाहणारा असेल व द्वैत निर्माण होईल.श्रीज्ञानदेव म्हणतात द्वैतरहित,द्रष्टादृष्यरहित अवस्थेत आम्हाला गुरूचे पाय फळले.गुरूचे पाय हे सगुण रूप आहे.द्रष्टा-दृष्यरहीत रूप हे निर्गुण रूप आहे .गुरूच्या सगुण पाय रूपात आम्हाला द्वैतरहित निर्गुणरूप अनुभवास आले असे ज्ञानदेव म्हणतात.ह्याचा अर्थ असा नाही की सगुण पाय हे मिथ्या भ्रामक किंवा खोटे ठरले.तसेच हेही समजून घेतले पाहिजे की सगुण पाय हे द्रष्टा-दृष्यरहित निर्गुण रूप मिळवण्याचे साधन नव्हे.कारण साधन-साध्य असा विचार केला की ते द्वैत झाले.त्याला तर गुरूचा विरोध आहे.तेव्हा हे समजून घेतले पाहिजे की सगुण निर्गुण रूपे ह्या दोन भिन्न गोष्टी नाहित.एकच वस्तू दोन शब्दांनी संबोधित केलेली आहे एवढेच.
In this Owi Shridnyandeo explains the true relation between the two viz. the formless and the one which has a form.In the case of formless object it cannot be seen.Therefore the dual condition of the perceiver and the object to be perceived does not arise.It is with this condition that we experienced the feet of Shri Guru.Dnyaneshwar further elaborates his experience and conveys that Sriguru`s feet enabled us to realize the formless ,the Adwait.In other words Nirgun(formless) Brahm was realized thru Guru`s feet the one having form.However it should not be interpreted that the Gurus feet was instrument of achieving the aim of realizing the goal ,because it amounts to duality which the Guru abhors.The right interpretation would be to treat it as the act of naming the same thing by two names.

————–***********

श्रीज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव-९६ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.५१

गुणा तेलाचिया सोयरिका । निर्वाहिली दीपकळिका ।
ते का होईल पुळिका । कापुराचिया ।।२.५१।।

वात व तेल एकत्र(सोयरिका) करून उत्पन्न केलेली ज्योत(दीपकळिका) कापराच्या वडीची बरोबरी करू शकेल का ?
Will the flame produced by the combination of wick and oil compete with the flame created by camphor ?

तया दोहो परस्परे । होय ना जंव मेल्हेरे ।
तवं दोहीचेहि सरे । सरसेची ।।२.५२।।
ज्याप्रमाणे कापूर आणि अग्नी एकत्र(मेल्हेरे) आल्यावर दोघेही एकदमच(सरसेची) नाहीसे होतात
Just as the moment camphor and fire come together both disappear

द्वैताचा विनाश होऊन अद्वैत अस्तित्वात येते.द्वैतच नाहीसे झाल्यावर अद्वैतही नाहीसे होते .एक हे दोनच्या संदर्भातच अर्थपूर्ण आहे.दुसरा जर नसेल तर एकला तरी काय अर्थ.द्वैत व अद्वैत एकत्रच नाहीसे होततात ही संकल्पना श्रीज्ञानदेव वरील दोन ओव्यात स्पष्ट करतात.कापसाची वात तेलात बुडवून ज्योत तयार केली जाते,तसेच कापूर व अग्नी एकत्र आले म्हणजेही ज्योत तयार होते.श्रीज्ञानेश्वर प्रश्न करतात दोघांची कशी तुलना होणार. तेल व वात ह्यांच्या सहाय्याने तयार झालेली ज्योत ह्यात द्वैत आहे .तेल-वात व ज्योत हे वेगळे दिसतात. कापूर आणि अग्नी जेव्हा जेव्हा जवळ येतात तेव्हाही ज्योत निर्माण होते पण क्षणात ते दोघेही एकाचवेळी नाहीसे होतात.आणि खाली राखसुद्धा रहात नाही.कापूर आणि ज्योत असे द्वैत शिल्लकच रहात नाही.एवढेच नव्हे तर अद्वैतही नाहीसे होते.ज्ञानदेवांचे दृष्टांत नेहमीच अत्यंत अर्थपूर्ण असतात.
The present chapter is devoted to the explanation of Adwait form of the Guru ,the mentor .He elucidates this concept through the illustration of flame created by wick and oil on one hand and the flame created by camphor and fire.He states that the two just defy any comparison.The flame created by wick and oil represents Dwait because when you see the flame created by the wick and oil you distinctly see the flame and wick as two distinct and separate entities.However in the case of camphor we observe that when fire and camphor come together instantly a flame is created and the two vanish together leaving no traces behind. Similarly Dwait and Adwait vanish together.In the case of the Guru, the mentor and the student do not exist as separate entities.

श्रीज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव-९७ प्रकरण-२
गुरूमहिमा ओवी २.५३

तेवि देखेना मी ययाते । तंव गेले वंद्य वंदिते ।
चेइलिया कान्ते । स्वप्नीचे जेवि ।।२.५३ ।।
ज्याप्रमाणे स्वप्नात एखाद्याने आपल्या पत्नीला पाहिले व जागा झाल्यावर पाहणे ही क्रिया व जे पहिले ते म्हणजे पत्नी हे दोघेही नाहिसे होतात त्याप्रमाणे मी गुरूला पाहिले तर वंद्य व वंदिता हे दोघेही नाहिसे झाले.
Just as a man sees his wife in a dream but when he awakens he experiences the disappearance of both the wife and the act of seeing his wife,similarly the moment I thought of The Guru both the reverend and the one who expresses reverence vanish.

किंबहुना इया भाखा । द्वैताचा जेथ उपखा ।
फेडुनिया स्वसखा ।श्रीगुरू वंदिला ।।२,५४।।
किंबहुना ह्या भाषेमुळे जो द्वैताचा श्रीगुरूच्या ठिकाणी भास होतो तो नाहीसा करून माझा सखा श्रीगुरू त्याला मी वंदन केले.
Infact I conveyed deep respect to my close friend the Guru after dispelling the illusion of Dwait ,the duality that was associated with the Guru because of wrong words used to describe him.

श्री ज्ञानेश्वरकृतl
अमृतानुभव ९८ प्रकरण २
गुरू महिमा ओवी २.५५
याच्या सख्याची नवाई । आंगी एकपणा रूप नाहीं ।
आणि गुरूशिष्य दुवाळीहि । पवाडु केला ।।२.५५।।
श्री गुरूच्या प्रेमात(सख्याची) हे एक आश्चर्य(नवाई) आहे की ज्या गुरूच्या ठिकाणी एकपणाला थारा(दुवाळी) नाही तेथे त्यांनी गुरूशिष्य या दोनपणाच्या विस्ताराला(पवाडु) जागा दिली.
The love between The Guru-Disciple has an astonishing character.The Guru represents neither Adwait nor Dwait and yet it has provided space to Dwait.

गुरूशिष्य ह्यांचे अत्यंत पेमाचे संबंध असतात.त्यात द्वैत भासते.प्रेम करणारा आणि ज्याच्यावर प्रेम केले जाते तो अशा दोघांचा त्यात संबंघ येतो.पण गुरूशिष्या संबंधाची नवलाई ही आहे की हे दोनपण एकपणच सिद्ध करते.दोनपण जाणले जात नसल्याने एकपणही रहात नाही.एक हा दोनच्या संदर्भातच अर्थपूर्ण आहे .जर दोन नसतील तर एकालाही अर्थच रहात नाही.द्वैत-अद्वैतरहित अशी मूळ स्थिती कायम रहाते.श्रीगुरू प्रेम करण्याकरता दोनपणाने प्रगट होतात.खरे म्हणजे येथे एकच वस्तू पण दोन नावे घेऊन प्रगट होते.
The present Owi explains the nature of relationship between the Guru and his disciple .Outwardly one visualizes this relationship as involving two ,Dwait but it is not so.Guru desires to express love but that needs someone else who is loved.And this is student But in reality the disciple is not someone different from The Guru .He is the same person with different name.Since there is no Dwait the Adwait also becomes irrelevant. Oneness is meaningful only in relation to two .And this situation wherein there is neither Dwait nor Adwait is the most natural and original form in which Guru-disciple relationship exists.

श्रीज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव ९९ प्रकरण २
गुरूमहिमा ओवी २.५६

कैसा आपणया आपण । वीण सोयरेपण ।
हा याहून विलक्षण । नाही ना नव्हे ।।२.५६।।

कोणताही नातेसंबंध नसताना आपणच आपल्या ठिकाणी गुरूशिष्यभावाने दोनपणाला कसा येतो पहा.हा याहून विलक्षण नाही व विलक्षण होतही नाही.
A relationship implies two entities.The teacher through disciple apparently establishes a relationship involving duality.But this is not astonishing nor it will ever be.

नातं निर्माण होण्यासाठी दोघांची जरुरी जसते.गुरूशिष्य असे संबंध निर्मितीत द्वैत ,दोनपणाचे संबंध निर्माण झाल्याचा भास होतो.पण ते खरे नाही.त्यांच्यात दोनपणाचे नाते निर्माण होत नाही.श्रीगुरू आपणच आपल्या प्रेमाखातर शिष्य रूपाने प्रगट होतात.एकपणाने ते रहातात व दोनपणानेही तेच रहातात .त्यांच्या द्वैत-अद्वैत विरहित स्वरूपाला बाधा येत नाही.एकपणानेच नेहमी रहावयाचे ,दोनपणाने रहायचे नाही किंवा नेहमी दोनपणानेच रहावयाचे एकपणाने रहावयाचेच नाही असे ते नाहीत व तसे कधी होत नाहीत.अद्वैतरूप राहून दोनपणाला रहाणे हा गुरूचा स्वभावधर्मच आहे.या स्वभावधर्मापासून ते विलक्षण नाहीत वा तसे विलक्षण होतही नाहीत.
Any kind of relationship implies duality.The Guru through the entity of disciple apparently creates duality relationship and one is bewildered to find that how come The Guru who is neither Adwait,unity nor Dwait i.e.duality expresses himself in duality form through the disciple.But it be noted that The Guru who epitomizes oneness expresses himself in the form of disciple without loosing his character viz. oneness .It is not astonishing nor it will ever be astonishing.It never happens that he represents only Adwai but not Dwait or He always rephresents Dwait but never Adwait.
——
श्रीज्ञानेश्वरमाऊली यांच्या अमृतानुभव ह्या अद्वैत तत्वज्ञान विशद करणार्या ग्रंथाची फेसबुक मित्रांना ओळख करून देण्याचा संकल्प मी काही दिवसापूर्वी सोडला व त्याला प्रतिसादही ऊत्साहवर्धक होता.आज त्याला १०० दिवस होत आहेत.आपणा सर्वांचा मी आभारी आहे.
—–
श्रीज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव १०० प्रकरण २
गुरूमहिमा ओवी २.५७

जग आघवे पोटी माये । गगना एवढे होऊनि ठाये ।
कीं तेचि निशी साहे । नाहीपणाची ।।२.५७।।

संपूर्ण(आघवे) जग पोटात सामावेल(माये) असा आकाशा एवढा तो मोठा झाला तोच नाहीपणाची रात्र(निशी) सहन करितो.
Shri Guru is so large that he can accommodate the whole sky but the same one has to tolerate the night of nonexistence.

परब्रह्म आहे का नाही हा जीवाला प्रश्न पडतो.ते साकार आहे का निराकार आहे ,सगुण आहे का निर्गुण आहे हे प्रश्न सामान्यांना पडतो.असे प्रश्न पडण्याचे मुख्य कारण ण्हजे जीव स्वतःला परब्रह्मापासून वेगळा समजतो.जीव जेव्हां स्वतःला परब्रह्मापासून वेगळा समजत नाही ,जेव्हा त्यांच्यात तादात्म्य असते तेव्हा त्याला असे प्रश्न पडत नाहीत.निर्गुण सगुण रूपाने वा निराकार साकार रूपाने राहू शकतात.ज्यांच्याबाबत असे तादात्म्य होत नाही त्यांना हे जग मायारूप म्हणजेच खोटे वाटते.म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात जो जग पोटात सामावेल असा आकाशा एवढा मोठा झाला तोच नाहीपणाची रात्र सहन करतो.परब्रह्म नाही म्हणावे तर हे विश्व त्याचीच निर्मिती आहे व हे जगच ब्रह्म आहे म्हणावे तर द्वैताचा भास होतो.परब्रह्म तर अद्वैत आहे.थोडक्यात ते विरोधी वाटले तरी ते विरोधी नाही.
Shri Dnyandeo dicusses a paradox that one encounters in understanding the nature of Guru.The Guru is so large that it accommodates the whole sky and yet it is beyond understanding.The Guru is One the Adwait.And yet one fails to understand whether the universe is formless or with form ,does it have any attribute or no attribute.This confusion arises because of man`s inability to identify him with Brahm.He considers himself as someone different from The Brahm and and therefore is unable to understand that though apparently one considers the Parbrahm and the universe distinct from each other in reality it is not so.It is wrong to visualize that if one(Adwait) is true and real the other(dwait) is untrue and unreal. In fact Dwait is an expression of Adwait.

सुप्रभातम्
-=-=-=-=
श्रीज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव १०१ प्रकरण २
गुरूमहिमा ओवी २.५८

का पूर्णते तरी आधारू । सिंधु जैसा दुर्भरू ।
तैसा विरूद्धा पाहुणेरू । जयाच्या घरीं ।।२.५८।।

समुद्र(सिंधु) हा पूर्णतेला आधार आहे तसेच अपूर्णतेलाही(दुर्भरू) आधार आहे.त्याप्रमाणे श्रीगुरू परमात्म्याचे ठिकाणी परस्पर विरूद्ध दिसणार्या धर्माचा पाहुणचार होतो.
The ocean appears to be both fully filled up and not fully filled up. In the home of Sadguru two opposites receive hospitality.

समुद्र हा विशाल आहे.तो नेहमी पूर्ण भरलेलाच दिसतो.तो कधीच रिकामा,आटलेला दिसत नाही.तरी परंतु त्याला अनेक नद्या येऊन मिळतच असतात.म्ङणजेच एका अर्थाने. तो पूर्ण भरलेला नसतो .तो काही प्रमाणात रिकामा असतो.नद्यांचे पाणी सामाऊन घेण्याइतकी त्यात मोकळी जागा असते.गुरू हा समुद्रासारखा आहे.तो पूर्णही आहे व अपूर्णही आहे.श्रीगुरूच्या ठिकाणी परस्पर विरोधी दिसणार्या गोष्टी अनुभवास येतात.श्रीगुरूच्या ठिकाणी द्वैत आणि अद्वैत अशा दोन विरोधी धर्मांना पाहुणचार होतो.
The ocean is very huge. It always gives the impression of fullness. No part of ocean looks empty. Yet it is experienced that many rivers ultimately merge in ocean.It suggests that there was space in the ocean which was unfilled.Just the ocean looks both full and not full at the same , The Sadguru also accommodates two opposite realities Dwait and Adwait..

ज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव १०२ प्रकरण २
गुरूमहिमा ओवी २.५९
तेजा तमाते कांही । परस्परे निके नाही ।
परी सूर्याच्या ठायीं । सूर्यचि असे ।।२.५९।।
प्रकाश व अंधार यांचे परस्पर बरे(निके) नसले तरी सूर्याच्या ठिकाणी प्रकाशरूप सूर्यच आहे.
Even though light and darkness are opposite to each other ,from the point of sun there exists only light.
सामान्य माणसाच्य दृष्टीने प्रकाश व अंधार ह्यांचे वैर आहे.ते एकमेकां विरोधी आहेत.प्रकाश असेल तर तेथे अंधार नसतो व जेथे अंधार असतो तेथे प्रकाश नसतो.पण सूर्याच्या ठिकाणी असा भेदभाव नसतो.सूर्य हा नेहमी प्रकाशितच असतो.त्याला अंधार माहितीच नसतो.त्याच्या ठिकाणी प्रकाश व अंधार प्रकाशरूपच असतात.त्यांच्यात वैर वा विरोध नसतो.
From the point of a common man light and darkness are mutually exclusive.If light is present ,darkness does not appear and if darkness is present then light does not exist.However from the point of the sun there exists only light even the darkness becomes light and the apparent paradox disappears.There is no enmity between the two.Since there is only light the opposite condition does not arise.
———–
in श्रीज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव १०३ प्रकरण २
गुरूमहिमा ओवी २.६०

एक म्हणतां भेदे । तें कीं नानात्वे नांदे ।
विरूद्धे आपणया विरूद्धे । होतील काई ।।२.६०।।
ज्याला आपण एक म्हणतो तेच नानात्वाने भासते.विरूद्ध असणार्या वस्तू स्वतःच्या विरूद्ध होतील का ?
What we call as one appears in different form and becomes two.How is it possible that things opposite to each other will be opposite to oneself.
अज्ञानी माणसाला १ आणि २ हे वेगळे वाटतात व त्यांच्यात त्याला विरोध दिसतो.पण ज्ञानी माणसाला २ ही संख्या १ पेक्षा वेगळी वाटत नाही.त्याला दोन म्हणजे एकाचाच दोनदा उच्चार असे वाटते.त्याला दोनमध्ये एकच दिसतो.त्याचप्रमाणे अद्वैतरूप गुरूतही त्याच्या द्वैतरूपाने बिघाड निर्माण होत नाही.गुरूशिष्य हे सकृतदर्शनी द्वैत भासत असले तरी ज्ञानी माणसाला त्यात विरोध दिसत नाही.शिष्य हे गुरूचेच रूप आहे.दोघेही एकच आहेत.एकपणा हा एकपणाविरूद्ध म्हणजे स्वतःविरूद्ध कसा होईल.अद्वैत व द्वैत हे दोन शब्द म्हणून वेगळे आहेत पण मूलतः ते एकच आहेत.
An ignorant person visualizes “one” and “two” as two different things.They are opposite to each otherHowever The knowledgeable person understands that “two” is the outcome of repeated “one”.One repeated twice results in two.Dwait(one) is only a manifestation of Adwait(one).One and two are different only as different words and not inherently different from each other.It is because of ignorance that a commoner makes this mistake of treating one and two as two distinct things.The difference is only respect of names viz. One and two.
-=-=-=-=-
श्रीज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव १०४ प्रकरण २
गुरूमहिमा ओवी २.६१

म्हणोनि शिष्य आणि श्रीगुरूनाथु । या दोहो शब्दांचा अर्थु ।
श्रीगुरूचि परी होतु । दोहो ठायीं ।।२.६१।।
म्हणून शिष्य व श्रीगुरू या दोन शब्दांनी एक गुरू वस्तुच बोलिली जाते.
Therefore The two words the Guru and the disciple denote only one thing and that is Guru.

श्रीगुरू हे साक्षात परब्रह्म आहेत.ते अद्वैतरूप आहेत त्यांच्या ठिकाणी द्वैत निर्माण होत नाही.गुरू आणि शिष्य हे दोन वेगळे शब्द आहेत .त्यांच्यातील दोनपण हे शब्दांपुरतेच मर्यादित आहे. गुरू स्वतःच शिष्य होतात आणि आपल्यालाच उपदेश करतात.शिष्य हा गुरूपासून वेगळा होत नाही.
Therefore the two words, disciple and teacher ,connote teacher.
Shriguru is Parabrahm.Teacher is one who teaches and the student is one who is taught.The act of teaching involves two entities viz. the teacher and the taught.This creates an impression of Dwait and that the two entities are separate and distinct.But this is not true.The Guru himself becomes the student and teaches himself.The teacher and disciple both connote only one entity viz Guru.
-=-=–=-=

श्रीज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव १०५ प्रकरण २
गुरूमहिमा ओवी २.६२-२.६४
कां सुवर्ण आणि लेणें । वसते एके सुवर्णे ।
वसते चंद्र चांदिणें । चंद्रींचि जेवि ।। २.६२ ।।
ज्याप्रमाणे सोनं आणि दागिना हे दोन्ही सोनेच असते,चंद्र आणि चांदणे हे दोन्ही चंद्राच्या ठिकाणीच असतात .
Just as gold and ornament both reside in gold and moon and moonlight both exist in moon itself.
नाना कापूर आणि परिमळू । कापुरचि केवळु ।
कीं गोडी आणि गुळु । गुळुचि जेवि ।। २.६३ ।।
कापूर आणि त्याचा सुवास हे दोन्ही कापुराच्या ठिकाणीच असतात, व गुळ आणि त्याची गोडी ,गुळाच्याच ठिकाणी असते.
Just as camphor and its fragrance both reside in camphor itself and sugar and its sweetness both reside in sugar’
तैसा गुरूशिष्यमिषे । हाचि एक उल्हासे ।
जर्ही कांहीं दिसे । दोनीपणे ।। २.६४ ।।
त्याप्रमाणे गुरूशिष्य हे जरी दोन वेगळे दिसत असले तरी गुरू हेच दोन्ही ठिकाणी पकट होत असतात
Though the Guru and the disciple appear to be two distinct entities .In reality it is the Guru who manifests himself as the Guru and the disciple

वरील तीन ओव्यांद्वारे श्रीज्ञानेश्वर गुरू शिष्य संबंध स्पष्ट करून सांगत आहेत.गुरू आणि शिष्य ह्या दोन स्वतंत्र वस्तू आहेत असे भासते.पण ते अज्ञानामुळे.ज्ञानप्राप्तीनंतर त्यातील ऐक्य जाणवते.ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी श्रीज्ञानदेव रोजच्या जीवनातील चार उदाहरणे घेतात.प्रत्येक उदाहरणात दोघांची एक जोडी आहे.सुवर्ण व त्याची चकाकी,चंद्र व चांदणे,कापूर व त्याचा सुवास,साखर व त्याची गोडी.सोन हे चकाकी द्वारे प्रकट होतं,चंद्र चांदण्यामार्फत प्रकट होतो.कापूर त्याच्या सुगंधात प्रकट होतो.तेव्हा सोन व चकाकी ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत त्या एकच आहेत.कापूर हा त्यातील सुगंधामार्फत प्रकट होतो.
The present three O`wis explain the relation between the Guru and the disciple .They apparently look two different entities but in reality it is not so.It is the Guru who manifests himself both as the teacher and the taught.Dnyaneshwar elaborates this phenomenon thru four real life examples .He refers to four pairs of distinct entities .But though they appear different in reality they are not.The four pairs are gold and its luster,moon and moonlight,camphor and its fragrance ,sugar and its sweetness.The individual members of each pair are so intimately integrated that they cannot be separated.For example gold and its luster cannot be seperated and so also camphor and its fragrance.Gold1s luster is manifestation of gold itsef .It is not an independent entity.Same is the case of sugar and its sweetness.Sugar expresses itself through sweetness.
-=-=-=-=

पाहा पा निरंजनीं निदैला । तो निर्विवादु सुप्रभातम्

श्रीज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव १०६ प्रकरण २
गुरूमहिमा ओवी २.६५-२.६७
आरसा आणि मुखी । मुख दिसे हे उखी ।
हे आपुलिये ओळखी । जाणे मुख ।। २.६५ ।।
आरशात आपला चेहरा दिसतो ,पण तो चेहरा खोटाच(उखी) असतो.आपला चेहरा आपल्या जवळच असतो व आपल्याच ठिकाणी आपण त्याची ओळख घेत असतो.
We see our face in the mirror when a mirror is placed before us but that face is not the true face.The true face is in our body itself and we acquaint ourselves with that face.
पहा पा निरंजनी निदेला । तो निर्विवाद एकला ।
परि चेता चेवविता झाला । दोन्ही तोचि ।। २.६६ ।।
अरण्यात(निरंजनी) जाऊन एकटाच झोपलेला(निदैला) जेव्हा जागा होतो तेव्हा जागा होणारा(चेता) व जागा करणारा(चेवविता) हे दोघेही तोच असतो.
One who sleeps in the jungle and when he is awakened ,the person who is awakened and the one who awakens him are the one and the same

जे तोचि चेता तोचि चेववी । तेवि हाचि बुझे हाचि बुझवी ।
गुरू शिष्यत्व नांदवी । ऐसे न हा ।। २.६७ ।।
जागा होणारा व जागा करणारा ,व जाणणारा(शिष्य) व जाणीव करून देणारा(गुरू) हे एकच असतात.
The person who receives knowledge(disciple) and the one who imparts knowledge(Guru) are the same and not two distinct entities.

अद्वैतरूप गुरू ह्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्ऱकारचे द्वैत निर्माण होत नाही हा विचार स्पष्ट करण्यासाठी श्रीज्ञानदेव अत्यंत समर्पक अशी दोन उदाहरणे देतात.आपल्यासमोर आरसा धरला म्हणजे त्यात आपल्याला आपले मुख दिसते.पण तो भास असतो.आपले मुख आपल्याच शरीरावर असते.आरशातील चेहरा खरा आहे असे आपण समजत नाही.आरशातील चेहरा व शरीरावरील चेहरा असा दोन वेगळ्या वस्तू नसतात. कोणत्याही प्रकारचे द्वैत निर्माण होत नाही.गुरूशिष्याचे संबंधही असेच असतात. श्रीज्ञानदेव आणखिन एका उदाहरणाने हा मुद्दा स्पष्ट करतात.रानात गेलेला माणूस तेथेच झोपला व मग तो जागा होतो तेव्हा झोपणारा व त्यास जागा करणारा हे एकच असतात.त्याचप्रमाणे गुरूशिष्य संबंध असतात.गुरू आणि शिष्य ह्या दोन वेगळ्या वस्तू नाहीत.गुरू शिष्याच्या रूपात प्रगट होतो.गुरू व शिष्य ह्या दोन्ही ठिकाणी एक गुरूच असतो.

Dnyandeo in a very expressive way explains the identity of the teacher and the taught.He takes universally experienced phenomena to explain his theory.When a mirror is placed before us we see our face in it but we do not assume that it is our true face.Our true face rests in our body and not outside body.There exists only one face and not two faces.Another example that he refers to is that of a person who is asleep in a jungle. There is no one in the jungle who awakens him.The person who sleeps and the one who awakens him is he himself i.e. one person and not two different persons.The relation between the teacher and the taught is one which is of the nature unity (Adwait) and not of duality(Dwait)

श्रीज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव १०७ प्रकरण २
गुरूमहिमा, ओवी २.६८

दर्पणेविण डोळा । आपले भेटीचा सोहळा ।
भोगिता तरी लीला । सांगतो हे ।। २.६८ ।।
आरशाच्या(दर्पण) साह्याने आपण आपला डोळा पहातो.पण गुरूची ही अद्वैत लीला द्वैताच्या साह्याने होणारी नाही.ज्याला आरशाच्या साह्याशिवाय डोळ्यानेच डोळा पाहता येईल त्यालाच आम्ही ही गुरूची लीला सांगतो.
We see our eyes in the mirror.But The Guru`s Adwait is not the outcome of duality(Dwait).We would explain Adwait phenomenon only to those who can see one`s eyes without mirror.

श्रीगुरू हे अद्वैतरूप आहेत.ते शिष्याला अद्वैत समजाऊन सांगतात. आणि शिष्य ते आत्मसात करतो पण त्यासाठी गुरूला कोणत्यातरी साधनाचा उपयोग करावा लागतो. गुरू शब्दाद्वारे शिष्याला उपदेश करतात.पण ह्या क्रियेत द्वैत निर्माण होते.पण ह्या द्वैताच्या सहाय़्याने अद्वैताचे ज्ञान प्राप्त होते.सामान्यजन द्वैत हेच सत्य समजतात.तसे होऊ न देता द्वैतातील अद्वैताचे भान ठेवले पाहिजे.हे तत्व स्पष्ट करण्यासाठी श्रीज्ञानदेव दोन उदाहरणे देतात.शून्य म्हणजे काही नाही.पण ते दर्शवण्यासाठी गोल वर्तुळ काढले जाते.वर्तुळाच्या सहाय़्याने शून्याची जाण ही शुद्ध नसते.ती भेसळयुक्त असते.ज्याला वर्तुळाच्या सहाय्याशिवाय शून्याचे आकलन झाले तर ते शुद्ध होय आणि ज्ञानदेव म्हणतात, त्यालाच आम्ही गुरूची लीला सांगतो.हीच गोष्ट आरशाच्या सहाय्याने स्वतःचा डोळा पहाणार्याची आहे.जो स्वतःचा डोळा आरशाविना स्वतःच पाहू शकतो त्यालाच अद्वैत समजले. साधनाशिवाय ज्याला साध्य समजले त्यालाच खरे अद्वैत समजले.
In this O`wi shri Dnyandeo explains the process of understanding the true nature of Adwait.The understanding of Adwait is the ultimate goal.
One needs some medium,an instrument to understand the goal,the Adwait.This leads to Dwait.One uses Dwait to understand Adwait which is a paradox.Dnyaneshwar refers to a few examples.For example an eye can see the world around it but cannot see itself.It has to take the help of a mirror to see oneself.So a mirror is the medium through which an eye can see itself.But Guru teaches in such a way that Dwait does not arise.How does he do it?.Shri Dnyaneshwar declares that he will explain it to those who can see their eyes without a mirror.

श्रीज्ञानेश्वरकृत
अमृतानुभव १०८ प्रकरण २
गुरूमहिमा ओवी २.६९

एवं द्वैतासी उमसो । नेदुनि ऐक्यासी विसकुसो ।
सोयरिकेचा अतिसो । पोखितसे पुढती ।। २.६९।।
याप्रमाणे(एवं) द्वैत घडू (उमसो) न देता आणि ऐक्यही बिघडू (विसकुसो) न देता ,गुरू गुरूशिष्य संबंध(सोयरिकेचा) बळकट(पोखितसे) करतात.
And in this way without recourse to duality(Dwait) and without destroying unity(Adwait) The Guru strengthens the relation between the teacher(Guru) and the taught(disciple)

गुरू आणि शिष्य यांचे संबंध कशाप्रकारचे आहेत हे ह्या ओवीत स्पषट केले आहे.त्यात द्वैतही आहे आणि अद्वैतही आहे.वरवर पाहता हे एकमेकाविरोधी वाटते पण प्रत्यक्षात तसे नाही.त्यांच्यात ऐक्य आहे. गुरूचे हे दुहेरी रूप हेच रहस्य आहे.गुरू व शिष्य यांच्यात अत्यंतिक प्रेम आहे.त्यामुळे त्यांच्यातील द्वैतही अद्वैतच असते.त्यांच्यातील अत्यंतिक प्रेमभावामुळे द्वैताचा भास होतो.अद्वैताकडे पोचण्यासाठी द्वैताचा आश्रय घेतला जातो.
The present O`wi explains the nature of relationship between the teacher(Guru) and the taught(Shishya).Apparently one gets the imression that the relationship is of the nature of duality (Dwait) as there are two persons involved ,the teacher and the taught.But in reality it is not so.The duality is used only as a medium,an instrument to reach unity the Adwait.The intense and close relationship between the two creates a first impression of duality.The use of duality does not distort the nature of relationship between the two.

——

श्रीज्ञानदेवकृत
अमृतानुभव १०९ प्रकरण २
गुरूमहिमा ओवी २.७०

निवृत्ति जया नाव । निवृत्तिचि जया बरव ।
जया निवृत्तिपणाचि राणीव । निवृत्तिचि ।। २.७० ।।
निवृत्ति हेच ज्यांचे नाव व ज्यांचे निवृत्ति हेच सुंदर(बरव) रूप होय,असे हे निवृत्ति निवृत्तिपणाचे राज्य(राणीव) करतात.
He is the one whose name is Ascetic(Nivrutti) and And Ascetic is his beauty .He reigns the kingdom of asceticism.

निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे वडीलबंधू व गुरू होत.ह्या ओवीत निवृत्ती ह्या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला आहे.गुरूचे नाव निवृत्ती आहे.पण प्रवृत्तीचा विनाश म्हणजे निवृत्ती असा त्याचा अर्थ नाही.त्यांचे निवृत्तीपण हे स्वयंभू आहे.ते कशातून निर्माण झालेले नाही.ते स्वयंभू निवृत्त आहेत आणि तेच त्यांचे सौंदर्य होय.निवृत्ती हेच त्यांचे राजेपण,ते राजे असले तरी ते अन्य कोणावर राज्य करत नाहीत.ते अद्वैतरूप आहेत.कोणत्याही स्वरूपाचे द्वैत त्यांना स्पर्श करत नाही.
Nivrutinath is the elder brother and the Guru of Shri Dnyandeo.The present O`wi explains the meaning of the word Nivruti.The name Nivruti suggests that he has attained the state of Nivruti (ascetic) after relinquishing something but it is not so.He is self-existent.It is not derived from something.Self-existence is his beauty.He reigns the kingdom of ascetism.Being ruler of the kingdom one may epect him to be involved in customary functions of a ruler.but this not true.His kingdom is of ascetism.He does not perform any duty and therefore there is no act of reliquising something.There is no ruler and the ruled.He is Adwait (unity).

सुप्रभातम्
२1 जुलै २०१४
अमृतानुभव प्रकरण २
गुरूमहिमा ओवी २.७१

वांचुनि प्रवृत्तिरोधे । कां निवृत्तिचेनि बोधे ।
आणिजे तैसा वादे । निवृत्ति नोहे ।।२.७१।।
या निवृत्तिपणावाचून,प्रवृत्तीचा विरोधक(रोधे) किंवा कशाचे तरी नाहीसे होणे म्हणून काही निवृत्ति हे नाव(वादे) गुरूने घेतले नाही(नोहे)
Nivruti is Shriguru`s name but this name does not suggest that it is suggestive of relinquishment of something.
निवृत्तिनाथांच नाव कसं आहे ,त्याचा अर्थ काय हे ज्ञानदेव वेगवेगळ्या पद्धतीने स्पष्ट करत आहेत.त्यांच्या नावातील निवृत्ति हा शब्द प्रवृत्तीच्या विरोधी भासतो.कृतीच्या विरोधी ती निवृत्ति ,प्रवृत्तीचा विनाश म्हणजे निवृत्ति ,प्रवृत्तीचा अवरोध म्हणजे निवृत्ति ह्या अर्थाने निवृत्तिनाथ निवृत्ती नाहीत.त्यांचे निवृत्तिपण स्वयंभू आहे.निवृत्त्त हा त्यांचा निसर्गतःच स्वभाव आहे.आधी ते निवृत्त नव्हते पण कष्टाने ते त्यांनी मिळवले असे नाही.आधी गरिब होते मग श्रीमंत झाले.आधी अज्ञानी हाते मग खूप अभ्यात करून ते ज्ञानी झाले,असे निवृत्तिनाथांबद्दल झाले नाही.त्यांचे गुरूपण द्वैत-अद्वैता पलिकडले आहे.
In this Owi Shridnyandeo has explained the nature of his Guru Nivrutinath.The literal meaning of Shriguru`s name Nivruti is that inactive,not doing anything,refrain from everything,not possessing anything,inactive.One feels that he was earlier very active in this material world but now he has surrendered every thing ,relinquished everything,renounced everything and has become an ascetic.But this is not so.Ascetism is natural to him.It is his innate quality.He is epitome of Adwait.He has not acquired this quality by negation of Dwait(duality).

सुप्रभातम्
२१ जुलै २०१४
श्रीज्ञनेश्वरकृत अमृतानुभव
प्रकरण २ , ओवी २.७२
आपणा देखोनि राती । दिवसा आणि उन्नति ।
प्रवृत्ति वारी निवृत्ति । नव्हे तैसा ।। २,७२ ।।
आपल्याला आंधार दिसत आहे म्हणून काही सूर्य उगवून दिवस करत नाही त्याप्रमाणे हा निवृत्ती प्रवृत्तीचे निवारण करतो म्हणून निवृत्ति नव्हे.
The Sun does not rise just because it experiences darkness.Similarly Nivruti does not imply extinction of something.
श्रीज्ञानदेव, श्रीगुरू निवृत्तिनाथ यांचे निवृत्तिरूप हे काही कशावर तरी अवलंबून रहाणारे नाही हे आपले प्रतिपादन एका समर्पक उदाहरणाने स्पष्ट करत आहेत.सूर्याचे उगवणे हे स्वयंभू आहे.ते कशावर तरी अवलंबून नाही.सूर्य प्रकाशाचा जनक आहे.तो नियमितपणे सकाळी उगवतो व सर्व पृथ्वी प्रकाशित करतो.पण हे तो रात्रीचा अंधार अनुभवाला आला म्हणून प्रकाशित होत नाही.तो नेहमी प्रकाशितच असतो.त्याच्यासाठी अंधारमय रात्र अस्तित्वातच नसते.त्याचे उगवणे हे नित्य,स्वाभाविक व स्वयंभू आहे.
Shridnyandeo explains the nature of his Guru Shrinivrutinath.Guru`s name is Nivruti i.e. Ascetic .According to Dnyaneshar the word Ascetic apparently suggests renouncing something but in the case of Nivrutinath that is not true.His ascetism is innate,inborn.It is not acquired by doing something,by surrendering the delights of life.To strengthen his argument he he quotes the behavior of the mighty sun who gives us light .The sun does not rise every day to extinguish darkness.It is not true that he encounters darkness and therefore he rises to kill darkness.He rises as a natural instinct it is his innate behavior.In the same way Nivrutinath is ascetic as a natural instinct,
सुप्रभातम्
२२ जुलै २०१४
श्रीज्ञानेश्वरकृत अमृतानुभव
प्रकरण २,ओवी २,७३
वोपसरयाचे बळ । घेऊनि मिरवे कीळ ।
तैसे रत्न नव्हे निखळ । चक्रवर्ति हा ।। २.७३ ।।

रत्न जसे आपल्या तेजाला वाढविणार्या कोंदणाचे(वोपसरया) सहाय्य घेऊन आपले तेज(कीळ) मिरवते,त्याप्रमाणे निवृत्तिनाथ काही दुसर्याच्या सहाय्याने आपले निवृत्तिपण मिरवणारे नाहीत.ते चक्रवर्ती आहेत.
The diamond enriches its brightnes by the use of a socket but Nivrutinath does not display his ascetism by a reference to something else.He is a born emperor.
श्रीज्ञानदेव आपली स्वयंभूपणाची संकल्पना रत्नाच्या उदाहरणाने स्पष्ट करत आहेत.त्यांचे ज्येष्ठ बंधू व गुरू श्री निवृत्तिनाथ यांचे निवृत्तिपण हे त्यांनी कोणाच्या सहाय्याने वा आपल्या कष्टाने मिळवलेले नाही तर ते त्यांचे निसर्गदत्त ,नैसर्गिक व स्वयंभू आहे.रत्न हे तेजस्वी असते. पण ते कोंदणात बसवले म्हणजे अधिक तेजस्वी दिसते.श्रीगुरूंचे निवृत्तिपण हे कोणाच्या सहाय़्याने प्राप्त झालेले नाही ते स्वयंभू आहे.
.In this O`wi Dnyandeo explains the innate quality of the Goru by reference to brightness of a diamond.A diamond is a bright stone.But its brightness is further enhanced when it is fitted into a socket.In other words a diamond takes the help of something else to improve its its innate brightness.Dnyandeo argues that Nivrutinath is not one who requires someone elses help toisplay his ascetism.Ascetism is his innate quality.

गगनहि सुवोनि पोटी । जै चंद्राची पघळे पुष्टि ।
तै चांदणे तेणेसी उठी । आंग जयाचे ।। २.७४ ।।
आकाशालाही आपल्या प्रकाशाच्या पोटात साठवून जेव्हा चंद्राचा प्रकाश सर्वत्र पसरतो(पघळे) तेव्हां तो त्याच्या अंगावरच अंगभूत होऊन पसरतो.प्रकाशरूप चंद्र आपल्या प्रकाशाने पुष्ट होतो.
निवृत्तिनाथांच निवृत्ति हे नाव व निवृत्ति हा स्वभाव ह्यांची एकरूपता स्पष्ट करणारी ही ओवी आहे.ते स्पष्ट करण्यासाठी श्रीज्ञानदेव चंद्र व चांदणे ह्याचे उदाहरण घेतात. आकाशात चंद्र लहान थाळीसारखा दिसतो.पण तो जेव्हा पाघळतो,प्रकाशतो तेव्हा तो सर्व आकाश व्यापून टाकतो.तरी चंद्र व चांदणे हे वेगळे होत नाहीत.चांदणे चंद्राचाच एक भाग होऊन चंद्र व चांदणे एकरूप होतात.तसेच निवृत्तिनाथांचे आहे.त्यांते निवृत्ति हे नाव व निवृत्ति हा स्वभाव एकरूप होतात.निवृत्ति हा त्यांचा अंगभूत गुण आहे.चांदण व चंद्र हे जसे वेगळे करता येत नाहीत तसेच निवृत्तिनाथांपासून निवृत्ति हा स्वभाव वेगळा असत नाही.
The Moon encompasses the whole sky by its moonlight and at the same time it enriches itself by the same moonlight.
-ः

सुप्रभातम्
ज्ञानेश्वरकृत अमृतानुभव
प्रकरण २ , ओवी २.७५

तैसे निवृत्तिपणासी कारण । हाचि आपणया आपण ।
घेयावया फूलचि झाले घ्राण । आपुली दृति ।। २.७५ ।।
त्याप्रमाणे निवृत्तिनाथ आपणच आपल्या निवृत्तिपणाला कारण आहेत .ज्याप्रमाणे आपला सुवास(दृति) घेण्याकरता फुलच नाक(घ्राण) होते
Just as to inhale its sweet scent the flower becomes nose Similarly the cause of Nivrutti(ascetism) of Nivrutinath is he himself.

निवृत्तिनाथ आणि त्यांची निवृत्ति ह्या दोन भिन्न गोष्टी नाहीत हे स्पष्ट करणे हा ह्या ओवीचा विषय आहे.त्यासाठी एक अत्यंत नाविन्यपूर्ण उदाहरण देतात.फूलाचा सुगंध व तो सुगंध अनुभवणारे नाक ह्या दोन गोष्टी स्वतंत्र असतात म्हणजेच त्यांच्यात द्वैत असते पण कल्पना करा की त्या दोन्ही एकच झाल्या तर त्यांच्यातील द्वैत नाहीसे होईल.त्या एकरूप होतील.निवृत्तिनाथांची निवृत्तिही अशीच आहे.ती स्वयंभू आहे.ती त्यांच्यापासून वेगळी नाही.
Guru Nivrutinath`s ascetism is the subject matter of this O`wi.To elucidate the innate virtue of ascetism in Nirutinath Dnyandeo quotes example of a flower becoming nose to inhale its fragrance.Normally the flower and the nose which inhales flowers sweet smell are two different entities (Dwait) but Dnyaneshwar imagines the situation when fragrance generating flower itself becomes nose snd inhales its own smell suggesting of integration of two different things into one.In other words he imagines Dwait(duality) converting in Adwait(unity).Nivrutinath and his Nivrutti are by their innateness merge into one.

सुप्रभातम् २६ जुलै २०१४
ज्ञानेश्वरकृत अमृतानुभव
गुरूमहिमा
प्रकरण २ ओवी २.७६
दिठी मुखाचिये बरवे । पाठीकडूनि जै फावे ।
तै आरसे धांडोळावे । लागती काई ।। २.७६ ।।
आपली दृष्टी(दिठी) पाठीमागे मुरडून जर(जै,जेव्हा) आपले मुख चांगले(बरवे) पाहू शकलो(फावे) तर आरशाची खटपट कशाला(काई) करायला पाहिजे.
If we can see our face just by turning our head we do not need a mirror to see our face.
माणसाने अंतर्मुख होऊन स्वतःला जाणून घेतले पाहिजे हा विचार ज्ञानेश्वर ह्या ओवीत सांगत आहेत.रोजच्या जीवनात आपल्याला आपला चेहरा पहाता येत नाही.तो पहावयाचा असेल तर आपल्याला आरशाची मदत घ्यावी लागते.समोर आरसा धरला म्हणजे आपले मुख आपल्याला दिसते.पण आपण आपली मान वळवून आपल्याला आपले मुख पहाता आले तर आपल्याला आरशाची गरज पडणार नाही.आरशाच्या सहाय़्याने आपण आपले मुख पहाणे हे द्वैत झाले.मी आणि आरसा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.द्वैतामार्गे समजावून घेणे ह्याला मर्यादा येतात.म्हणून ज्ञानेश्वर सांगतात आपण आपल्याला समजावून घेता आले पाहिजे.
It is everyday`s experience that one cannot see ones face.One has to take the help of something else which is outside him.Normally one stands before a mirror and observes ones face.This is Dwait(duality).He asserts that one should try to understand onself by introspection.If one is successful he no longer requires the help of a mirror.He says if one can turn his head backward and see ones face he will no longer require the help of the mirror to see ones face.In other words one should try to introspect and understand oneself and when he succeeds he no longer requires others help.
सुप्रभातम्
२७ जुलै २०१४
ज्ञानेश्वरकृत अमृतानुभव
गुरूमहिमा ,प्रकरण २,ओवी २.७७
कां राती हन गेलिया । दिवस हन पातलिया ।
काय सूर्यपण सूर्या । होवावे लागे ।। २.७७ ।।
किंवा रात्र सरून(गेलिया),पूर्ण(हन) दिवस उजाडल्यानंतरच(पातलिया) सूर्याच्या ठिकाणी सूर्यपण येते(होवावे) ?
Or is it that the sun shines only when the day dawns on the end of night ends
निवृत्तिनाथांचे निवृत्तिपण हे स्वयंभू आहे .ते परावलंबी नाही हा ह्या ओवीचा विषय आहे.हा विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वर सूर्य,त्याचे उगवणे ,दिवस,रात्र ह्यांचा संदर्भ देतात.ते विचारतात रात्र संपली ,दिवस उजाडला म्हणजे सूर्याच्य ठिकाणी सूर्यपण येतं,तो प्रकाशतो असे म्हणावे का .अर्थातच नाही.कारण सूर्य हा नेहमी प्रकाशितच असतो.रात्र संपली म्हणून तो प्रकाशतो असे होत नाही..त्याचे प्रकाशणे स्वयंभू आहे.तो नेहमी प्रकाशितच असतो.
The ascetism of Shri NNivrutinath is inborn and innate .It is not derived from something else.This is the subject matter of this O`wi. Shridnyaneshwar explains this concept through our daily experience. Every day night ends and the day dawns Sun rises.But can e then infer that the rises because the night has ended.The rising of the sun is a phenomenon experienced by a man on the earth but that is not the experience of the sun .Sun is always lighted.He does not rise because night has ended.
———=====

सुप्रभातम् २८ जुलै २०१४
ज्ञानेश्वरकृत अमृतानुभव
प्रकरण २, गुरूमहिमा ओवी २.७८

म्हणोनि बोध्य बोधोनि । धेपे प्रमाणे साधुनि ।
ऐसा नव्हे भरंवसेनि । गोसावी हा ।। २.७८ ।।
त्याप्रमाणे निवृत्तिनाथ पुराव्याच्या (प्रमाणाच्या) सहाय्याने बोध करून जाणणारे ज्ञेय (बोध्य) नव्हेत ते पुराव्याने(प्रमाणाने) प्रमेय नव्हे ,तर निश्चयाने(भरंवसेनि) ते सर्व प्रमाणांना प्रमाणत्व देऊन प्रकाशित करणारे ,प्रमाणांवाचून व प्रमाणांच्यापूर्वीच स्वयंसिद्ध असलेले,असे स्वयंप्रमाणरूप समर्थ आहेत.
Nivrtinath is not one who can be understood through proof.He is the supreme and self made.

श्रीगुरू निवृत्तिनाथ हे अलौकिक आहेत. ते स्वयंभू आहेत.त्यांना समजून घेणे अवघड आहे कारण ते कोणत्याही साधनांद्वारे जाणून घेता येत नाहीत.एकादी वस्तू जाणून घ्यावयाची असेल तर आपण त्याचा रंग,आकार, आवाज अशा विविध गुणांच्या द्वारे समजून घेतो.पण निवृत्तिनाथांना अशा कोणत्याही साधनांद्वारे वा प्रमाणांद्वारे जाणून घेता येत नाही.ते सर्व प्रमाणांच्या पलिकडचे आहेत.प्रत्यक्ष,अनुमान ही जाणून घेण्याची प्रमाणे आहेत. त्यांच्याद्वारे आपण ज्ञान प्राप्त करतो पण गुरू निवृत्तिनाथ जाणून घेण्यासाठी ती निरूपयोगी आहेत.श्रीगुरू हे स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत.
Usually we use footrule to measure length of an object or use weightslike grams and kilgrams to measure weight.e require a measure or an instrument to know the object.But Sadguru Nivrutinath cannot be understood through another medium like colour ,form etc.He defies being understood by any other.He is absolute,innate ,inborn.He cannot be described or understood through a medium.

सुप्रभातम् २९ जुलै २०१४
श्रीज्ञानेश्वरकृत अमृतानुभव
प्रकरण २,गुरूमहिमा,ओवी २.७९ व २.८०
ऐसे करणियाविण । स्वयंभाचि जे निवृतिपण ।
तयाचे श्रीचरण । वंदिले ऐसे ।। २,७९ ।।
याप्रमाणे कोणत्याहि क्रियेने म्हणजे प्रवृत्तीनाशक निवृत्तीरूप क्रियेने ,न आलेले असे जे स्वयंभू(स्वयंभाचि) निवृत्तिपण ज्यांचे ठिकाणी स्वाभाविक आहे त्या निवृत्तिनाथांच्या चरणांना वंदन केले.
I bow before and touch the feet of one who has not secured his acetism by any conscious act but whose ascetism is inborn and innate to him..

आता ज्ञानदेवो म्हणे । श्रीगुरूप्रणामे येणें ।
फेडिली वाचाऋणें । चौहि वाचांची ।। २.८० ।।
श्रीज्ञानदेव म्हणतात या श्रीगुरू निवृत्तिनाथांना मी वंदन करून चार(चौहि) वाणींचे ऋण फेडले.
Shri Dnyandeo conveys his deep respect and expresses that by this act he has redeemed his indebtedness of the four forms of speech

अमृतानुभव ह्या ग्रंथाच्या दुसर्या अध्यायात श्रीज्ञानदेव गुरू ही संकल्पना एका वेगळ्याच उंचीवर नेतात व विविध दृष्टांताच्या सहाय़्याने ती समर्थपणे समजावून सांगतात. ह्या प्रकरणातील ह्या शेवटच्या दोन ओव्या.त्यात गुरूबद्दल असलेला अत्यंतिक आदरभाव ते व्यक्त करतात.आणि भारतीय समाजात प्रचलित असलेल्या पद्धतीप्रमाणे श्रीज्ञानदेव गुरूच्या पायाला स्पर्ष करतात व पाया पडतात. गुरूचे ऋण फेडतात.एका वेगळ्याच ऋणाचा श्रीज्ञानदेव उल्लेख करतात .ते म्हणजे वाचा ऋण.आपले विचार आपण बोलून ,वाणीद्वारे व्यक्त करतो.तेव्हा ह्या वाणीचे आभार मानणे,ऋण व्यक्त करणे स्वाभाविकच आहे.ह्या वाचा ऋणाचा अधिक विचार वेगळा करत आहे.

—-===
सुप्रभातम्
२२ जून २०१४
ज्ञानेश्वरकृत अमृतानुभव
गुरूमहिमा प्रकरण २
वेदातील ध्वनी विचार

श्रीज्ञानेश्वरांच्या अमृतानुभव ह्या ग्रंथातील गुरूमहिमा ह्या दुसर्या प्रकरणातील शेवटच्या ८० व्या ओवीशी येऊन पोचलो..ओवी होतीः
आता ज्ञानदेवो म्हणे । श्रीगुरू प्रणामे येणें ।
फेडिली वाचाऋणें । चौही वाचांची ।। २.८० ।।
श्रीज्ञानदेव म्हणतात श्रीगुरूला नमस्कार करून मी चारही वाणींचे ऋण फेडले.
ओवीचा शब्दार्थ तर सहज समजतो.पण चार वाणींचे ऋण ही संकल्पना काय आहे हा प्रश्न पडला.ह्या चार वाणी कोणत्या ह्याचा शोध घेतल्यावर जी माहिती मिळाली ती मोठी उद्भोदक होती.आपण साकार वस्तुच्या मुळाशी जाऊन अणुरेणुचीही माहिती मिळवली.पण वाणी ,ध्वनीचा अभ्यास केला जात नाही.

ऋग्वेदात वाणीचा उल्लेख येतो तो असा.चार वाणी आहेत पण त्यातील वैखरीचा रोजच्या व्यवहारात आपण उपयोग करतो.श्रीमद् भागवत ,तंत्र,गीता, वेदांत सुत्र इत्यादी ग्रंथातूनही वाणीविषयी चर्चा केलेली आहे.
परा,पश्यन्ति,मध्यमा व वैखरी ह्या त्या चार वाणी.परा ही उन्य तीन वाणींची जननी होय.आपल्याला वेगवेगळ्या पातळीवर जाणिवा होतात त्यानुसार चार वाणी कल्पिल्या आहेत.परा वाणी ही अलौकिक, अनुभवापलीकडील आहे,पश्यन्ति ही बौद्धिक जाणीव दर्शवते,मध्यमा वाणी मानसिक जाणीव दर्शवते तर वैखरी वाणी भौतिक जाणीव दर्शवते.वाणी जागृत,स्वप्नील ,स्वप्नबाह्य व अलौकिक पातळीवर अनुभवता येते.वाणी दोन गोष्टींचा निर्देश करते.वाणी तथा ध्वनी एखाद्या विषयाचा व त्याचप्रमाणे बोलणार्याचा निर्देश करते.ध्वनी हा जाणतेपणाने निर्माण होतो.अजाणतेपणाने निर्माण होणार्या आवाजाला वाणी म्हणत नाहीत.
शब्द व अर्थ हे शाश्वत आहेत.ते शिव आणि शक्ती ची रूपे आहेत.
ध्वनी अक्षर,स्वर रूपातही आहे,विश्वाची निर्मितीक्षमता अक्षरातही आहे.अक्षरातून शब्द निर्माण होतो व शब्दाद्वारे वस्तू व विचारांचा निर्देश होतो.शब्दातून मंत्र निर्माण होतो व मंत्राद्वारे विशिष्ट दैवतापर्यंत पोचता येते.ध्वनी विविध पायर्या ,विविध अवस्थेतून जातो .ह्या अवस्था म्हणजेच परा, पश्यन्ति,मध्यमा व वैखरी होय.
वैखरी वाणी ही शरिराच्या बाह्य इंद्रियामार्फत(मुख) निर्माण होते व ऐकली (कान)जाते.ती स्थूल रूपात असते.
मध्यमा म्हणजे मधली,सुश्पती व जागृत ह्या अवस्थांमधली आहे .तिचे स्थान हृदयात आहे.ती मनाची भाषा आहे.विचाराची भाषा आहे.ती वैखरीसारखी कान व मुख सारख्या बाह्य इंद्रियांनी जाणली जात नाही.ह्या अवस्थेत ती कंप रूपात असते व वाणीला अक्षर रूप म्हणजेच अ,क,च असे अक्षर रूप प्राप्त होते . ज्यांना सिद्धी प्राप्त झाली आहे त्यांनाच ही जाणीव होते.
वैखरी व मध्यमा अवस्थेत वाणी व ती निर्देश करत असलेला विषय हे एकमेकांपासून भिन्न असतात व प्रचलित रूढीप्रमाणे त्यांचा संबंध जोडला जातो.
पश्यन्ति ही दुसर्या पातळीवरील वाणी होय.पश्यन्ति म्हणजे जी दृश्य आहे ती. ही स्वाभाविकपणे,उस्फूर्तपणे प्रगटते व तिचा निर्देशित विषयाशी संबंध जोडला जातो. ह्या स्थितीत भाषा-भाषामधील फरक जाणवत नाही.ही जाणीव भाषा विरहित असते.तिचे स्थान नाभी असते.पश्यन्ति स्थितीत वाणी ही कंप स्वरूपातील हवा असते व तीस अक्षर रूप प्राप्त झालेले नसते पण त्या स्वरूपात ती मनापर्यंत पोचते.

परा वाणी अनुभव बाह्य,अलौकिक स्वरूपाची असते. तिचे स्वरूप कंपविरहित ध्वनी असे आहे.परा म्हणजे दूरची.मन व बुद्धी यांच्या आकलना पलिकडची ती असते.सामान्यांना तिचे आकलन होत नाही.ज्ञानी माणसास त्याचे आकलन होते . वाणी परा अवस्थेत असताना वाणी व ती निर्देश करत असलेली वस्तू ह्यात भेद रहात नाही.वैखरी,मध्यमा व पश्यन्ति वाणी ह्या गायत्री मंत्रात वर्णन केलेल्या विश्वनिर्मितीच्या भूः,भूवः,स्वाः ह्या अवस्थांशी जुळणार्या आहेत.ह्या तीन वाणींमध्ये तीन शक्ती आहेत.पश्यन्तित इच्छाशक्ती,मध्यमा वाणीत ज्ञान शक्ती व वैखरीत क्रियाशक्ती असते.
परा,पश्यन्ति,मध्यमा व वैखरी ह्या चारही वाणींचा समावेश प्रणव तथा ओम ह्या शब्दात आहे. ओम हा शब्द अ,उ व म ह्या तीन अक्षरांचा मिळून तयार होतो.सर्व वाणींचा तो जनक आहे.चार वाणींचं अस्तित्व स्थूल(वैखरी),सूक्ष्म(मध्यमा),कारक(पश्यन्ति) व अलौकिक(परा) अशा चार रूपात आहे, ह्या चार रूपात वाणी जाणवते.ओम हे भौतिक जगाचे अभौतिक रूप,ध्वनी रूप आहे.भौतिक जगाच्या निर्मिती आधी वाणी,शब्द निर्माण झाला.ब्रह्मदेवाने हे जग निर्माण केले.ते करतांना जे निर्माण करायचे ते निश्चित कसे करायचे हा प्रश्न होता, ते काम वाणी, शब्दाने केले.हे विश्व निर्माण होण्यापूर्वी शब्द निर्माण झाला.हे आहे वाणीचे महात्म्य.